शहरं
Join us  
Trending Stories
1
संसदेत काय घडतेय? पंतप्रधान मोदी आणि प्रियांका गांधी, सुप्रिया सुळे यांच्यात चाय पे चर्चा...; कटुता विसरून रंगल्या गप्पा
2
पंतप्रधान मोदींनी ओमानमध्ये कानातले घातले? व्हायरल व्हिडिओमागचे सत्य आले समोर; जाणून घ्या नेमका प्रकार काय!
3
भारताच्या 'शांती' कायद्यामुळे पाकिस्तान टेन्शनमध्ये! म्हणाला, 'आम्ही जवळून नजर ठेवणार, कारण...'
4
बांगलादेश विसरा, चीन अन् पाकिस्तान एकत्र येऊनही भारताच्या 'चिकन नेक'ला धक्का लावू शकत नाहीत
5
एअरटेलच्या नेतृत्वात मोठे फेरबदल; शाश्वत शर्मा असणार नवीन सीईओ, का घेतला अचानक निर्णय?
6
Video - संतापजनक! दह्याच्या प्लेटमध्ये मेलेला उंदीर; प्रसिद्ध ढाब्यावरील किळसवाणा प्रकार
7
काश्मीरमधील जलविद्युत प्रकल्पातील २९ कर्मचाऱ्यांचे दहशतवाद्यांशी संबंध, धक्कादायक माहिती समोर  
8
Video - "आई, माझ्यावर दया करा"; बायकोला घरी पाठवण्यासाठी सासूच्या पाया पडला जावई
9
मुंबईत शिंदेसेनेला ८४ जागा सोडण्यासही भाजपाचा स्पष्ट नकार; दोन्ही पक्षाकडून स्वबळाची तयारी?
10
ओलाचा शेअर रॉकेट बनला, झटक्यात 10% नं भाव वाढला; मालकानं घेतला मोठा निर्णय
11
बँका सेवांवरील शुल्क वाढवणार, अनेक सुविधा बंद करण्याच्या तयारीत; ग्राहकांसाठी निराशाजनक बातमी
12
२०२६ संपूर्ण वर्ष लाभ, ४ राशींचा भाग्योदय; ४ ग्रह गोचराने इच्छापूर्ती, मनात आणाल ते मिळेल!
13
"मला पॅनिक अटॅक यायचे", आईवडिलांच्या घटस्फोटावर पहिल्यांदाच बोलली गिरिजा ओक, म्हणाली- "त्यांच्या नात्यात..."
14
नवीन वर्ष २०२६: सुख-समृद्धीसाठी ९ प्रभावशाली उपाय, जे बदलून टाकतील तुमचे संपूर्ण आयुष्य!
15
१९७१ नंतरचं सर्वात मोठं संकट, बांगलादेशमधील अस्थिरतेमुळं भारतासमोर ५ मोठी आव्हाने
16
Osman Hadi : कोण आहे हा उस्मान हादी? ज्याच्या मृत्यूने पुन्हा पेटला बांगलादेश; डोक्याला लागली होती गोळी
17
'म्हाडाची जमीन हडपल्याप्रकरणी मंगेश कुडाळकरांवर गुन्हा दाखल करा'; विशेष न्यायालयाचे भ्रष्टाचार प्रतिबंधक विभागाला निर्देश
18
घराणेशाहीचा वाद! "BMC Election is not a Family Business" भाजपा सचिवाचं अमित साटम यांना पत्र
19
भारतीय जर्सी घालून पाकिस्तानी खेळाडू भारताकडून खेळला; आता पाक फेडरेशन कारवाई करणार
20
किंगफिशर एअरलाइन्सच्या माजी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! ईडीने ३१२ कोटी रुपये केले परत
Daily Top 2Weekly Top 5

बीजेपी के इम्पोर्टेड कँडिडेट राजेंद्र गावित को इतना गुस्सा क्यूं आया ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2018 06:09 IST

या जिल्हयातील कॉंग्रेसचा चेहरा असणाऱ्या व तीला मोदीलाटेतही जिल्हयात जिवंत ठेवणा-या माजी राज्यमंत्री राजेंद्र गावीत यांना पक्षत्याग करावा व कमळाबार्इंच्या वळचणीला जावे एवढा संताप कशामुळे आला असा प्रश्न अनेक काँग्रेस जनांना पडला आहे.

