शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारत धर्मशाळा नाही, जिथं जगातील शरणार्थींना ठेवू शकतो..."; सुप्रीम कोर्टाची टिप्पणी
2
७ वर्षांनी 'टीम मोदी'मध्ये परतले एमजे अकबर; केंद्रीय मंत्रिपदाचा का द्यावा लागला होता राजीनामा?
3
Mumbai Fire: विधान भवनाच्या प्रवेशद्वाराजवळ आग; शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याची माहिती
4
'सिमकार्ड नको, आता काहीतरी मोठे करा...', हरियाणाच्या तारीफला पाकिस्तानने दिले होते 'हे' काम!
5
बाजारात चढ-उतार! इन्फोसिससह 'हे' शेअर्स घसरले; तुमच्या पोर्टफोलिओवर काय परिणाम?
6
Mumbai: नाल्यात अडकलेल्या मुलीला वाचवण्याच्या प्रयत्नात एका तरुणाचा दुर्दैवी मृत्यू
7
"त्यांनी माझं पॅकअप केलं होतं..", आमिर खानमुळे 'तारक मेहता...' फेम अभिनेत्याची गेली नोकरी
8
IPL 2025: "धोनीचे फॅन्स खरे आहेत, बाकीच्यांचे..."; हरभजन सिंगने विराट कोहलीवर केला शाब्दिक हल्ला?
9
अभिनेत्री शिल्पा शिरोडकरला कोरोनाचं निदान, सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत दिली माहिती
10
८व्या वेतन आयोगानंतर पगार आणि पेन्शन किती वाढेल? कधी लागू होईल? कोणाला मिळेल फायदा?
11
"आजाराबद्दल ऐकून काळजी वाटली, आम्ही तुमच्या सोबत..."; PM मोदींनी जो बायडेनना दिला धीर
12
एसीची सर्व्हिसिंग करण्याची योग्य वेळ तुम्हाला माहितीय का? अन्यथा बसेल मोठा फटका
13
मोसादचा सर्वात खतरनाक गुप्तहेर...! एली कोहेनला चौकात फाशी दिलेली, त्याला आज ६० वर्षे झाली; इस्रायलचे सिक्रेट ऑपरेशन
14
CJI साठी काय असतो प्रोटोकॉल? महाराष्ट्र दौऱ्यावर आलेले सरन्यायाधीश गवई झाले नाराज
15
10th Pass Job: दहावी पास उमेदवारांसाठी बँकेत चांगल्या पगाराची नोकरी, लगेच करा अर्ज!
16
पाकिस्तानला माहिती देणे चूक नाही, गंभीर गुन्हा...राहुल गांधींची जयशंकर यांच्यावर घणाघाती टीका
17
India Pakistan War : मोठा खुलासा! सीमेवरील तणावाच्या काळात चीनने पाकिस्तानसाठी हेरगिरी केली
18
मीठ ते विमान... पण सुरुवात कुठून? जमशेदजी टाटांच्या पहिल्या व्यवसायाची अनोखी गोष्ट
19
ज्योती मल्होत्रा, अन् नवांकुर चौधरीसह ते 10 लोक कोण, ज्यांच्यावर देशद्रोहाचा आरोप?
20
अनिल अंबानी पुन्हा ॲक्शन मोडमध्ये! मुकेश अंबानींना देणार टक्कर? भूतानसोबत २००० कोटींचा करार

जि.प.च्या ८३ शाळांमधील १00 वर्गखोल्या चकाकणार!

By admin | Updated: March 5, 2016 02:39 IST

शिक्षण विभागाचा पुढाकार : बांधकामाला सुरुवात; सव्वा पाच कोटींचा निधी.

वाशिम: गत दोन वर्षांंपासून बांधकामाच्या प्रतीक्षेत असलेल्या ८३ शाळेच्या १00 वर्गखोल्यांच्या बांधकामाला सुरुवात झाल्याने अध्ययन-अध्यापक प्रक्रियेतील अडथळा संपुष्टात येणार आहे.जिल्हा परिषदेच्या प्राथमिक व माध्यमिक अशा एकूण ७७९ शाळा असून, येथे शिक्षण दिले जाते. अनेक शाळांमध्ये पुरेशा प्रमाणात वर्गखोल्या नाहीत तसेच काही शाळांच्या वर्गखोली वादळवारा व अवकाळी पावसाने जमीनदोस्त केल्या. परिणामी, दोन-तीन वर्गातील विद्यार्थ्यांंना एका वर्गखोलीत बसविण्याची वेळ शिक्षकांवर आली. हिवाळा व उन्हाळ्यात विद्यार्थ्यांंना शाळेच्या प्रांगणात बसवून शिकवावे लागते. गत दोन वर्षांंपासून ८३ ठिकाणी अशीच ह्यशाळाह्ण भरत आली आहे. जुन्या वर्गखोल्यांची दुरुस्ती आणि नव्याने वर्गखोली मंजूर करण्याचा मुद्दा जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत अनेक वेळा चर्चेत आला होता. जि.प. शिक्षण व आरोग्य सभापती चक्रधर गोटे आणि शिक्षण समितीने हा प्रश्न शासनदरबारी मांडला. नोव्हेंबर २0१५ मध्ये शासनाने ८३ शाळेच्या १00 वर्गखोली बांधकामाला मंजुरात दिली. जवळपास सव्वा पाच कोटींचा निधी मंजूर झाल्याने वर्गखोली बांधकाम, स्वच्छतागृहे, रखडलेली खोली बांधकाम, नवीन वर्गखोली आदींच्या बांधकामाला आता सुरुवात झाली आहे. वाशिम तालुक्यातील १५, रिसोड १७, मानोरा १0, मंगरुळपीर १३, मालेगाव व कारंजा प्रत्येकी १४ अशा एकूण ८३ शाळेच्या १00 वर्गखोल्यांचा यामध्ये समावेश आहे. अनेक ठिकाणी नव्याने वर्गखोल्या बांधकाम होणार आहे; मात्र काही ठिकाणी जागा उपलब्ध नसल्याने जागा प्राप्त करण्यासाठी चाचपणी सुरू आहे. वर्गखोली बांधकामावर शाळा व्यवस्थापन समिती व गटशिक्षणाधिकार्‍यांना लक्ष ठेवावे लागणार आहे.