शहरं
Join us  
Trending Stories
1
राजकीय पक्षांचे दार चुकले; मतदार याद्यांचा विषय कक्षेत नाही; राजकीय प्रतिनिधींना आयोगाचे उत्तर
2
रशियाचा युक्रेनवर मोठा हल्ला, रुग्णालय आणि वीज प्रकल्पाचे मोठे नुकसान; सात जण जखमी
3
अग्नितांडव! बांगलादेशच्या ढाकामध्ये कपड्याच्या फॅक्ट्रीला भीषण आग; १६ कामगारांचा होरपळून मृत्यू
4
आजचे राशीभविष्य, १५ ऑक्टोबर २०२५: सरकारी कामात यश, हाती पैसा येईल; चांगली बातमी मिळेल
5
ना शिधा, ना आनंद! भुजबळांनी ते धाडस दाखविले...
6
भारत-पाकच्या खेळाडूंमध्ये ‘हाय फाइव्ह’; हॉकी संघाने सामना संपल्यानंतर हस्तांदोलनही केले
7
मुंबई महापालिका निवडणूक मतपत्रिकेवर घेण्याची मागणी; राज, उद्धव ठाकरेंसह शरद पवारांची मागणी
8
बापरे, काय तो वेग...! बुलेट, रॉकेटचा नाही तर चांदीचा; एकाच दिवसात १५,००० ने वाढली 
9
ईडी कारवाई: वसईचे माजी आयुक्त अनिल पवार, गुप्ताची ७१ कोटींची मालमत्ता जप्त
10
पानसरे हत्या; तीन आरोपींना जामीन मंजूर; सर्वच आरोपी आता जामिनावर बाहेर
11
माओवादी चळवळीने हात टेकले; ‘भूपती’सह ६० जणांची शरणागती
12
इंधन भेसळ प्रकरणात जामीन देताना गंभीरतेने विचार गरजेचा; मुंबई उच्च न्यायालयाचे स्पष्ट मत, एकाचा जामीन फेटाळला
13
कोल्डरिफसह तीन विषारी सिरप वापरू नका, जिवाला असलेला धोका टाळा
14
धारदार शस्त्राने गळा चिरून तरुणाची हत्या; इतर मद्यपींनी पाहिले अन् तिकडे धाव घेतली...
15
सलमान, शाहरूखला पाहण्यास गाठली मुंबई; अनाथ मुलाचा उपाशीपोटी तब्बल २५ तासांचा प्रवास
16
एमबीबीएस प्रवेशासाठी १५२ विद्यार्थ्यांकडून चुकीची कागदपत्रे सादर; सीईटी सेलची नोटीस
17
रणजी करंडक स्पर्धेमध्ये छाप पाडण्यासाठी युवा खेळाडू सज्ज; ऋषभ पंतच्या पुनरागमनावर नजर 
18
भारताने केलेे २-० ने ‘क्लीन स्वीप’; दुसऱ्या कसोटीत वेस्ट इंडिजवर ७ गडी राखून मात
19
कवितेच्या सूर्यकुळाचे नायक तुम्हीच आहात, सुर्वे !
20
महाराष्ट्र उच्च शिक्षणाचे जागतिक केंद्र कसे बनेल?

वाशिम जिल्ह्यात कोरोनामुक्त गाव पुरस्कारासाठी १०९ प्रस्ताव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2021 10:51 IST

109 proposals for Corona Free Village Award in Washim District : निकषांमुळे प्रस्ताव दाखल करण्यास ग्रामपंचायती उदासीन असल्याचे चित्र आहे.

