शहरं
Join us  
Trending Stories
1
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी 'ऑपरेशन सिंदूर' आणि 'स्वदेशी' विषयी जनजागृती करावी - CM देवेंद्र फडणवीस
2
Video: राहुल गांधींची 'मृत' लोकांसोबत 'चाय पे चर्चा', निवडणूक आयोगाने मारल्याचा आरोप...
3
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
4
Trump's Tariff Policy : ट्रम्प यांचा डाव उलटला! टॅरिफमुळे भारत अन् चीन एकत्र आले; अमेरिकेने स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारली?
5
निशिकांत दुबेला भाजपा नेत्यानेच कशी दिली मात?; कॉन्स्टिट्यूशन क्लब निवडणुकीत तोंडावर पाडले
6
Palghar Crime: धक्का लागला म्हणून कुऱ्हाडीने केले वार, लोकांनी झाडाला बांधून आरोपी चोपला
7
"आम्हाला नाही माहीत, पाकिस्तानला...!"; ऑपरेशन सिंदूर दरम्यान एफ-१६ लढाऊ विमान पाडलं गेलं? अमेरिकेनं दिलं असं उत्तर
8
सावरकरांवरील विधानांमुळे माझ्या जीवितास धोका, राहुल गांधींचा दावा, महात्मा गांधींचा उल्लेख करत म्हणाले... 
9
Kabutar Khana: 'तुम्ही असा आदेश कसा काढू शकता?', उच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेला झापले; काय घडलं?
10
दोन नाही, युट्यूबर अरमान मलिकच्या चार पत्नी; कोर्टाने पाठवले समन्स; धक्कादायक कारण आले समोर
11
भारताचं नागरिकत्व घेण्यापूर्वीच मतदार यादीत नोंदवलं गेलं होतं सोनिया गांधींचं नाव, भाजपाचा गंभीर आरोप
12
'झपाटलेला'मधील लक्ष्याची आवडी आठवतेय का?, सध्या या मालिकेत करतेय काम
13
"संतोष देशमुखांच्या कार्याने गावाला दिल्लीचा मान"; मस्साजोगच्या सरपंचांना PM मोदींकडून निमंत्रण
14
"Muscles असलेल्या बिपाशाशीच लग्न कर", म्हणणाऱ्या मृणाल ठाकूरला अभिनेत्रीचं चोख उत्तर, म्हणाली- "एक स्त्री..."
15
कबुतरखाना बंदी वाद राज ठाकरेंनी मध्यस्थी करून संपवावा; जैन मुनींनी घातली साद, म्हणाले...
16
SBI च्या ग्राहकांना मोठा झटका! १५ ऑगस्टपासून 'या' सेवेसाठी लागणार शुल्क, वाचा नवे नियम
17
पुढच्या ५ वर्षात २० हजार जणांना नोकरी देण्याचं लक्ष्य; PWC कंपनीने जाहीर केले 'व्हिजन २०३०'
18
ऑपरेशन सिंदूरवेळी सीमेवरील गावातील ग्रामस्थांनी केलं असं काम, आता सरपंचांचा स्वातंत्र्य दिनी होणार सन्मान
19
'या' देशात वडील मुलाला देतात कंडोम तर आई बॅगेत गर्भनिरोधक गोळ्या ठेवते; कारण ऐकून हैराण व्हाल
20
500 KM रेंज देणारी Maruti e-Vitara किती तारखेला लॉन्च होणार? खास असतील फीचर्स, जाणूनघ्या किंमत!

१0 आरोपींना दोन वर्षांचा कारावास

By admin | Updated: September 3, 2015 01:50 IST

शेतशिवारात इ-क्लास जमिनीवरून मारहाणीच्या घटनेप्रकरणी दहा आरोपींना प्रत्येकी दोन वर्षांच्या सश्रम कारावासाची शिक्षा.

