शिरपूर जैन: मालेगाव तालुक्यातील शिरपूर येथे १ कोटी रुपये खर्चून दुय्यम निबंधक प्रथम श्रेणी कार्यालय उभारण्यात आले आहे. संरक्षण भिंत वगळता या इमारतीचे काम पूर्ण झाले असून, केवळ विज जोडणी न मिळाल्याने या इमारतीचे लोकार्पण रखडले आहे. त्यामुळे ही इमारत शोभेची वास्तू ठरत आहे.मालेगाव तालुक्याचे दुय्यम निबंधक कार्यालय पूर्वीपासूनच शिरपूर येथे आहे. हे जुने कार्यालय आकाराने लहान असल्याने या ठिकाणी अधिकारी, कर्मचाऱ्यांसह व्यवहारासाठी येणाऱ्या जनतेला अडचणींचा सामना करावा लागत होता. दरम्यानच्या काळात शासनाने राज्यातील सर्वच निबंधक कार्यालयाच्या नविन इमारती बनविण्याचा निर्णय घेतला होता. शासनाच्या या निर्णयामुळे शिरपूर येथील दुय्यम निबंधक कार्यालयाच्या इमारतीचा प्रश्नही निकाली लागला. येथील इमारतीसाठी शासनाकडून निधी मंजूर झाला आणि या इमारतीचे बांधकाम २०१३ मध्ये सुरू झाले. त्यानंतर काही दिवसांतच नविन सुसज्ज इमारत निर्माण होऊन १ वर्षापेक्षा अधिक काळ लोटला आणि विद्युत उपकरणाच्या वापरासाठी इमारतीत फिटिंगचे कामही पूर्ण करण्यात आले आणि विज जोडणीसाठी महावितरणकडे अर्जही सादर करण्यात आला; परंतु मागील सहा सात महिन्यांपासून विज जोडणीच झाली नसल्याने या इमारतीचे लोकार्पण करून कामकाजाला सुरूवात होऊ शकली नाही.
विज जोडणीअभावी १ कोटीची इमारत निकामी
By admin | Updated: April 22, 2017 18:31 IST