कारंजा, दि. १0- बाजार समितीमधील नाफेडच्या तूर खरेदी केंद्रावर व्यापार्यांचा माल ठेवण्यास मज्जाव केला जात आहे. असे असताना भवानी ट्रेडर्सतर्फे संगीता नंदकिशोर बोनके यांनी यार्डावर खरेदी केलेला १२५ क्विंटल तुरीचा माल नाफेडच्या खरेदी केंद्रावर उतरविण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे बाजार समितीने शुक्रवारी तूर जप्तीची कारवाई केली.नाफेडच्या खरेदी केंद्रावर माल उतरवू नये, असे सांगूनही बोनके यांनी केंद्रावरच तुरीचा माल उतरविला. दरम्यान, खरेदी केंद्रावर घडणारे गैरप्रकार टाळण्यासाठी सभापतींच्या आदेशावरून सचिव एन.एन. भाकरे, व्यवस्थापक पी.व्ही. राऊत, काटा कर्मचारी एस.व्ही. कथले, हमाल सलीम पप्पुवाले आदींनी सदर माल जप्त करण्याची कारवाई केली.
व्यापा-याची १२५ क्विंटल तूर जप्त!
By admin | Updated: March 11, 2017 02:31 IST