वाशिम : रिसोड तालुक्यातील वनोजा शेतशिवारात इ-क्लास जमिनीवरून उद्भवलेल्या मारहाणीच्या घटनेप्रकरणी परस्पर विरोधी खटल्यातील दहा आरोपींना प्रत्येकी दोन वर्षांच्या सश्रम कारावासाची शिक्षा येथील प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्यायाधीश विजय आर. सिकची यांनी ३१ ऑगस्ट रोजी सुनावली. रिसोड तालुक्यातील वनोजा शेतशिवारात १७ जून २0१३ रोजी घडली होती. सदर घटनेबाबत फिर्यादी मधुकर चोखाजी मैंदकर व दुसरे फिर्यादी राहुल नारायण मैंदकर यांनी रिसोड पोलीस स्टेशनला परस्परविरुद्ध फिर्याद दाखल केली होती. फिर्यादी मधुकर मैंदकर यांनी आरोपी नारायण तानाजी मैंदकर, राहुल नारायण मैंदकर, भास्कर श्रीधर मैंदकर, दिलीप श्रीधर मैंदकर, राजाराम सदाशिव मैंदकर, श्रीराम सदाशिव मैंदकर चंद्रभागा नारायण मैंदकर व किसनाबाई बंडुजी टाले व रणजित बंडुजी टाले यांनी आपण वहिती करीत असलेल्या इ-क्लास जमिनीबाबत वाद घालून आपणांस तसेच मुले रवींद्र, नितेश, राहुल व पत्नीस काठी व कुर्‍हाडीने मारहाण करुन जीवे मारण्याची धमकी दिल्याचे म्हटले तर गैअर्जदार राहुल नारायण मैंदकर यांनी दाखल केलेल्या फिर्यादीत आरोपी मधुकर चोखाजी मैंदकर, राहुल मधुकर मैंदकर, रवींद्र ऊर्फ पिंटू मधुकर मैंदकर, दीपक मधुकर मैंदकर, नितेश मधुकर मैंदकर, अविनाश मधुकर मैंदकर, शीलाबाई मधुकर मैंदकर व रणजित बंडुजी टाले यांनी इ-क्लास जमिनीच्या वादावरुन आपणास व नातेवाइकास काठी, कुर्‍हाड व विळय़ाने मारहाण करून जीवे मारण्याचा प्रयत्न केला आहे, असे नमूद केले. याप्रकरणी तपास अधिकार्‍यांनी तपास पूर्ण करून फिर्यादी मधुकर मैंदकर यांच्या प्रकरणात आरोपी विरुद्ध कलम १४७, १४८, १४९, ३२४, ३२३, ५0४, ५0६ अन्वये गुन्हा दाखल करुन प्रकरण न्यायप्रविष्ट केले. दुसरे फिर्यादी राहुल मैंदकर यांच्या प्रकरणात आरोपीविरुद्ध कलम १४५, १४७, १४८, १४९, ३0७, ५0४ व ५0६ भादंवि अन्वये गुन्हा दाखल करून प्रकरण न्यायप्रविष्ट केले होते. दरम्यान, घटनेतील आरोपी रणजित टाले याचा मृत्यू झाल्यामुळे कलम ३0२ सह कलम म्हणून नंतर समाविष्ट करण्यात आले होते. या प्रकरणात दोन्ही बाजूचे एकूण १८ साक्षीदार तपासण्यात आले. साक्षी पुरावे व परिस्थितीजन्य पुरावा तसेच दोन्ही पक्षाच्या युक्तीवादावरून आरोपी नारायण मैंदकर, राहुल मैंदकर, भास्कर मैंदकर, दिलीप मैंदकर, राजाराम मैंदकर व श्रीराम मैंदकर यांना तसेच आरोपी मधुकर मैंदकर, रवींद्र ऊर्फ पिंटू मैंदकर, दीपक मैंदकर व नितेश मैंदकर या आरोपींना कलम ३२४ अंतर्गत प्रत्येकी दोन वर्षाचा सश्रम कारावास व प्रत्येकी एक हजार रुपये दंडाची शिक्षा येथील प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश विजय सिकची यांनी सुनावली. सदर परस्पर विरोधी खटल्यात सरकारी वकील अँड. अरुण सरनाईक व अँड. छायाताई मवाळ यांनी सरकार पक्षातर्फे युक्तिवाद केला.