शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
5
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
6
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
7
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
8
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
9
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
10
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
12
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
13
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
14
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
15
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
16
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
17
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
18
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
19
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
20
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
Daily Top 2Weekly Top 5

१.१३ कोटी विद्यार्थ्यांना शाळा प्रारंभाला मोफत पाठ्यपुस्तके

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 19, 2018 21:35 IST

शिक्षण सचिवांचे आदेश : ३५२ कोटी मंजूर, १ ते ८ वी मधील विद्यार्थ्यांना लाभ

इंदल चव्हाण/अमरावती : स्थानिक स्वराज्य संस्था व अनुदानित शाळांमधील मुलांच्या गळतीचे प्रमाण कमी व्हावे, यासाठी यंदाच्या शैक्षणिक सत्राच्या प्रारंभालाच इयत्ता १ ते ८ वी पर्यंतच्या १ कोटी १३ लाख ४९ हजार ६४९ विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तके वितरित करण्यात येणार आहे. शिक्षणाचे उद्दिष्ट्य साध्य करण्यासाठी ३५२ कोटी २५ लाखांच्या तरतुदीस शासनाने मान्यता दिली आहे. याविषयीचे निर्देश गुरूवारी शिक्षण सचिव नंदकुमार यांनी शिक्षण विभागाला दिले आहेत.

येत्या शैक्षणिक सत्रात प्राथमिकस्तरावर प्रतिविद्यार्थी २५० रूपये व माध्यमिक स्तर प्रतिविद्यार्थी ४०० रूपये या दराने ही तरतूद तत्त्वत: मंजूर करण्यात आलेली आहे. येत्या सत्रासाठी मराठी, हिंदी, उर्दू, इंग्रजी, गुजराती, कन्नड, तेलगू व सिंधी अरेबी माध्यमाच्या पाठ्यपुस्तकांची मागणी पाठ्यपुस्तक मंडळाकडे यापूर्वीच नोंदविण्यात आलेली आहे. शाळा सुरू होण्यापूर्वी पालकांद्वारा पुस्तकांची खरेदी करण्याची शक्यता लक्षात घेता सर्व व पालक व विद्यार्थ्यांना माहिती व्हावी, यासाठी शाळेच्या दर्शनी भागावर याविषयीचे फलक लावण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तालुकास्तरावर पुस्तके आल्यानंतर तत्काळ माध्यम, इयत्ता व  विषयनिहाय संच वर्गीकरण करावेत व विनाविलंब संबंधित शाळांना पाठविण्यात यावेत. पुस्तके तालुकास्तरावर आल्यावर गटसमन्वयकाचा प्रभार असलेल्या शिक्षण विस्तार अधिकाºयांनी कार्यालय सोडू नये, अशी तंबी शिक्षण सचिवांनी दिली आहे.

पुस्तके वाटपाची विभागनिहाय तारीखविदर्भातील शाळांमध्ये २६ जून व उर्वरित महाराष्ट्रात १५ जून २०१८ रोजी पाठ्यपस्तके वाटण्याचे निर्देश आहेत. या दिवशी उपस्थित सर्व विद्यार्थ्यांना पुस्तकांचे वाटप मुख्याध्यापक करतील. या समारंभाला शाळा व्यवस्थापन समिती सदस्य, पालक-शिक्षक संघ, माता-पालक संघ व संस्थेच्या पदाधिका-यांना उपस्थित राहण्याच्या सूचना देण्यात याव्यात. पहिल्या दिवशी जे विद्यार्थी येतील त्यांना व जे अनुपस्थित आहेत, त्या विद्यार्थ्यांना शाळेत आल्यावर पुस्तके वितरित करावे व निकषपात्र शाळांमध्ये शाळाबाह्य विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला असल्यास शिल्लक राहिलेल्या पाठ्यपुस्तकांमधून वितरित करण्यात येणार आहेत.