पालघर : मुलींना योग्य वयात मासिक पाळीबाबत माहिती झाल्यास अनेक आरोग्य विषयक समस्या सोडविण्यास सहाय्य होते. त्या उद्देशाने जिल्हा परिषदेच्या पाणी व स्वच्छता विभागा मार्फत पालघर आणि डहाणू तालुक्यातील जिल्हा परिषद शाळेतील विध्यार्थिनीना ‘‘पॅडमॅन’’ हा चित्रपट दाखिवण्यात आला.किशोरवयीन मुलीना मासिक पाळी व्यवस्थापन आणि वैयक्तिक स्वच्छतेबाबत जागरूक करणे आणि त्यांना सेनेटरी नैपिकन (स्वच्छता पॅड ) चा वापर करण्यासाठी प्रवृत्त करणे हे अत्यंत महत्वपूर्ण आहे, असे प्रतिपादन यावेळी पालघर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मिलिंद बोरीकर यांनी या कार्यक्र माच्या निमित्ताने केले.पालघर तालुक्यातील आंबोडे, चाहडे, किराट, महागाव, नांदगाव, नावली, पारगाव, शीगाव, सोमटे आणि टेंभोडे येथील जि. प. शाळेतील सहाशे विध्यार्थिनी सहभागी झाल्या होत्या.डहाणू तालुक्यातील आंबेसरी, आंबोली, अशागड, बंधघर, बेंडगाव, बोर्डी, चंद्रानगर, चारोटी, चिखले, चिंचणी , दापचारी, गंजाड, घोलवड, कैनाड , कंक्र ाडी , कासा, कोल्हान, मल्यान, निकने, पाले, रंकोळ , सावटे आणि सायवन गावातील बाराशे मुली सहभागी झाल्या होत्या.यावेळी पालघर येथे पाणी व स्वच्छता विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी संघरत्ना खिल्लारे आणि शिक्षण अधिकारी (प्रा) संगीता भागवत तसेच शिक्षक उपस्थित होते. जिल्ह्यातील तलासरी, वसई, विक्र मगड, वाडा, मोखाडा आणि जव्हार या तालुक्यात सुद्धा ‘‘पॅडमॅन’’ चित्रपट जिल्हा परिषदेतील विद्यार्थिनींना दाखिवण्यात येणार आहे.
जि.प. विद्यार्थिनींसाठी पॅडमॅनचा विशेष प्रयोग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 29, 2018 00:16 IST