शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेश सीमेलगतच्या जिल्ह्यांत मतदारांची संख्या अचानक वाढली; भाजप म्हणतेय मुस्लिम, तृणमूल म्हणतेय हिंदू...
2
एअर इंडिया १३ वर्षांपूर्वी करोडोंचे विमान विसरली; कोणालाच माहिती नव्हती, कोलकाता विमानतळाने...
3
तर ती आज माझ्यासोबत असली असती...! माधुरी दीक्षितसोबत लग्नाच्या मागणीवर सुरेश वाडकर आजही...
4
G20 शिखर परिषदेने परंपरा मोडली; अमेरिकेच्या बहिष्काराला न जुमानता ठराव मंजूर केला...
5
बाप आहे की राक्षस ! सोबत झोपणाऱ्या १४ वर्षांच्या मुलीवर केले अत्याचार; मुलीने दिला बाळाला जन्म
6
एकनाथ शिंदेंच्या बहिणीने साथ सोडली, अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश; भावाकडून प्रतिसादच मिळेना...
7
हिडमाच्या मृत्यूनंतर नक्षलवादी मोहिमेला मोठा धक्का; 37 नक्षलवाद्यांचे एकाचवेळी आत्मसमर्पण...
8
मुंबई, पुण्यापेक्षा नागपुरात अधिक प्रदूषण ! एक्यूआय इंडेक्सने स्पष्ट, नागरिकांनो ही काळजी घ्या
9
आम्ही नितीश सरकारला पाठिंबा देण्यास तयार आहोत, पण..; असदुद्दीन ओवैसींचे मोठे वक्तव्य
10
हृदयद्रावक! १३ महिन्यांचा मुलगा दूध समजून प्यायला ड्रेन क्लीनर; जीभ भाजली, कायमचा गेला आवाज
11
दिल्ली बॉम्बस्फोटानंतर अचानक पाकिस्तानला जाणारे फोन कॉल्स कमी झाले; तपास यंत्रणाही हैराण
12
खळबळजनक! एक्स्ट्रा मॅरिटल अफेयरसाठी वन अधिकाऱ्याने पत्नीसह २ लेकरांना संपवलं अन्...
13
सेलिब्रेशन! स्मृती मानधनाच्या लग्नापूर्वी वधू-वराचे संघ भिडले; कोण जिंकले, पलाशचे आता काही खरे नाही...
14
G20 मधून जागतिक विकासाच्या मॉडेलवर PM मोदींची टीका; मांडले तीन प्रस्ताव, जाणून घ्या...
15
Video: सोलापूर-हैदराबाद महामार्गावर भीषण अपघात; ३ महिला ठार, तर १२ भाविक गंभीर जखमी
16
महाविकास आघाडीत बिघाडी? मनसेला सोबत घेण्यावरुन संजय राऊतांचा काँग्रेसला टोला
17
माणुसकीच नाही! पत्नीच्या डिलिव्हरीसाठी मागितली सुटी; बॉस म्हणतो, 'वर्क फ्रॉम हॉस्पिटल' कर अन्...
18
भीषण अपघातात प्रसिद्ध पंजाबी गायकाचा मृत्यू, ३७ व्या वर्षीच घेतला जगाचा निरोप, दिली होती अनेक सुपरहिट गाणी
19
फेल, फेल, सपशेल...! होंडाने Activa ईव्ही जानेवारीत आणली, आता उत्पादन बंद केले; गिऱ्हाईकच मिळेना...
20
दीपिकाच्या ८ तासांची शिफ्ट अटीवर रेणुका शहाणेची प्रतिक्रिया; म्हणाली, "अमान्य असेल तर..."
Daily Top 2Weekly Top 5

गुन्हा दाखल न करताच रेतीचे ट्रक सोडल्याने संताप ; केली दंडात्मक कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2018 03:16 IST

रेतीची चोरटी वाहतूक करणारे तीन ट्रक ताब्यात घेतल्यानंतर संबंधितांवर गुन्हे दाखल न करताच दंडात्मक कारवाई करून ट्रक सोडून देण्यात आल्याने महसूल खात्याचे अधिकारी रेती चोरांना अभय देत असल्याचा आरोप करण्यात येत आहे.

- शशी करपेवसई : रेतीची चोरटी वाहतूक करणारे तीन ट्रक ताब्यात घेतल्यानंतर संबंधितांवर गुन्हे दाखल न करताच दंडात्मक कारवाई करून ट्रक सोडून देण्यात आल्याने महसूल खात्याचे अधिकारी रेती चोरांना अभय देत असल्याचा आरोप करण्यात येत आहे.रेतीची चोरटी वाहतूक करणारे तीन ट्रक नायब तहसिलदार हरिश्चंद्र जाधव यांनी पकडले होते. पकडलेले ट्रक मनवेलपाडा पोलीस चौकीत नेण्यात आले होते. दोन दिवस ट्रक पोलीस चौकीजवळ ठेवण्यात आले होते. मात्र, संबंधितांवर दोन दिवसात गुन्हा दाखल करण्याची कोणतीही कारवाई करण्यात आली नाही. मात्र, दंडात्मक कारवाई करून ट्रक सोडून देण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.याप्रकरणी नायब तहसिलदार जाधव यांनी ट्रक पकडण्यात आल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला. दंडात्मक रक्कम भरल्याने कारवाई करण्याचा प्रश्नच उरत नसल्याचे त्यांनी सांगितले. पुढील कारवाई तहसिलदार करणार असल्याचे त्यांनी सांगितले. तहसिलदार किरण सुरवसे यांच्याशी संपर्क साधला असता दंडात्मक कारवाई केल्यावर दंडाची रक्कम भरल्यावर गुन्हा दाखल करण्याची आवश्यकता नसल्याचे त्यांनी सांगितले.वसई विरार परिसरात सध्या चोरटे रेती उत्खनन आणि चोरटी वाहतूक मोठ्या प्रमाणावर होत आहे. पोलीस, महसूल विभागाचा वरदहस्त असल्याने सुट्टीच्या दिवशी आणि रात्रभर मुंबई परिसरात मोठ्या प्रमाणावर चोरटी रेती वाहतूक केली जाते. त्यात पकडलेल्या ट्र्कवर फौजदारी कारवाई न करता फक्त दंडात्मक कारवाई करूनसोडून दिले जात आहे. त्यामुळे चोरटी रेती वाहतूकीला महसूल खात्याकडूनच पाठिंबा दिला जात असल्याचाआरोप केला जातो. त्यातच रेतीवाले ब-याचदा महसुल अधिकाºयांवरहल्ले करण्याचे प्रकारही सुरु असल्याने कर्मचारी हतबल होतत असे चित्र आहे.

टॅग्स :Vasai Virarवसई विरार