शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

विविध प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी महिला झाल्या आक्रमक 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 5, 2021 00:23 IST

विक्रमगड पं.स.वर धडक : तालुका स्थापन झाल्यापासून समस्या, मागण्यांकडे प्रशासनाचे दुर्लक्ष

लोकमत न्यूज नेटवर्क विक्रमगड : स्वतंत्र विक्रमगड तालुका स्थापन करण्यात आल्यापासून अनेक समस्या जनतेला भेडसावत आहेत, मात्र शासन या समस्या सोडविण्यासाठी कुठे तरी कमी पडत आहे. विक्रमगड तालुक्यातील अनेक पक्ष, संघटनांनी विविध समस्या, प्रश्न घेऊन मोर्चे, आंदोलने केली, मात्र समस्या सुटत नाहीत. यामुळे आता विक्रमगड तालुक्यातील महिला आक्रमक झाल्या असून त्यांनी सोमवारी विक्रमगड पंचायत समितीवर धडक दिली.

अखिल भारतीय जनवादी महिला संघटनेने पुढाकार घेऊन तालुक्यातील समस्या सोडविण्यासाठी विक्रमगड पंचायत समितीवर सोमवारी धडक मोर्चा काढला. या आंदोलनात विविध मागण्यांवर चर्चा करण्यासाठी महिला येणार असतानाच आंदोलनकर्त्यांना गेटवर अडवण्यात आले. त्यामुळे काही वेळ तणाव निर्माण झाला. नंतर शिष्टमंडळाला बोलावण्यात आले. खावटी योजनेचा लाभ गरजू कुटुंबांना देण्यात यावा, आरोग्य उपकेंद्राच्या सुविधेत सुधारणा करण्यात यावी, रेशनिंग समस्या व विभक्त रेशनकार्डधारकाला धान्य मिळावे, संजय गांधी निराधार योजनेची काटेकोर अंमलबजावणी करणे आणि गरजूंना लाभ मिळावा, रोजगार हमी योजनेअंतर्गत प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये जास्तीत जास्त कामे काढावी, तालुक्यातील पाणीटंचाई दूर करावी, ग्रामीण भागातील अनेक रस्ते नादुरुस्त व रस्ते नसलेल्या गावपाड्यात रस्ते बनवावे, विद्युत समस्या व जास्तीची वीजबिल आकारणी करून चाललेली जनतेची लूट थांबवण्यात यावी, महिलांची सुरक्षा, डोल्हारी खुर्द व पोचाडा अंगणवाडी सेविका तसेच अंगणवाडी समस्या, घरोघरी शौचालये योजनेतून उपलब्ध व्हावीत, घरकुल योजनेतून गरजूंना लाभ मिळावा व रद्द झालेली घरकुले मंजूर करण्यात यावी, तालुक्यातील कुर्झे येथील बेकायदेशीर सुरू असलेला मूण ॲग्रो कत्तलखाना बंद करणे, जांभा ग्रामपंचायत कार्यालय हे जांभा गावठाणातच बांधण्यात यावे आदी विविध मागण्यांसाठी हा मोर्चा काढण्यात आला.

या वेळी अखिल भारतीय जनवादी महिला संघटना महाराष्ट्र राज्य सचिव प्राची हातीवळीकर, जिल्हा सचिव लहानू दौडा, जिल्हा खजिनदार सविता शिंगडा, विक्रमगड तालुका अध्यक्ष सुंदर काकड, तालुका सचिव गिरजी कानल, महिला कार्यकर्त्या ताई बेंदर व मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे विक्रमगड तालुका सचिव किरण गहला, माकपा जि. सदस्य राजा गहला, विलास गहला, टोलुराम चौधरी, चिंतू कानल आदी उपस्थित होते.