शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "उद्या रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
4
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
5
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
6
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
7
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
8
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
9
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
10
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
11
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
12
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
13
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
14
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
15
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
16
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
17
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
18
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
19
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
20
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
Daily Top 2Weekly Top 5

जि.प.च्या ‘त्या’ 15 जागा आता होणार खुल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2021 00:03 IST

पंचायत समितीच्या रिक्त १४ जागांपैकी ८ खुला प्रवर्ग, तर ६ जागांवर आरक्षण राहणार

हितेन नाईक

पालघर : सर्वोच्च न्यायालयाने  जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमधील ५० टक्क्यांपेक्षा अधिक आलेले आरक्षण कमी केल्याने पालघर जिल्हा परिषदेच्या ५७ जागांपैकी रिक्त झालेल्या १५ जागा आता खुल्या राहणार आहेत. तसेच पंचायत समितीच्या रिक्त झालेल्या १४ जागांपैकी ८ खुला प्रवर्ग तर ६ जागांवर आरक्षण राहणार आहे. 

सर्वोच्च न्यायालयाने सन २०१० च्या निर्णयानुसार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत आरक्षण ५० टक्क्यांपेक्षा अधिक असू नये, असे स्पष्ट केले होते; परंतु पालघरसह  राज्यातील अन्य काही जिल्हा परिषदांनी निवडणूक आयोगाच्या निर्देशाप्रमाणे निवडणुका घेऊन निवडून आलेल्या उमेदवारांची नावे प्रसिद्ध केली होती. याविराेधात सर्वोच्च न्यायालयातील रिट याचिकेवर झालेल्या निर्णयानुसार नागरिकांच्या मागास प्रवर्गातील निवडून आलेल्या उमेदवारांची निवडणूक रद्द करत जिल्हा परिषदेच्या १५ तर चार पंचायत समितीमधील १४ सदस्यांचे सदस्यत्व रद्द केले होते. त्यानुसार पुन्हा एकदा सर्वोच्च न्यायालयाने आरक्षण मर्यादा ५० टक्क्यांपेक्षा अधिक करता येणार नाही, असा निर्वाळा देताना जेथे आधीच अनुसूचित जमातीचे आरक्षण ५० टक्क्यांपेक्षा जास्त आहे, तेथे इतर मागासवर्गाचे आरक्षण रद्द केले आहे. जेथे अनुसूचित जमातीचे आरक्षण ५० टक्क्यांपेक्षा कमी आहे, तेथे उर्वरित जागा इतर मागासवर्गासाठी आरक्षित होणार आहेत.

दरम्यान, पालघर जिल्हा परिषदेच्या १५ सदस्यांची व पंचायत समिती १४ सदस्यांची निवड रद्द झाली असून पालघर जिल्हा परिषदेची सदस्यसंख्या ५७ आहे. येथे अनुज्ञेय ५० टक्के आरक्षण २८ जागांवर देणे शक्य आहे. मात्र, येथे अनुसूचित जमातींसाठी ३७ जागा, अनुसूचित जातीसाठी एक जागा व इतर मागासवर्गासाठी १५ जागा असे आरक्षण होते म्हणजे ७५ पैकी ५३ जागा आरक्षित व अवघ्या चार जागा खुल्या होत्या. अशा पद्धतीने ९३ टक्के जागा आरक्षित होत्या. आता अनुसूचित जमातीच्या ३७ व अनुसूचित जातीची १ अशा ३८ जागा आरक्षित राहतील व रद्द झालेल्या सर्व १५ जागा खुल्या वर्गात जातील. अर्थात यापैकी अर्ध्या जागा सर्वसाधारण महिलांसाठी राखीव असतील, असे असले तरी रद्द झालेल्या सर्व सदस्यांना खुल्या जागांवर निवडणूक लढविण्याचा पर्याय खुला राहिला आहे.

पालघर, वाडा, डहाणू, वसई नगरपंचायतींमध्ये असे असेल चित्र

nवाडा तालुका पंचायत समितीच्या १२ जागा आहेत. येथे ६ जागांवर आरक्षण अनुज्ञेय आहे. येथेही आधीच ७ जागा अनुसूचित जमातीसाठी राखीव असल्याने रद्द झालेली १ जागा खुली होईल. nडहाणू तालुका पंचायत समितीच्या एकूण २६ जागा आहेत. येथे १३ जागांवर आरक्षण अनुज्ञेय आहे. येथे आधीच अनुसूचित जमातीसाठी आधीच २० जागा आरक्षित असल्यामुळे आरक्षण कमी करण्यासाठी रद्द झालेल्या दोन जागा खुल्या होतील. 

nपालघर : पालघर तालुका पंचायत समितीमध्ये ३४ जागा आहेत, त्यापैकी १७ जागांवर आरक्षण अनुज्ञेय आहे. येथे अनुसूचित जातीसाठी १ व जमातीसाठी ११ जागा आरक्षित आहेत. एकूण १२ जागा आरक्षित झाल्यानंतरही येथे आणखी पाच जागा अनुज्ञेय आहेत. यामुळे येथून रिक्त झालेल्या ९ जागांपैकी ५ जागा इतर मागास-वर्गीयांसाठी आरक्षित राहतील व उर्वरित ४ जागा खुल्या होतील. 

nवसई तालुका पंचायत समितीमध्ये ८ जागा आहेत. येथे ४ जागांवर आरक्षण अनुज्ञेय आहे. आधीच ३ जागा अनुसूचित जमातींसाठी राखीव असल्या, तरी येथे आणखी १ जागा आरक्षित करणे शक्य असल्याने येथील रद्द झालेल्या २ जागांपैकी १ जागा इतर मागासवर्गीयांसाठी आरक्षित राहील व १ जागा खुली होईल.

टॅग्स :Vasai Virarवसई विरारzpजिल्हा परिषद