आमखेडा येथील प्रकरण : आरोपींमध्ये विद्यार्थ्यांचाही समावेशजउळका रेल्वे (जि.वाशिम) : आमखेडा येथील कृषी महाविद्यालयात शिकणाऱ्या तेलंगना येथील २३ वर्षीय विद्यार्थीनीचा धारदार शस्त्राने खून करून पुरावे नष्ट केल्याप्रकरणी पोलिसांनी १२ जणांवर गुरूवार, १३ एप्रिल रोजी गुन्हे दाखल केले. आरोपींमध्ये काही विद्यार्थ्यांचाही समावेश आहे. तेलगंना राज्यातील राकेश पेठ, ता.बोथन, जि. निजामाबाद येथील मृतक आशिता सोनकांबळे हिचे वडिल राजाराम सोनकांबळे यांनी जउळका रेल्वे पोलिस स्टेशनमध्ये दाखल केलेल्या फिर्यादीत नमूद केले आहे, की माझ्या मुलीला आरोपींनी संगणमत करुन तीच्याकडे शरिरसुखाची मागणी केली. तीने त्यास नकार दिल्यामुळे आरोपींनी धारदार शस्त्राने गळ्यावर, डाव्या हातावर वार करून तीला ठार केले. हत्येचे हे प्रकरण दाबण्याकरिता घटनास्थळावरील पुरावे नष्ट केले. अशा फिर्यादीवरून पोलिसांनी महाविद्यालयाच्या प्राचार्यासह घनश्याम जोगदंड, अध्यक्ष अविनाश जोगदंड, वसतीगृह अधीक्षक पांडूरंग जोगदंड यांच्यासह श्रीपाल, प्रदिप, श्रीषा, रेश्मा, गणेश बन्सोड, बबन आवटे, रामकृष्ण जोगदंड, संतोष जोगदंड अशा १२ जणांवर गुन्हा दाखल केला आहे. या घटनेचा अधिक तपास कारंजाचे उपविभागीय पोलिस अधिकारी रत्नाकर नवले करित आहेत.
विद्यार्थीनी मृत्यूप्रकरणी १२ जणांवर खूनाचा गुन्हा!
By admin | Updated: April 13, 2017 19:30 IST