शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
2
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
3
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
4
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
5
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
6
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
7
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
8
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
9
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
10
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
11
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
12
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
13
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
14
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
15
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
16
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
17
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन
18
राजा रघुवंशी हत्याकांडाची पुनरावृत्ती; पैसे देऊन गुंड बोलावले, पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं!
19
आम्ही मोसादचं हेडक्वार्टर उडवलं, इस्रायली मिलिट्री इंटेलिजन्सलाही निशाणा बनवलं; इराणचा मोठा दावा
20
IND vs ENG : तेंडुलकर-अँडरसन ट्रॉफीसह आता मालिका विजेत्या कर्णधाराला दिले जाणार 'पतौडी मेडल'

मीरा-भाईंदरमध्ये क्लस्टर लागू करणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आश्वासन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 14, 2022 09:59 IST

लोकमत न्यूज नेटवर्क  मीरा रोड : मीरा-भाईंदरमधील जुन्या व धोकादायक इमारतींच्या पुनर्विकासासाठी ठाण्याच्या धर्तीवर क्लस्टर योजना लागू करण्यात येणार ...

लोकमत न्यूज नेटवर्क मीरा रोड : मीरा-भाईंदरमधील जुन्या व धोकादायक इमारतींच्या पुनर्विकासासाठी ठाण्याच्या धर्तीवर क्लस्टर योजना लागू करण्यात येणार आहे. त्याचसोबत झोपडपट्टीमुक्त शहर करण्यासाठी शहरात झोपडपट्टीवासीयांना इमारतीत पक्की घरे देण्यासाठी एसआरए योजनाही लागू करू, अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भाईंदर येथील मीरा-भाईंदर संस्कृती आर्ट फेस्टिव्हलमध्ये दिली. 

प्रताप सरनाईक फाउंडेशन व संस्कृती युवा प्रतिष्ठान आदींच्या वतीने इंद्रलोक येथील बाळासाहेब ठाकरे मैदानात आयोजित आर्ट फेस्टिव्हलचा समारोप सोमवारी रात्री मुख्यमंत्री शिंदे यांच्या उपस्थितीत झाला. यावेळी खासदार राजेंद्र गावित, आमदार प्रताप सरनाईक, गीता जैन, प्रकाश सुर्वे यांच्यासह जिल्हाधिकारी अशोक शिनगारे, पालिका आयुक्त दिलीप ढोले, माजी आमदार गिल्बर्ट मेंडोन्सा, मुझफ्फर हुसेन, नरेंद्र मेहता आदींसह अनेक माजी नगरसेवक, पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी कुमार विश्वास यांच्या कविता व मिश्कील टिप्पण्यांच्या कार्यक्रमाचा मुख्यमंत्र्यांनी आनंद घेतला. 

मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, मेट्रो कारशेडच्या जागेला लोकांचा विरोध आहे. कारशेड उत्तन येथे न्यायचा आहे. मीरा-भाईंदरची मेट्रो आमदार सरनाईक यांनी आणली व त्यासाठी त्यांनी आंदोलने केले. त्यात आम्हीही सहभागी होतो. सूर्या पाणीपुरवठा योजना, शहरातील रस्ते काँक्रीटचे करण्यासाठी निधी दिला आहे. दहीसर-भाईंदर रस्ताही आम्ही करणार आहोत, ज्यामुळे टोल नाक्यातून सुटका हाेणार आहे. आम्ही काम करायला लागल्याने काही जण आता रस्त्यावर फिरायला लागले आहेत, असा टाेला त्यांनी नाव न घेता उद्धव ठाकरे यांना लगावला.  भाषण सुरू असताना वीज गुल मुख्यमंत्र्यांचे भाषण सुरू असताना काही वेळ वीज गेल्याने काळोख झाला. त्यावर भाषण बंद करू का? पोलिस आयुक्तांनी वीज घालवली का? असा मिश्कील टोला मुख्यमंत्र्यांनी लगावला.