- नंदकुमार टेणीपालघर  - या जिल्हयातील कॉंग्रेसचा चेहरा असणाऱ्या व तीला मोदीलाटेतही जिल्हयात जिवंत ठेवणा-या माजी राज्यमंत्री राजेंद्र गावीत यांना पक्षत्याग करावा व कमळाबार्इंच्या वळचणीला जावे एवढा संताप कशामुळे आला असा प्रश्न अनेक काँग्रेस जनांना पडला आहे. परंतु पक्षनिष्ठा राखल्यानंतरही त्यांची जी कोंडी पक्षात केली गेली त्यामुळे त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलले आहे.पूर्वी डहाणू मतदारसंघ असे पालघर मतदारसंघाचे नाव दामू शिंगडा यांनी अनेकदा येथून खासदारकी मिळविली होती, काहीही झाले तरी आपल्यालाच काँग्रेसची उमेदवारी आणि खासदारकी मिळावी हा त्यांचा अट्टाहास होता. वयोमान झाले तरी आपला पुत्र सचिन याला वारसा हक्काने काँग्रेसने उमेदवारी द्यावी अशीही त्यांची इच्छा होती त्या दृष्टीकोनातून त्यांनी आयुष्यभर राजकारण केले. परंतु राजेंद्र गावीतांच्या रूपाने आदिवासी समाजातील नवे नेतृत्व उभे राहू लागताच त्याची कोंडी शिंगडा यांनी सुरू केली.गेली दहा वर्षे आधी बविआचे बळीराम जाधव आणि नंतर चिंतामण वनगा यांच्याकडून शिंगडा हे पराभूत झाले. तर २००९ ते २०१४ या काळात राजेंद्र गावीत हे आदिवासी विकास राज्यमंत्री होते त्यांनी कामही चांगले केले. त्यामुळे त्यांची कोंडी करण्याचे प्रयत्न शिंगडा व त्यांच्या समर्थकांनी अधिक जोमाने सुरू केले होते. पक्षाच्या जिल्हा संघटनेत त्यांना मोठे पद मिळू नये असाच त्यांचा प्रयत्न राहीला. या सगळया प्रयत्नांचा कळस पालघर नगरपालिकेच्या आणि २०१४ च्या लोकसभा निवडणूकीच्या वेळी झाला. पालघर नगरपालिकेची निवडणूक गावीत यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसने लढविली शिवसेना, राष्टÑवादी व काँग्रेस असा तिरंगी सामना होता. केवळ गावीत यांचे नाक कापण्यासाठी शिंगडा समर्थकांनी शिवसेनेच्या पारडयात आपले वजन टाकले आणि स्वपक्षाच्याच उमेदवारांचा पराभव घडवून आणला.२०१४ च्या लोकसभा निवडणूकीच्या वेळी राहुल गांधी यांच्या पुढाकाराने नवनिर्मित पालघर लोकसभा मतदारसंघातून राजेंद्र गावीत यांना काँग्रेसची उमेदवारी देण्यात आली त्यावेळीही मला नाही तर माझा पुत्र सचिन याला उमेदवारी द्या असा हट्ट शिंगडा यांनी धरला एवढेच नव्हे तर पक्षाचे अधिकृ त उमेदवार गावीत यांच्या विरोधात त्यांनी व त्यांचा पुत्र सचिन यांनी उमेदवारी दाखल केली. भाजपचा उमेदवार विजयी झाला तरी चालेल पण काहीही झाले तरी गावीतांना विजयी होऊ देणार नाही. अशी टोकाची भूमिका त्यांनी घेतली.