- दादाराव गायकवाडलोकमत न्यूज नेटवर्कवाशिम: ग्रामीण भागातील कोरोनामुक्तीच्या कामाला प्रोत्साहन मिळावे, त्याद्वारे तालुका, जिल्हा आणि संपूर्ण राज्य लवकरात लवकर कोरोनामुक्त व्हावे, यासाठी राज्यात कोरोनामुक्त गाव स्पर्धा राबविण्याची घोषणा ग्रामविकास मंत्र्यांनी केली आहे. या योजनेंतर्गत जिल्ह्यातून २३ जुलैपर्यंत केवळ १०९ प्रस्ताव पंचायत समितीस्तरावर दाखल झाले आहेत. योजनेच्या निकषांमुळे प्रस्ताव दाखल करण्यास ग्रामपंचायती उदासीन असल्याचे चित्र आहे.कोरोनामुक्तीच्या उपक्रमास  चालना देण्यासाठी कोरोनामुक्त गाव स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.  या स्पर्धेत प्रत्येक महसूल विभागात चांगली कामगिरी करणाऱ्या पहिल्या ३ ग्रामपंचायतींना अनुक्रमे ५० लाख रुपये, २५ लाख व १५ लाख रुपये याप्रमाणे बक्षीस दिले जाणार असून, राज्यातील ६ महसुली विभागात प्रत्येकी ३ प्रमाणे राज्यात एकूण १८ बक्षिसे दिली जाणार आहेत. या शिवाय कोरोनामुक्त गाव स्पर्धेत चांगली कामगिरी करणाऱ्या पहिल्या ३ ग्रामपंचायतींना लेखाशीर्ष पंचवीस पंधरा (२५-१५) व तीस चौपन्न (३०-५४) या योजनांमध्ये प्राधान्य देऊन यामधून प्रत्येक महसूल विभागात पहिल्या तीन ग्रामपंचायतींसाठी  विकास कामे मंजूर केली जाणार आहेत. वाशिम जिल्ह्यातील ४९१ पैकी केवळ १२१ ग्रामपंचायतींनी या स्पर्धेंतर्गत प्रस्ताव दाखल केले आहेत  दरम्यान, जिल्हयातील निम्यावर ग्रामपंचायती काेराेनामुक्त झालेल्या आहेत. ही बाब पाहता ग्रामपंचायतींनी पुढाकार घेण्याची अपेक्षा आहे.गावांचे विविध २२ निकषांवर गुणांकनकोरोनामुक्त गाव पुरस्कार स्पर्धेत सहभागी गावांचे विविध २२ निकषांवर गुणांकन करण्यात येणार आहे. हे गुणांकन ५० गुणांचे राहणार असून, १ जून २०२१ ते ३१ मार्च २०२२ या कालावधीत ग्रामपंचायतींनी केलेले काम विचारात घेण्यात येणार आहे. जिल्ह्यातील निम्म्याहून अधिक ग्रामपंचायती सद्यस्थितीत कोरोनामुक्त असताना त्यांच्या कामगिरीत सातत्य राखले जावे आणि त्यांच्यापासून इतरांना प्रेरणा मिळावी म्हणून त्यांनी स्पर्धेसाठी प्रस्ताव सादर करणे अपेक्षीत असताना जिल्ह्यात केवळ १२१ प्रस्ताव प्राप्त झाले आहेत. 

ग्रामपंचायत स्तरावर ५ पथकांची स्थापना कोरोनामुक्त गाव स्पर्धेंतर्गत प्रत्येक ग्रामपंचायतीने कोरोनामुक्तीसाठी ग्रामपंचायत स्तरावर ५ पथकांची स्थापना करुन त्यांच्यामार्फत विविध उपक्रम राबवायचे आहेत. यामध्ये ग्रामपंचायत प्रभागनिहाय कुटुंब सर्वेक्षण पथक, विलगीकरण कक्ष स्थापन करुन त्यासाठी कार्यवाही करणारे पथक, कोरोना तपासणीसाठी व रुग्णांना रुग्णालयात भरती करण्यासाठी घेऊन जाणाऱ्या वाहन चालकाचे पथक, कोविड हेल्पलाईन पथक आणि लसीकरण पथक या पथकांचा समावेश असेल. 

कारंजा, रिसाेड तालुका निरंकग्रामविकास मंत्रालयाने गाव स्पर्धा राबविण्याची घाेषणा केल्यानंतर जिल्ह्यातील संबंधित ग्रामपंचायतींकडून प्रस्ताव मागविण्यात आले. या अंतर्गत जिल्ह्यातील चार तालुक्यातून प्रस्ताव प्राप्त झाले असले तरी कारंजा, रिसाेड तालुक्यातून मात्र अद्याप एकही प्रस्ताव पं. स.ला प्राप्त झाला नाही. उर्वरित चार तालुक्यातून पंचायत समितीच्या आवाहनाला प्रतिसाद मिळत असल्याचे दिसून येते. 

टॅग्स :washimवाशिमCoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्या