शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
2
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
3
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
4
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
5
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
6
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
7
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
8
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
9
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
10
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
11
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
12
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
13
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
14
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
15
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
16
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
17
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
18
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
19
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
20
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
Daily Top 2Weekly Top 5

यादव म्हात्रे खून खटला, पोलिस अधिकाऱ्यांविरुद्ध होणार अ‍ॅट्रॉसिटी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 20, 2018 05:47 IST

तिघांना गोवले : अनुसूचित जमाती आयोगाचे आदेश

वसई : गेली ३० वर्षे गाजत असलेल्या वसई पूर्व पट्टीतील कामण गावातील यादव म्हात्रे खून खटला अंतीम टप्प्यात आला असून, या प्रकरणी दोषी पोलीस अधिकाºयांवरच आता अ‍ॅट्रॉसिटीचे गुन्हे दाखल होणार असल्याची माहिती या खून खटला प्रकरणाचे प्रत्यक्ष साक्षिदार तथा तक्र ारदार गंगाधर म्हात्रे यांनी राष्ट्रीय अनुसूचित जमाती आयोग, दिल्ली यांच्या निर्देशावरून दिली, वसई पुर्व पट्टीतील कामण येथीस सामाजिक कार्यकर्ते यादव म्हात्रे यांची २९ जुन १९८७ ला गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती.

या गुन्ह्यात म्हात्रे यांचे बंधु गंगाधर म्हात्रे हे प्रत्यक्षदर्शी साक्षीदार होते. त्यांच्या साक्षेवरून सुरवातीला खºया मारेकºयांना अटक करण्यात आली होती. त्यानंतर हे प्रकरण राज्य गुन्हे अन्वेषण विभागाकडे सोपवण्यात आले होते. या विभागाचे पोलीस निरिक्षक सुदर्शन एरागुंठाराव आणि एस. एम. पिंपळकर यांनी खºया आरोपींना वाचवण्यासाठी गणपत तुंबडा, त्याची मुले अशोक आणि दिलीप या आदिवासींना या प्रकरणात गोवले. दरम्यान, या तिघांनी हा गुन्हा आपल्या नावावर घ्यावा यासाठी त्यांना पोलीस कोठडीत त्यावेळी अमानुष मारहाण ही करण्यात आली होती. त्यानंतर जामीनावर सुटल्यावर गणपत तुंबडा आणि अशोकचा मृत्यू झाला, तर दिलीपला कायमचे अपंगत्व आले. मात्र, गंगाधर म्हात्रे यांची साक्ष आणि त्यांनी सादर केलेल्या पुराव्यामुळे तिन्ही आदिवासींची २९ वर्षानंतर न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली.एकूणच पोलीसांनी खºया आरोपींना वाचवण्यासाठी या तिघांना गोवून त्यांच्या कुटुंबांचे आयुष्य उध्वस्त केले. त्यामुळे संबंधीत दोषी पोलीस अधिकाºयांवर अ‍ॅट्रॉसिटी अन्वये गुन्हे दाखल करण्यात यावे, आणि आदिवासी कुटुंबाला भरपाई मिळावी अशी मागणी गंगाधर म्हात्रे, भूमी सेनेचे नेते काळुराम धोदडे, राजु पांढरा यांनी केली होती.भरपाई व कार्यवाहीची मागणीत्यावर या आयोगाने सुनावणी घेताना संबंधीत दोषी पोलीस अधिकाºयांवर अ‍ॅट्रॉसिटी कायद्याखाली कारवाई करण्यात यावी. तर नाहक गोवल्या गेलेल्या आदिवासींच्या कुटुंबांना पुरेशी भरपाई देण्यात यावी. स्वत:ला निर्दोष सिद्ध करण्यासाठी आदिवासींना स्वत:ची मालमत्ता विकावी लागल्यामुळे पालघर जिल्हाधिकाºयांनी त्यांना पाच एकर जमीन द्यावी. अशा शिफारसी या आयोगाच्या सदस्या माया इनवटे यांनी शासनाकडे केल्या असून या सुनावणीच्या वेळी कोकणविभागिय पोलीस अधिक्षक के. व्ही. निजाई, वसईचे तहसिलदार वाय. सी. पाटील आदी अधिकारी उपस्थित होते. परिणामी या निकालामुळे वसईमध्ये खळबळ उडाली असून आयोगाच्या शिफारशीनुसार आता संबंधित दोषी पोलीस अधिकाºयांवर त्वरित अत्याचार प्रतिबंधक कायदाखाली चौकशी अंती गुन्हे दाखल होणार हे निश्चित झाले असून पुन्हा मागासवर्गीय अधिकाºयाकडूनच या प्रकरणाचा तपास करून ३० दिवसात अहवाल सादर करावा असे ही आयोगाने म्हंटले आहे.

टॅग्स :PoliceपोलिसVasai Virarवसई विरार