शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
5
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
6
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
7
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
8
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
9
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
10
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
11
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
12
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
13
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
14
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
15
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
16
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
17
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
18
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
19
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
20
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
Daily Top 2Weekly Top 5

वसई पंचायत समितीत कुणाची येणार सत्ता?

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 10, 2020 01:02 IST

वसई तालुक्यात पंचायत समितीवर कोणाचीही एकहाती सत्ता न आल्याने आता कोणत्या तरी दोन पक्षांना हातमिळवणी करून सत्ता स्थापन करावी लागणार आहे.

पारोळ : वसई तालुक्यात पंचायत समितीवर कोणाचीही एकहाती सत्ता न आल्याने आता कोणत्या तरी दोन पक्षांना हातमिळवणी करून सत्ता स्थापन करावी लागणार आहे. आठ गण असलेल्या पंचायत समितीमध्ये बहुजन विकास आघाडी ३, शिवसेना ३ आणि भाजपा २ असे उमेदवार निवडून आले आहेत. बहुमताचा पाच हा आकडा कोणत्याही राजकीय पक्षाने पार केला नसल्याने आता बहुजन विकास आघाडी आणि शिवसेनेला सत्ता स्थापन करायची असल्यास त्यांना मदतीची गरज भासणार आहे. तर, दुसरीकडे भाजपने आपले पत्ते उघड केले नसून त्यांनी सध्या ‘वेट अ‍ॅण्ड वॉच’ची भूमिका घेतली आहे.तालुक्याच्या पंचायत समितीवर बहुजन विकास आघाडीची सत्ता होती तर विधानसभा निवडणुकीत या पक्षाचे तीन आमदार निवडून आल्याने पक्षाची ताकद वाढली होती. त्यामुळे या पंचायत समिती निवडणुकीत बहुजन विकास आघाडीची सत्ता येईल असे जाणकारांचे मत होते. पूर्व भाग हा या पक्षाचा बालेकिल्ला असल्याने भाताणे गटावर या पक्षाची सत्ता अवलंबून होती, पण भाताणे गटात आणि भाताणे, मेढे, गणात शिवसेना व श्रमजीवी संघटनेने युती करून नाराजीचा फायदा घेत बहुजन विकास आघाडीचा हा बालेकिल्ला ताब्यात घेतला. तर तिल्हेर शिवसेना, कळंब आणि अर्नाळा किल्ला गण भाजपने काबीज केले. त्यामुळे बहुजन विकास आघाडीला सत्तेपासून मुकावे लागले. आता सत्तेसाठी कोणकोणाला मदत करते, याकडे तालुक्याचे लक्ष आहे. तर जिल्ह्यात कोण युती तसेच आघाडी करते यावरही वसई पंचायत समिती स्थापनेचे सत्ता समीकरण अवलंबून आहे.>वसईत सत्तेसाठी भारतीय जनता पार्टी महत्त्वाचा घटक असून बहुजन विकास आघाडी वा शिवसेनेसोबत सत्तेत जायचे हे आता वरिष्ठ पातळीवर ठरवले जाईल.- मनोज पाटील,उपाध्यक्ष, वसई विरार भाजपा>वसई पंचायत समितीत सेनेने ३ जागा जिंकल्या असून असून सत्तेसाठी भाजपला सोबत घेण्याची बोलणी सुरू आहेत. युती झाल्यास सभापती व उपसभापती याबाबत चर्चेतून निर्णय घेतला जाईल.- विजय पाटील, शिवसेना नेते