शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

प्रियकराने लग्नास नकार दिल्याने तरुणीची आत्महत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 5, 2020 05:43 IST

तक्रार देऊनही पोलिसांनी दुर्लक्ष केल्यामुळे मुलीने आपले जीवन संपवल्याचा आरोप तिच्या कुटुंबीयांनी केला

नालासोपारा : लग्नाचे आमिष दाखवून वारंवार शरीरसंबंध ठेवले, मात्र नंतर प्रियकराने लग्नाला नकार दिल्याने येथील एका १९ वर्षीय तरुणीने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. याप्रकरणी तक्रार देऊनही पोलिसांनी दुर्लक्ष केल्यामुळे मुलीने आपले जीवन संपवल्याचा आरोप तिच्या कुटुंबीयांनी केला आहे.आरोपी सुनील माने (२८) याने नालासोपाऱ्यात राहणाºया तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर अनेक वेळा बलात्कार केला, मात्र नंतर त्याने लग्नास नकार दिला. याविरोधात तरुणीने तुळिंज पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली, परंतु पोलिसांनी तक्रारीची दखल घेतली नाही. उलट, यामध्ये त्या तरुणीचीच चूक असल्याचे पोलिसांनी तिला सांगितल्यामुळे ती नैराश्यात गेली आणि तिने आपले जीवन संपवले, असा आरोप तिच्या कुटुंबीयांनी केला आहे. या प्रकरणात सहायक पोलीस निरीक्षक दीपक गिरकर यांनी तरुणीच्या आईशीही अपमानजनक वर्तन केल्याचा आरोप होत असून नातेवाइकांनी मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला होता. मात्र, डीसीपी विजयकांत सागर यांनी केलेल्या विनंतीनंतर मृतदेह ताब्यात घेऊन शनिवारी रात्री उशिरा अंत्यसंस्कार करण्यात आले. नालासोपारा येथील अन्सारी नगरात राहणारा आरोपी सुनील माने याला अटक करण्यात आली आहे. तिच्या घरात दोन सुसाईड नोट सापडल्या असून त्या पोलिसांनी ताब्यात घेतल्या आहेत. तरुणीची आई पोलिसांकडे या प्रकरणी तक्रार दाखल करायला गेली असता सहाय्यक पोलीस निरीक्षक गिरकर यांनी तिला अपमानजनक प्रश्न विचारल्याचा आरोप तरुणीच्या आईने केला आहे. तरुणीच्या आईने डीसीपी विजयकांत सागर यांच्याकडेही तक्रार केली असून डीवायएसपी अश्विनी पाटील या सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक गिरकर यांची चौकशी करीत आहेत.

टॅग्स :Suicideआत्महत्या