शहरं
Join us  
Trending Stories
1
विनाशाची ढगफुटी! पृथ्वी कोपली तर केलेल्या चुकांची माफी मागण्याची संधीदेखील देणार नाही
2
थोडीथोडकी नाही...! इथेनॉल-मिश्रित पेट्रोलमुळे मायलेजमध्ये १५-२०% घट; वाहन मालकांचा सर्व्हे आला...
3
भारताला ५० टक्क्याचा शॉक; ट्रम्प यांनी दुप्पट केले टॅरिफ; काय होणार परिणाम?
4
काटली जवळ हिट अँड रन, मॉर्निंग वॉकला गेलेले तीन युवक ठार; मालवाहू ट्रक बनला काळ!
5
घरात शिरला, दरवाजा लावला, मित्राच्या पत्नीला संपवलं अन्...; तरुणाच्या कृत्याने परिसर हादरला!
6
Donald Trump US Tariffs: लेदरपासून ज्वेलरीपर्यंत… डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफचा कुठे-किती होणार परिणाम? पाहा संपूर्ण यादी
7
रशियाशी व्यापार केल्याबद्दल फक्त भारतालाच का लक्ष्य केले? ट्रम्प म्हणाले, 'आता फक्त ८ तास...'
8
आजचे राशीभविष्य, ०७ ऑगस्ट २०२५: चिंतामुक्त व्हाल, हाती पैसा राहील; यशाचा शुभ दिवस
9
Raksha Bandhan 2025:रक्षाबंधनाला 'या' पाच गोष्टी औक्षण थाळीत असायलाच पाहिजेत!
10
तिसरा श्रावण शुक्रवार: शुभ-पुण्य मिळेलच, लक्ष्मी देवी वरदान देईल; ‘असे’ करा वरदलक्ष्मी व्रत
11
पक्के घर देण्याचा वादा तीन वर्षांनंतरही पूर्ण हाेईना; महाराष्ट्रात ‘पीएम आवास’ ची २७ लाख घरे अद्याप अपूर्ण
12
बुमराहच्या अनुपस्थितीत भारताने मिळवलेला विजय योगायोगच! हा गोलंदाज ‘असामान्य आणि अविश्वसनीय’ प्रतिभेचा धनी - सचिन तेंडुलकर 
13
डोनाल्ड ट्रम्पच्या प्रयत्नांनाही पुतिन बधले नाहीत! चीनसोबत युद्धाची तयारी सुरू; पुढे काय करणार?
14
पाकिस्तान-अमेरिकेत नक्की काय सुरू? आधी तेलाचा करार, मग टॅरिफही कमी केला; आता असिम मुनीर USच्या वाटेवर!
15
मतदार यादीतील ६५ लाख नावे का वगळली हे सांगा, बिहारवरून सुप्रीम कोर्टाचे  आयोगाला आदेश
16
घरे, झाडे सर्व काही गाडले, हाती काही लागेना; मानवाच्या हव्यासाने आले संकट
17
डोनाल्ड ट्रम्प भारतात राहायला येणार? रहिवासी प्रमाणपत्रासाठी केला अर्ज! प्रशासनाची कोंडी
18
सावरकर सदन: वारसास्थळ दर्जाचा लवकरच निर्णय; महापालिकेची हायकोर्टात माहिती; अभिनव भारत काँग्रेसची याचिका
19
रेपो दर जैसे थे; कर्ज हप्ता राहणार स्थिर; ‘ट्रम्प टॅरिफ’च्या पार्श्वभूमीवर रिझर्व्ह बँकेचा निर्णय
20
दिव्याखाली अंधार! हा घ्या, अमेरिकेने रशियाकडून केलेल्या आयातीचा हिशेब

धोकादायक, खराब रस्त्याविरोधात तरुणांचा एल्गार

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 16, 2019 01:05 IST

मूलभूत अधिकारानुसार तक्रार दाखल : महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी मागितली दाद

पालघर : मनोर - वाडा - भिवंडी महामार्गावरील खड्ड्याने आतापर्यंत शेकडो निष्पाप बळी घेतले असून पालघर - बोईसर प्रमुख मार्गही खड्ड्यांमुळे धोकादायक बनला आहे. अशा असुविधांच्या विरोधात एकत्र येत आपल्या अधिकारांबाबत न्यायालयात दाद मागण्याचे सोनोपंत दांडेकर विधी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी ठरविले आहे.

जिल्ह्यात वर्षानुवर्षे खराब तसेच खड्डेयुक्त रस्त्यांमुळे विविध ठिकाणी अपघातात अनेक निष्पापांचे बळी जाण्याचे सत्र काही कमी होताना दिसत नाही. विक्रमगडमधील रस्त्यांचे आयआयटीकडून स्पेशल आॅडिट करण्यात आले असताना आणि त्यात गंभीर बाबी दिसून आल्यावरही एकाही ठेकेदारविरोधात कोणीही कारवाई केलेली दिसत नाही.

जिल्ह्याती प्रमुख राज्य मार्ग, जिल्हा मुख्यालय ते औद्योगिक विकास महामंडळ तसेच शहरांना जोडणाऱ्या रस्त्यावरून दररोज विविध शाळा कॉलेजचे विद्यार्थी, शासकीय कर्मचारी ये-जा करीत असतात.असे असूनही रस्त्यांची अवस्था दयनीय आहे. राज्य महामार्गाची अशी अवस्था असेल तर इतर रस्त्यांबाबत न बोललेच बरे असे विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे.यासंबंधी सार्वजनिक बांधकाम विभाग आणि पालघर जिल्हाधिकारी यांना लेखी निवेदन देण्यात आले. तसेच ‘आपले सरकार’ तक्रार निवारण अ‍ॅपमार्फत सदर निवेदन थेट मंत्रालयात पाठविण्यात आले आहे.‘जगण्याचा मूलभूत अधिकार पायदळी तुडवला जातो’भारतीय राज्य घटना अनुच्छेद २१ नुसार प्रत्येक भारतीयांस जगण्याचा तसेच व्यक्ती स्वातंत्र्याचा अधिकार देण्यात आलेला आहे. खराब, धोकादायक रस्त्यांमुळे जाणारे बळी पाहता आम्हा भारतीयांच्या ‘जगण्याचा मुलभूत अधिकार’ दररोज पायदळी तुडवला जात असतानाही आपण गप्प बसून आहोत. म्हणूनच आम्ही सोनोपंत दांडेकर विधी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन आमच्या अधिकाराबाबत दाद मागण्याचे ठरवल्याचे विधी महाविद्यालयाचे विद्यार्थी प्रथमेश प्रभूतेंडोलकर यांनी सांगितले.