शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

रिसोड तालुक्यात आतापर्यंत ११०९ संदिग्धांचे घेतले स्वॅब !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 4, 2020 16:37 IST

रिसोड तालुक्यात आतापर्यंत ११०९ संदिग्धांचे थ्रोट स्वॅब तपासणीसाठी घेतले तर ४०२ जणांची रॅपिड अ‍ॅन्टिजन टेस्ट करण्यात आली.

लोकमत न्यूज नेटवर्करिसोड : कोरोनाच्या पृष्ठभूमीवर रिसोड तालुक्यात आतापर्यंत ११०९ संदिग्धांचे थ्रोट स्वॅब तपासणीसाठी घेतले तर ४०२ जणांची रॅपिड अ‍ॅन्टिजन टेस्ट करण्यात आली.  यापैकी १३० जण कोरोना पॉझिटिव्ह आले असून, सध्या ३९ रुग्ण अ‍ॅक्टिव्ह आहेत. दरम्यान आरोग्य विभागातर्फे प्रतिबंधित क्षेत्रात घरोघरी सर्वेक्षण केले जात आहे.११ जूनपर्यंत रिसोड तालुका हा कोरोनामुक्त होता. शहरात पहिला रुग्ण १२ जून रोजी आढळून आला होता. त्यानंतर शहर व तालुक्यात कोरोनाबाधित रुग्ण आढळून येत आहेत. बाहेरगावावरून आलेल्या नागरिकांमुळे शहरासह ग्रामीण भागात कोरोनाचा शिरकाव झाला. आतापर्यंत तालुक्यात ११०९ जणांचे थ्रोट स्वॅब नमुने तपासणीसाठी घेण्यात आले. यापैकी ११८ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. ४०२ जणांची रॅपिड अ‍ॅन्टिजन टेस्ट करण्यात आली असून २२ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. १३० रुग्णांपैकी सध्या ३९ रुग्ण अ‍ॅक्टिव्ह असून, उर्वरीत रुग्णांनी कोरोनावर मात केली. दरम्यान, ४ आॅगस्ट रोजी १६ जणांच्या थ्रोट स्वॅबचा अहवाल निगेटिव्ह आला तसेच १५ जणांची अ‍ॅन्टिजन टेस्टही निगेटिव्ह आल्याने तालुकावासियांना थोडा दिलासा मिळाला. खबरदारीचा उपाय म्हणून प्रतिबंधित क्षेत्रात घरोघरी सर्वेक्षण आणि आरोग्य तपासणी करण्यात येत आहे. तालुक्यात सर्वाधिक रुग्ण मांगवाडी या गावात आढळून आल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. दरम्यान मांगवाडी येथील रुग्ण कोरोनावर मात करीत असल्याने गावकºयांना दिलासाही मिळत आहे. प्रतिबंधित क्षेत्र आणि रिसोड शहरातील नागरिकांचे घरोघरी जाऊन सर्वेक्षण केले जात आहे.तपासणी करण्यात आलेल्या नागरिकांची प्रकृती ठणठणीत असल्याचे आरोग्य विभागाने स्पष्ट केले.  शहरासह ग्रामीण भागात गर्दी कायम... !कोरोनाची साखळी तोडण्यासाठी सर्वप्रथम १४ जून ते १७ जून असा चार दिवस रिसोड शहरात जनता कर्फ्यू पाळण्यात आला. व्यापाºयांनी पुकारलेल्या या जनता कर्फ्यूला नागरिकांचा उत्स्फुर्त सहभाग लाभल्याने चार दिवस शहरात सामसूम होता. त्यानंतर प्रशासनातर्फे १५ जुलै ते २१ जुलै या दरम्यान संपूर्ण लॉकडाऊनची कडक अंमलबजावणी करण्यात आला. १ आॅगस्टपासून सकाळी १० ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत दुकाने सुरू ठेवण्यास मुभा मिळाल्याने शहरासह ग्रामीण भागात नागरिकांची गर्दी होत असल्याचे दिसून येते.

टॅग्स :washimवाशिमRisodरिसोडcorona virusकोरोना वायरस बातम्या