राजेंद्र गावीतांच्या उमेदवारीची संपूर्ण जिल्हयात होर्डींग्ज लागली होती. असे असतांनाही शिंगडा आणि त्यांचे पुत्र सचिन यांच्या बंडाला घाबरून काँग्रेसने ऐन वेळी राजेंद्र गावीतांची उमेदवारी रद्द केली खरे म्हणजे त्याच वेळेस गावीत हे काँग्रेसचा त्याग करण्याच्या विचारात होते परंतु त्यांनी तेव्हा संयम दाखविला. २०१४ च्या निवडणूकीत राज्यात आणि केंद्रात भाजपा, सेना सत्तेवर आली अशा वेळी परभवाने खच्ची झालेल्या काँग्रेस पक्षाचे पालघर जिल्हयात नामोनिशाणही उरले नव्हते.जिल्हयातील ६ विधानसभा मतदारसंघापैकी नालासोपारा, वसई, बोईसर येथे बविआचे आमदार विक्रमगड येथे भाजपचे सवरा आमदार, डहाणू येथे भाजपचे धनारे आमदार आणि पालघर येथे आधी शिवसेनेचे कृष्णा घोडा व त्यांच्या निधनानंतर त्यांचे पुत्र अमित घोडा असे आमदार निवडून आलेत. विधान परिषदेचे आमदार आनंद ठाकूर वगळता काँग्रेस-राष्टÑवादीचा एकही आमदार जिल्हयात नव्हता. जिल्हा परिषद, जिल्हा बँक, वसई-विरार महापालिका, जिल्हयातील नगरपालिका आणि नगरपंचायती यातही कॉंग्रेसचा पार सफाया झालेला अशा स्थितीत ज्या गावीतांनी काँग्रेसचा झेंडा फडकवीत ठेवला. वास्तविक त्यांना जिल्हा काँग्रेसचे अध्यक्षपद देणे आवश्यक होते परंतु शिंगडा गटाच्या विरोधामुळे ते केदार काळे या कोणतीही ठोस अशी पार्श्वभूमी नसलेल्या कार्यकर्त्याला दिले गेले. वय आणि अनुभव याने गावीतांच्या मानाने ते कितीतरी कनिष्ठ तरी त्यांच्या नेतृत्वाखाली माजी राज्यमंत्री असलेल्या गावीतांना कार्य करायला लावून त्यांची मानखंडना केली गेली. जिल्हयात वेगवेगळया प्रश्नांवर ठाम भूमिका घेणे, आंदोलने उभारणे, नैसर्गिक आपत्तींच्या वेळी पिडीतांना पक्ष पातळीवर आर्थिक मदत करणे अशा अनेक बाबी पक्षासाठी गावीतांनी केल्या परंतु त्याची कोणतीही पावती केवळ शिंगडांच्या विरोधामुळे काँग्रेसने त्यांना दिली नाही.आता या पोटनिवडणूकीच्या वेळीही गावीत यांचे नाव उमेदवारीसाठी आघाडीवर होते. शिंगडा यांचे वय आणि आजवरची निष्क्रीय कारकिर्द त्याला कारणीभूत होती परंतु त्यांनी या वेळीही मागील निवडणूकीच्या वेळचा गावीत विरोधाचा पवित्रा घेतला, काँग्रेसची उमेदवारी फक्त मला आणि मलाच मिळायला हवी अन्यथा मी बंडखोरी करेन अशी अडेलतट्टू भूमिका त्यांनी केंद्रीय निरिक्षकांपुढे मांडली त्यामुळे गावीतांचे नाव मागे पडू लागले.ंसततच्या अपमानामुळे स्वाभिमान जपण्यासाठी वेगळा विचार करायलाच हवा या भूमिकेतून गावीत अन्यपर्यायांचा विचार करीत असतांना भाजपने त्यांना आपले दार उघडले. आता भाजपची उमेदवारी स्वीकारण्याचा गावीतांचा निर्णय कितपत योग्य आहे हे काळ ठरवेल परंतु शिंगडांच्या आडमुठ्ठ्या भूमिकेमुळे व त्यापुढे काँग्रेसश्र्रेष्ठींच्या झुकण्याच्या परंपरेमुळे जिल्हयातून काँग्रेस नेस्तनाबूत होईल एवढे नक्की.

टॅग्स :Palghar bypoll 2018पालघर पोटनिवडणूक 2018newsबातम्या