शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

दीड वर्षांपासून ‘त्या’ सेवानिवृत्तांना पेन्शन नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 21, 2020 00:06 IST

पालघर जिल्हा परिषदेतील अनेक विभागांत टपून बसलेल्या झारीतल्या शुक्राचार्यांना वेळीच वेसण घालण्यात अपयश आल्याने टेबलावर वजन ठेवल्याशिवाय फाइल पुढे सरकतच नसल्याच्या तक्रारी उपाध्यक्ष निलेश सांबरे यांच्याकडे आल्या होत्या.

- हितेन नाईक।पालघर : कर्मचारी निवृत्त झाल्यानंतर पहिल्या महिन्यापासूनच संबंधित कर्मचाऱ्याला निवृत्तीवेतन मिळाले पाहिजे, असे शासनाचे निर्देश असताना पालघर जिल्हा परिषदेच्या १ जानेवारी २०१९ पासून सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांपैकी १४१ कर्मचाºयांना अद्याप पेन्शन मिळालेली नाही. ही प्रलंबित ठेवलेली प्रकरणे येत्या आठ दिवसांत निकाली काढा, अन्यथा कारवाईला सामोरे जा, असा सज्जड दमच जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष निलेश सांबरे यांनी नुकत्याच झालेल्या बैठकीत दिला आहे.पालघर जिल्हा परिषदेतील अनेक विभागांत टपून बसलेल्या झारीतल्या शुक्राचार्यांना वेळीच वेसण घालण्यात अपयश आल्याने टेबलावर वजन ठेवल्याशिवाय फाइल पुढे सरकतच नसल्याच्या तक्रारी उपाध्यक्ष निलेश सांबरे यांच्याकडे आल्या होत्या. त्याचे पडसाद ११ मे रोजीच्या जिल्हा परिषदेच्या सभेत उमटले होते. जिल्हा परिषदेच्या विविध विभागांतर्गत १ जानेवारी २०१९ ते ३० एप्रिल २०२० दरम्यान विविध विभागांतून सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाºयांपैकी शिक्षण विभाग ७४, पाणीपुरवठा, पशुसंवर्धन, कृषी विभाग प्रत्येकी १, ग्रामपंचायत ९, बांधकाम १०, पाटबंधारे ३, सामान्य प्रशासन ८, आरोग्य विभाग ९ अशी एकूण १४१ प्रकरणे एक वर्ष पाच महिन्यांपासून अडकून पडली होती.कर्मचारी निवृत्त होण्याच्या सहा महिन्यांपूर्वी निवृत्तीवेतनाच्या कागदपत्रांची पूर्तता संबंधित कर्मचाºयांच्या विभागप्रमुखांनी तयार करून जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाºयांकडे पाठवणे अपेक्षित असते. त्यांनी मंजुरी दिल्यानंतर हे प्रकरण जिल्हा परिषदेच्या लेखा विभागाकडे जाऊन त्यांच्या मंजुरीनंतर निवृत्तीधारकाला निवृत्तीवेतन चालू होते. कर्मचारी निवृत्त झाल्यानंतर पहिल्या महिन्यापासूनच संबंधित कर्मचाºयाला निवृत्तीवेतन मिळाले पाहिजे, असे शासनाचे निर्देश असताना जवळपास वर्षभर सुमारे १४१ कर्मचाºयांची प्रकरणे पडून होती. काही निवृत्तीधारकांनी या प्रकरणी उपाध्यक्ष सांबरे यांची भेट घेत पेन्शन सुरू न झाल्याने घरातील आर्थिक गणित कोलमडल्याची व्यथा त्यांच्या कानी घालून या प्रकरणी लक्ष घालण्याची विनंती केली होती. ११ मे रोजी झालेल्या बैठकीआधीच सर्व प्रकरणांचा तपशील हाती घेत उपाध्यक्षानी संबंधित विभागप्रमुखांना धारेवर धरले.कर्मचाºयांना माराव्या लागतात फेºयाशिक्षण विभागाकडे एकूण ७४ निवृत्त शिक्षकांची प्रकरणे गेले वर्षभर प्रलंबित होती. या प्रकरणांत विविध त्रुटी असल्याने पूर्तता केल्यानंतर ७३ निवृत्त शिक्षकांची प्रकरणे पुढील कार्यवाहीसाठी पाठविण्यात आली असून एका प्रकरणात तांत्रिक त्रुटी असल्याने प्रकरण प्रलंबित असल्याचे शिक्षण विभागाकडून सांगण्यात आले.याबरोबरच मेडिकल बिलाची प्रकरणेही मोठ्या संख्येने कार्यालयात पडून असून ती बिले काढण्यासाठी कर्मचाºयांना अनेक फेºया माराव्या लागत आहेत. वजन ठेवल्याशिवाय कामे होत नाहीत, असेही या कर्मचाºयांकडून सांगितले जात आहे.

टॅग्स :palgharपालघर