शहरं
Join us  
Trending Stories
1
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
4
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
5
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
6
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
7
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
8
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
9
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
10
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
11
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
12
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
13
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
14
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
15
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
16
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
17
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
18
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
19
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
20
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

नवघर पूर्वेतील मिठागर वस्त्यांचे पुनर्वसन होणार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 15, 2019 00:37 IST

वसई पूर्वेकडील नवघर मिठागरांमधील वस्त्यांमध्ये दरवर्षी मोठ्या प्रमाणावर पाणी साचते.

वसई : वसई पूर्वेकडील नवघर मिठागरांमधील वस्त्यांमध्ये दरवर्षी मोठ्या प्रमाणावर पाणी साचते. त्यामुळे येथील नागरी वसाहतीचा इतर सर्व यंत्रणा तसेच शहरांतील नागरिकांशी पावसाळ्यात दरवर्षी संपर्क तुटतो.दरवर्षीच्या या समस्येवर कायमस्वरूपी उपाय योजना म्हणून या मिठागर वस्त्यांचे पुनर्वसन करता येईल का, तसेच त्या वस्त्यांसाठी अन्य पर्यायांद्वारे काही उपाययोजना करण्यात याव्यात, अशा सूचना पालघर जिल्हाधिकाऱ्यांनी नुकत्याच (नमक) मीठ विभागाला दिल्या आहेत.वसई पूर्वेकडील मिठागरांमध्ये दरवर्षी मोठ्या प्रमाणावरपाणी साचते. पावसात पूर येऊन संपूर्ण वसाहत पाण्याखाली जाऊन मिठागर वस्तीत पूरपरिस्थिती निर्माण होते तर बरेच दिवस त्यांचा संपर्कही होत नाही.या मिठागर नागरी वसाहतीत साधारण २५० लोकांची वस्ती आहे. या ठिकाणी गुडघाभर किंवा त्यापेक्षा अधिक पटीने पावसाचे पाणी भरल्यानंतर येथील नागरिकांना स्थलांतरित करावे लागते. यंदा देखील येथे पाणी साचून संपूर्ण वसाहत पाण्याखाली गेली होती. प्रत्येक वेळी ही परिस्थिती उद्भवू नये यासाठी या वस्तीमधील नागरिकांसाठी आता कायमस्वरूपी उपाययोजना करण्यात येणार आहेत.वसई - नवघर येथील मिठागरे ही सखल भागांत उभी असून हा परिसर सीआरझेड आरक्षित भाग नकाशावर दिसतो आहे.याठिकाणी समुद्रवजा खाडीचे पाणी अडवून त्याद्वारे मिठाचे उत्पादन घेण्यात येते. त्यामुळे येथे पावसाळ्यात पाणी येणे ही नैसर्गिक प्रक्रि याअसून त्याला आपण बाधा आणू शकत नाही. त्यासाठी येथील वस्तीतील नागरिकांचे पुनर्वसन करता येईल का, यावर पालघर जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे यांनी मीठ विभागाशी नुकत्याच झालेल्या आढावा बैठकीत चर्चा केली. यामध्ये जिल्हाधिकाऱ्यांनी या नागरिकांसाठी उपाययोजना करण्यात याव्या, अशा सूचना दिल्या.>पुनर्वसन हाच उपाय !या नवघर पूर्वेस राहणारे नागरी वसाहतीतील सगळीच लोकं काही मिठागराचे उत्पादन घेत नसून पूर्वीपासून करत आलेले काही थोडे फार नागरिक हे उत्पादन घेतात. त्यातील अनेक जण मीठ उत्पादन कमी घेतात व अन्य वेगळा जोडधंदा करतात. यासाठी त्यांच्या पुनर्वसनाचा पर्याय महसूल विभागाने पुढे रेटणे आवश्यक आहे.>महसूल खात्याची अडचणमिठागरे हा ना विकास क्षेत्र भाग म्हणून घोषित आहे. या ठिकाणी विकास कामे करता येणार नाहीत. यासाठी महसूल विभागाला मीठ विभागाच्या आयुक्तांशी चर्चा करून तसा कृती आराखडा तयार करायला लागेल. जागोजागी पाणथळ प्रदेश आहेत. त्यामुळे खूप मोठी कायद्याची अडचण असल्याने महसूल विभागाचे हात कायद्यानेच बांधले आहेत.