शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

आरटीओच्या पाटीचे ‘ते’ वाहन कुणाचे?

By admin | Updated: February 8, 2017 03:54 IST

महाराष्ट्र गुजरात सीमा भागात आरटीओची पाटी लावून फिरणाऱ्या खाजगी वाहनाने दहशत निर्माण केली आहे. या प्रमुख राज्य मार्गावर अवैध तसेच

बोर्डी : महाराष्ट्र गुजरात सीमा भागात आरटीओची पाटी लावून फिरणाऱ्या खाजगी वाहनाने दहशत निर्माण केली आहे. या प्रमुख राज्य मार्गावर अवैध तसेच अवजड वाहतूक अव्याहतपणे सुरू आहे. त्याचा लाभ उठविण्याचे सत्र हे वाहन करीत असल्याने त्याची चौकशी करण्याची मागणी केली जात आहे. महाराष्ट्र गुजरात सीमा भागात डहाणू बोर्डी हा प्रमुख राज्य मार्ग आणि उंबरगाव वेवजी- तलासरी हा राज्य मार्ग आहे. या मार्गावरून लगतच्या उंबरगाव, भिलाड, वापी या ठिकाणी जीआयडीसीत आणि दमण तसेच सिल्व्हासा या केंद्रशासित प्रदेशाकडे जाणारी वाहने धावत असतात. मुंबई- अहमदाबाद या राष्ट्रीय मार्गावरून क्षमतेपेक्षा अधिक अवजड मालाची वाहतूक केल्यास दंड आकारणी आणि टोल वसूल केली जाते. ती टाळण्यासाठी या राज्य मार्गांचा वापर मागील दोन वर्षांपासून सुरू आहे. मार्गाची दुरावस्था, वाढते अपघात तसेच गैरप्रकार आदींमध्ये वाढ झाली आहे. मात्र परिवहन विभाग कारवाई करीत नाही.शनिवार, ४ फेब्रुवारी रोजी पांढऱ्या रंगाचे खाजगी वाहन आरटीओची पाटी लावून सीमा भागातील रस्त्यांवरून फिरत होते. त्यामुळे वाहतूक नियमांचा आधार घेत दंड वसूली केली जाईल या भीतीने स्थानिक वाहन चालकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते. मात्र, अवजड आणि अवैध वाहतूक करणाऱ्या वाहनांवर त्याचा काहीच परिणाम दिसून येत नव्हता. या पद्धतीने बेकायदेशीर पाट्या लावून गैरमार्गाने माया जमविणारी टोली सक्रीय झाल्याची चर्चा आहे. त्यामुळे परिवहन विभागाने हा नेमका प्रकार काय आहे याची चौकशी करणे अत्यावश्यक आहे. ती न झाल्यास रहिवासी स्वत: या वाहनाला आडकाठी करून शहनिशा करतील असा इशारा स्थानिकांनी आरटीओ आणि पोलिसांना दिला आहे. (वार्ताहर)