शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

दरोड्याच्या तयारीत असलेल्या १० जणांना शस्त्रासह पकडले; १३.०६ लाखांचा मुद्देमाल जप्त

By संदीप वानखेडे | Updated: September 27, 2023 14:53 IST

काटा रेल्वे स्टेशन परिसरातील घटना

वाशिम : घातक शस्त्रासह कुठेतरी दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या १० जणांच्या टोळीला जेरबंद करण्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला यश आले. काटा रेल्वे स्टेशनच्या बाजूला असलेल्या एका पडीक ठिकाणावरून दहा जणांना ताब्यात घेतले तर अंधाराचा फायदा घेवून काही दरोडेखोर पसार झाले.

पांगरी धनकुटे ते काटा रोडवरील रेल्वे पुलाच्या समोर काही इसम २५ सप्टेंबर रोजी रात्रीच्या सुमारास संशयितरीत्या एक बोलेरो चारचाकी वाहन व काही दुचाकी घेऊन घातक शस्त्रांसह कुठेतरी दरोडा घालण्याच्या तयारीत दबा धरून बसल्याची गोपनिय माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली. यावरून तीन वेगवेगळे पथक कारवाईसाठी घटनास्थळाकडे रवाना झाले. मोटारसायकल व एक बोलेरो कारने रेल्वे स्टेशनच्या बाजूला असलेल्या पडीक जागेमध्ये शस्त्रासह दरोडा टाकण्याच्या उद्देशाने दबा धरून बसले असल्याची खात्री झाल्याने पोलीस पथकांनी त्यांना घेराव घालून १० दरोडेखोरांना जागीच ताब्यात घेतले तर काही इसम हे अंधाराचा फायदा घेऊन शेतशिवारामध्ये पळून गेले.

पंचासमक्ष घेतलेल्या झडतीत दरोडेखोरांच्या ताब्यातून दरोडा टाकण्याकरिता लागणारे साहित्य लोखंडी कत्ता, धारदार चाकू, लोखंडी रॉड, कोयता, वेळूच्या काठ्या, मिर्ची पावडर मिळून आले तसेच चारचाकी गाडी बोलेरोची तपासणी केली असता त्यामध्ये पांढऱ्या रंगाची दोरी, लोखंडी रॉड, स्क्रू ड्रायव्हर मिळून आले.दरोडेखोरांच्या ताब्यातून १ बोलेरो चारचाकी, १३ मोटार सायकली, ७ मोबाईल संच व उपरोक्त साहित्य असा १३ लाख सहा हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. वाशिम ग्रामीण पोलिस स्टेशन येथे कलम ३९९, ४०२ भादंवि सहकलम ४, २५ शस्त्र अधिनियम अन्वये दरोडेखोरांवर गुन्हा नोंदविण्यात आला.

यांच्यावर दाखल केला गुन्हा

दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या विनोद मच्छिंद्र चव्हाण (३०), शुभम अनंता चव्हाण (२०), आकाश नामदेव काकडे (२४), गौतम भगवान गायकवाड, (३८),  संदीप मच्छिंद्र चव्हाण (४०)  सर्व रा.डव्हा, (ता.मालेगाव, जि.वाशिम), राहुल विश्वास पवार (२२) रा.सुदी, ता.मालेगाव, रवी डीगांबर पवार (२८) रा.आमखेडा, ता.मालेगाव, लक्ष्मण भागवत चव्हाण (४९) रा.धारकाटा, ता.मालेगाव, विशाल जगदीश पवार (२१) व राधेश्याम चुनिलाल पवार (२९) रा.सावरगाव बर्डे, ता.मालेगाव अशा दहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला.

टॅग्स :Robberyचोरी