शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण-इस्रायल संघर्षामुळे सोन्याचे दर भडकले! आठवड्यात ३,६४५ रुपयांची वाढ; आजचे दर काय?
2
विजय रुपाणींच्या मृतदेहाची DNA चाचणीनं ओळख पटली; संध्याकाळी कुटुंबाला सोपवणार मृतदेह
3
'टीम इंडिया'तून वगळलेल्या सरफराज खानचे 'वनडे स्टाईल' शतक, बुमराहला एकही विकेट नाही, ऋतुराजही अपयशी
4
दिवसा काम, रात्री अभ्यास! मोबाईल कव्हर विकणारा रोहित होणार डॉक्टर; NEETमध्ये रचला इतिहास
5
दोन्ही पत्नी अन् आता गर्लफ्रेंडही हिंदू, मग मुलांची नावं मुस्लिमच का? आमिर खान म्हणाला...
6
काव्या मारनसोबतच्या अफेअरच्या चर्चांवर संगीतकार रविचंदरने सोडलं मौन; म्हणाला, "लग्न...?"
7
'फादर्स डे': विराट कोहलीसाठी लेक वामिकाने बनवलं खास ग्रिटींग कार्ड, लिहिलाय खास संदेश
8
परिसरात किती पाणी भरलंय? लगेच कळणार; शहरात रडार लेव्हल ट्रान्समीटर बसवले!
9
"हे गोंधळ पसरवण्यासारखे ..."; एअर इंडियाच्या विमान अपघातावर तुर्कीचे विधान; मेंटनन्स कंपनीवर स्पष्टीकरण दिले
10
इराण-इस्त्रायल युद्धात पाकिस्ताननं घेतली भूमिका; मुस्लीम देशांना एकजूट होण्याचं आवाहन
11
जावेसमोर पतीची चप्पल मांडीखाली लपवली अन् फसली; पतीची हत्या करुन मृतदेहाचे तुकडे लपवले खड्ड्यात
12
बेडरूममधल्या 'या' ३ गोष्टी लगेचच फेका; श्वास घेण्यास त्रास आणि रात्रीची झोपही होईल खराब
13
Mumbai Local: मुंबई लोकलमध्ये आता ज्येष्ठ नागरिकांचा डबा
14
पाक सीमेजवळ विमानांचे उड्डाण धोक्याचे, ४६५ वेळा जीपीएसमध्ये छेडछाडीच्या घटना!
15
'टेस्ट चॅम्पियन' टेम्बा बवुमाचा चिमुरड्या लेकाला सोबत घेऊन 'विक्टरी वॉक', पाहा क्यूट Video
16
पुढील २४ तासांसाठी 'या' जिल्ह्यांना रेड तर ६ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट; वीज पडून ८ जण दगावले
17
Bhushan Gavai: संविधान हा सतत विकसित होणारा दस्तऐवज- सरन्यायाधीश
18
तिरुअनंतपुरममध्ये ब्रिटिश लढाऊ विमान F-35 चे आपत्कालीन लँडिंग; धोकादायक विमान भारतात का आले?
19
केंद्र सरकारतर्फे ५ लाखांपर्यंत मोफत उपचार! 'आयुष्मान ॲप'वरून कार्ड कसं डाउनलोड करायचं?
20
Radhika Subramaniam : कमाल! भारताची पहिली AI ट्रॅव्हल इन्फ्लुएन्सर, देशाची सफर घडवणाऱ्या राधिकाला पाहिलंत का?

युवा शेतकऱ्याचा अननस लागवडीचा प्रयोग; पथदर्शी उपक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 1, 2021 23:20 IST

अनिरुद्ध पाटील बोर्डी : उत्तर कोकणात अननस पिकासाठी पोषक जमीन व हवामान आहे. मात्र, पहिल्यांदाच डहाणू तालुक्यात या पिकाची ...

अनिरुद्ध पाटीलबोर्डी : उत्तर कोकणात अननस पिकासाठी पोषक जमीन व हवामान आहे. मात्र, पहिल्यांदाच डहाणू तालुक्यात या पिकाची प्रायोगिक तत्त्वावर लागवड करण्यात आली असून, उत्पादनाला प्रारंभ झाला आहे. दरम्यान, पर्यटन आणि वाइन निर्मितीला शासनाने चालना देण्याचे धोरण जाहीर केल्याने, आगामी काळात या पिकाचे क्षेत्र वाढण्याचा विश्वास कृषी विभागाने व्यक्त केला आहे.

डहाणू तालुका कृषी विभागातर्फे पारंपरिक आणि नव्या शेतपिकांना चालना देण्यासाठी विविध उपक्रम राबविले जातात, तर आधुनिक शेतीचे तंत्र आणि पीक पद्धतीचा प्रयोग करणाऱ्या शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्याला प्रोत्साहित केले जाते. दरम्यान, सरावली मानफोड येथे नोशीरवान पोलाड या तिशीतील तरुणाने अननस लागवड केली आहे. हा युवक मुंबईत पदवीपर्यंतचे शिक्षण घेऊन डहाणूत आला आणि बावीसाव्या वर्षांपासून कुटुंबाच्या पारंपरिक चिकू बागेत फळपीक शेतीकडे वळला.

दोन वर्षांपूर्वी बंगलोर येथून विल्यम या अननसाचे वाण १२ रुपये नगाप्रमाणे १० हजार सकर्स आणले. सरी वरंब्यावर ४ बाय २ फूट अंतरावर त्याची लागवड केली. खताच्या योग्य मात्रेसह उन्हाळ्यात ७ दिवस, तर हिवाळ्यात १० दिवसांच्या अंतराने पाण्याच्या पाळ्या देण्यात आल्या. १८ ते २० महिन्यांत उत्पादन सुरू झाल्याचे पोलाड यांनी सांगितले. या पिकावर कीडरोगाचा प्रादुर्भाव होत नसल्याने दर्जेदार उत्पादन सुरू असून, स्थानिक बाजारात ७० रुपये प्रतिकिलो मिळतात. अन्य फळे मुंबई बाजारात निर्यात केली जातात.

टॅग्स :FarmerशेतकरीVasai Virarवसई विरार