शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

विरारमध्ये पिशवीत आढळले महिलेचे मुंडके

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 14, 2025 10:03 IST

मांडवी पोलिसांनी महिलेचे मुंडके ताब्यात घेऊन पंचनामा करत गुन्हा दाखल केला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क, नालासोपारा (मंगेश कराळे) :- मुंबई अहमदाबाद महमार्गावरील विरारच्या मौजे टोकरे येथील विरार फाट्याकडे जाणाऱ्या रोडवरील पिरकुंडा दर्ग्याच्या पुढे एका बॅगेतील पिशवीत महिलेचे मुंडके गुरुवारी संध्याकाळच्या सुमारास आढळल्याने खळबळ उडाली आहे. घटनास्थळी मांडवी पोलिसांसह पोलीस उपायुक्त जयंत बजबळे, सहायक पोलिस आयुक्त बजरंग देसाई यांनी भेट दिली आहे. मांडवी पोलिसांनी महिलेचे मुंडके ताब्यात घेऊन पंचनामा करत गुन्हा दाखल केला आहे.

गुरुवारी संध्याकाळी एका तरुणांचा ग्रुप मांडवी जवळील शिरवली गावात येथे जात होता. काही तरुण शिरवली येथील पिरकुंडा दर्गाजवळ असलेल्या आडोशाला लघुशंकेसाठी गेले होते. तेथे या तरुणांना एक ट्रॅव्हलिंग बॅग दिसली. त्यांनी बॅग उचकटल्यावर त्यातील एका पिशवीमध्ये महिलेचे मुंडके होते. यामुळे एकच खळबळ उडाली. त्यांनी त्वरित ही बाब स्थानिक मांडवी पोलिसांना कळवली.

मांडवी पोलिसांनी घटनास्थळी पाहणी केली असता एक रिकामी सुटकेस देखील आढळून आली. त्यात काही वस्तू होत्या. त्यामुळे या महिलेच्या मृतदेहाचे अन्य तुकडे याच परिसरात टाकले असण्याची शक्यता आहे. त्यामुळे सध्या पोलीस या परिसराचा शोध घेत आहेत. या महिलेची ओळख पटवण्याचे कामही सुरू आहे. या परिसरात शोध घेऊन हत्येचा सुगावा मिळविण्याचा पोलीस प्रयत्न करत आहेत.  

ही कवटी महिलेची असून किमान चार ते पाच दिवसांपूर्वी टाकलेली असावी अशी शक्यता मांडवी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय हजारे यांनी वर्तवली.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी