शहरं
Join us  
Trending Stories
1
जगदीप धनखड यांचा उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा; प्रकृतीच्या कारणास्तव निर्णय
2
आजचे राशीभविष्य, २२ जुलै २०२५: 'या' २ राशींसाठी लाभदायी दिवस, अचानक धनलाभ होईल
3
पहिला दिवस गोंधळाचा; विरोधक झाले आक्रमक; पहलगाम हल्ला ते बिहार मतदारयादीवरून गोंधळ 
4
शाळेवर विमान कोसळून २० ठार; बांगलादेशात अहमदाबादची पुनरावृत्ती!
5
मोठी बातमी: उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी दिला पदाचा राजीनामा
6
मुख्यमंत्र्यांनी कोकाटेंना सुनावले; जे काही घडले ते भूषणावह नाही!
7
भाजपचा नवा फॉर्म्युला; प्रत्येक आमदाराची पाच कामे होणार! पालिका निवडणुकीसाठी रणनीती
8
विधवा महिलेस १.२० लाखात गुजरातेत विकले, दोन वर्षांनी पुत्रप्राप्तीनंतर आणून गावात सोडले!
9
शेअर ट्रेडिंगच्या बहाण्याने वृद्धेसह पायलटला १० कोटींचा गंडा; बनावट ॲपचा वापर करून लावला चुना
10
६३ खासदार म्हणतात, न्या. वर्मांना पदावरून हटवा! कारण काय?
11
महाराष्ट्रातील ४ लाख शेतकरी लाभार्थी यादीतून झाले गायब; लाभार्थी १०.२ लाखांवरून केवळ १५ हजारांवर
12
स्थानके चकाचक, डेपो मात्र घाण; एस.टी.च्या स्वच्छता अभियानात १४९ बसस्थानके नापास
13
धनखड यांचा राजीनामा, आता पद कोण सांभाळणार, नव्या उपराष्ट्रपतींची निवड कशी होणार? अशी आहे संपूर्ण प्रक्रिया
14
सूरज चव्हाण यांची अखेर हकालपट्टी; छावा कार्यकर्त्यांना मारहाण भोवली
15
आम्हाला तोंड उघडण्यास भाग पाडू नका; ईडी.. तुमचा राजकीय वापर का हाेतोय?
16
हनी ट्रॅपप्रकरणी संबंधित अधिकाऱ्यांची चौकशी; ‘त्या’ हॉटेल व्यावसायिकाचे जमीन व्यवहार तपासणार
17
मंत्री शिरसाट यांच्या घरात शिरला खतरनाक गुन्हेगार; सुपारी दिल्याचा संशय 
18
मुंबई उच्च न्यायालयाच्या वांद्र्यातील नव्या इमारतीसाठी जमीन ताब्यात!
19
शाळकरी मुलीच्या गळ्याला लावला चाकू; पंधरा मिनिटांच्या थरारानंतर मुलीची सुटका
20
संविधानाचे कलम ६७(अ) काय सांगते? ज्याअंतर्गत जगदीप धनखड यांनी दिला उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा

१३१ रस्त्यांचा मार्ग सुकर!

By admin | Updated: April 2, 2017 02:37 IST

नऊ कोटींचा निधी प्राप्त; ग्रामीण भागात रस्त्यांचे जाळे.

वाशिम, दि. १-ग्रामीण भागातील रखडलेली रस्त्यांची कामे मार्गी लागणार असून, यासाठी नऊ कोटी रुपयांचा निधी प्राप्त झाला आहे. या निधीतून १३१ रस्त्यांची कामे होणार आहेत.ग्रामीण भागात रस्त्यांचे जाळे निर्माण करण्यासाठी विविध यंत्रणेद्वारे निधीची तरतूद केली जाते. जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागातर्फेदेखील रस्ते व पुलांची सुविधा निर्माण केली जाते. यासाठी सेस फंड, जिल्हा परिषदेचा निधी, जिल्हा नियोजन विकास समिती व विविध योजनेंतर्गतचा शासन निधी अशी कोट्यवधी रुपयांच्या निधीची जुळवाजुळव केली जाते. रस्ते व पूल निर्मितीनंतर अल्पावधीतच रस्त्यांवर खड्डय़ांचे साम्राज्य निर्माण होते. नादुरूस्त रस्त्यांमुळे अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. ग्रामीण भागातील खराब रस्त्यांची दुरुस्ती, कच्च्या रस्त्याचे मजबुतीकरण तसेच जिल्हा रस्त्यांचा विकास करण्यासाठी जिल्हा परिषदेने जिल्हा नियोजन समितीकडे निधीची मागणी नोंदविली होती. निधी मंजुरीला मान्यता मिळाल्यानंतर या रस्त्यांच्या कामांचा शुभारंभ अपेक्षित होता. सन २0१६-१७ या कालावधीत जिल्हा परिषदेने ५0५४ या शीर्षकाखाली (इतर जिल्हा रस्ते विकास व मजबुतीकरण) एकूण ४२ रस्ते कामासाठी चार कोटी २१ लाख ४४ हजार रुपयांचे नियोजन जिल्हा नियोजन समितीकडे सादर केले होते, तसेच ३४५१ या शीर्षकाखाली (ग्रामीण रस्ते विकास व मजबुतीकरण) ८९ रस्ते कामासाठी चार कोटी ६३ लाख ९५ हजार रुपयांचे नियोजन जिल्हा नियोजन समितीकडे सादर केले होते. मार्च महिन्याच्या पंधरवड्यात या नियोजनला मान्यता मिळाल्याने आणि नऊ कोटी रुपयांच्या वर निधी प्राप्त झाल्याने आता १३१ ग्रामीण रस्त्यांची कामे सुकर होणार आहेत. ४२ रस्ते हे इतर जिल्हा रस्ते विकास व मजबुतीकरण या शीर्षकाखाली होणार आहेत तर ८९ रस्ते हे ग्रामीण रस्ते विकास व मजबुतीकरण या शीर्षकाखाली होणार आहेत. येत्या काही दिवसात या कामांना सुरुवात होईल, असे जिल्हा परिषद अध्यक्ष हर्षदा देशमुख यांनी सांगितले.ग्रामीण भागात रस्त्यांचे जाळे निर्माण करणे, रस्त्यांची दुरूस्ती, रस्त्यांचे मजबुतीकरण आदींसाठी निधी मिळावा म्हणून जिल्हा नियोजन समितीकडे नियोजन पाठविले होते. या नियोजनाला मंजुरी मिळाल्याने जिल्ह्यात १३१ रस्त्यांचे मजबुतीकरण व अन्य कामे केली जाणार आहेत.- हर्षदा दिलीप देशमुखअध्यक्ष, जिल्हा परिषद वाशिम