देपुळ (वाशिम): गावातील दारूबंदीसाठी आसेगाव पोलिसांनी अँक्शन प्लॅन बनवून ११ गावात महिला मंडळाच्या सहकार्यातून दारूबंदीचा यशस्वी प्रयोग केला आहे. निवडणुकीच्या काळातही या गावांमध्ये दारूचा थेंबही येत नसल्याने हा प्रयोग यशस्वी झाल्याचे प्रथमदर्शनी दिसून येत आहे.आसेगाव पोलिस स्टेशनअंतर्गत येणार्या वारा (जहाँगीर), वसंतवाडी, पिंपळगाव, शेंदुरजना (आढाव), मेनद्ररा, लही, शिवणी (द.), गोस्ता, आसेगाव, वटफळ, इचोरी इत्यादी गावामध्ये समाज प्रबोधन तसेच दारु बंदीसाठी महिला मंडळाची स्थापना केली. आसेगाव पोलिस स्टेशनचे ठाणेदार सुनिल अंबुलकर यांनी केलेल्या प्रयत्नामुळे ११ गावामध्ये दारुबंदी झाली आहे. ठाणेदार अंबुलकर यांनी गणेश व दुर्गा उत्सवाचे औचित्य साधून शांतता कमेटीच्या सभेच दारूबंदीचा अँक्शन प्लॅन मांडला होता. दारुबंदीसाठी गावामध्ये, ग्रामपंचायतचे पदाधिकारी विविध उत्सव मंडळ, क्रिडा मंडळ, भजनी मंडळ, महिला मंडळ, तंटामुक्त गाव समिती ज्येष्ठ व प्रतिष्ठित नागरिकांनी सहभाग घ्यावा असे आवाहनही केले होते. आता या उपक्रमाला यश येत असल्याचे दिसून येत आहे. पोलिस आणि महिला मंडळाच्या सहकार्यातून ५५ पैकी ११ गावात दारुबंदी होवून दारु हद्दपार झाल्याचे दिसून येत आहे. उर्वरीत ४४ गावात पूर्णपणे दारु बंद करण्याचा संकल्प आसेगाव पोलिसांनी केला आहे.
११ गावांमध्ये दारूबंदी
By admin | Updated: October 13, 2014 02:02 IST