शहरं
Join us  
Trending Stories
1
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
2
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
3
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
4
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
5
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
6
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
7
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
8
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
9
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
10
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
11
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
12
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
13
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
14
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
15
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
16
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
17
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
18
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
19
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
20
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
Daily Top 2Weekly Top 5

सफेद जांबूला फळगळतीचा धोका; बागायतदार व विक्रेते हवालदिल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2018 01:45 IST

बदलत्या हवामानामुळे सफेद जांबूला फळ्गळतीचा धोका आहे. त्यामुळे आर्थिक संकटाच्या चाहुलीने बागायतदार आणि विक्रेतेही हवालिदल झाले आहेत. डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात ओखी वादळाच्या तडाख्याने तर मागच्या आठवड्यापासून वाढलेली उष्णता आणि रविवारच्या मध्यरात्री झालेल्या पावसाने उत्पादनात घट होणार आहे.

- अनिरु द्ध पाटीलबोर्डी : बदलत्या हवामानामुळे सफेद जांबूला फळ्गळतीचा धोका आहे. त्यामुळे आर्थिक संकटाच्या चाहुलीने बागायतदार आणि विक्रेतेही हवालिदल झाले आहेत. डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात ओखी वादळाच्या तडाख्याने तर मागच्या आठवड्यापासून वाढलेली उष्णता आणि रविवारच्या मध्यरात्री झालेल्या पावसाने उत्पादनात घट होणार आहे.विसाव्या शतकाच्या प्रारंभी घोलवड येथील पारसी कुटुंबियांनी सफेद जांबू या परदेशी फळझाडाची प्रायोगीकतत्वावर लागवड त्यांच्या बागायतीत केली. येथील मध्यम प्रतीची, उत्तम निचरा होणारी काळी सुपीक जमीन आणि दमट हवामान या पिकासाठी पोषक आहे. विशेषत: किनाऱ्यालगत या झाडाची वाढ जोमाने होऊन लागवडी पासून चौथ्या वर्षी फलधारणा होते. पूर्वी केवळ सफेद रंगात उपलब्ध असणारे हे फळ आज लाल, फिके व गडद गुलाबी या रंगात उपलब्ध आहेत. कमी उत्पादन खर्चात भरघोस पीक हे या पिकाचे खास वैशिष्ठ आहे.दोन झाडांमध्ये दहा फुटांच्या अंतरातही पीक चांगले येत असल्याने कमी जागेत जास्त झाडे लावून अधिक उत्पादन घेता येते. तालुक्यात या झाडाची लागवड दीडशे हेक्टर पेक्षा अधिक क्षेत्रावर झाली आहे. डिसेंबर महिन्यापासून सुरू होणारा बहारतीन वेळा येतो. साधारणत: फेब्रुवारी ते मोसमी पावसाचा प्रारंभ हा फळाचा हंगाम आहे. हंगामाच्या प्रारंभीच संकट ओढवल्याने बागायतदार हवालिदल झाला बनला आहे.उन्हाळ्यात सर्वाधिक मागणीया फळात सुमारे नव्वद टक्के पाण्याचा अंश असल्याने उन्हाळ्यात सर्वाधिक मागणी आहे. प्रारंभी काळात स्थानिक आठवडे बाजारात आणि डहाणू, घोलवड या रेल्वे स्थानक परिसरात त्याची विक्र ी केली जात होती. मात्र, स्थानिक भाजीपाला रेल्वेच्या माध्यमातून मुंबई आणि उपनगरातील वसाहतीत विकणाºया येथील महिलांनी या फळाची विक्र ी सुरू केली. त्याला चांगला प्रतिसाद मिळून शहरी बाजारात या फळाने भाव खाल्ला आणि मुंबईच्या बाजारात मक्तेदारी निर्माण केली. या फळाच्या विक्र ीतुन नफा मिळत असून तेथे हे फळ जाम या नावाने परिचित आहे.फळझाडाचा प्रचार-प्रसारघोलवड, बोर्डी आणि पंचक्रोशीतील माहेरवाशिनी हे फळझाड सासरी घेऊन गेल्याने त्याचा प्रसार पालघर जिल्ह्यात विविध भागात मोठ्या प्रमाणावर झाला. त्या मध्ये केळवे, माहीम, विरार, वसईचा समावेश आहे. शिवाय कोसबाड कृषी विज्ञान केंद्रात भेट देणाºया राज्यातील विविध ठिकाणाहून आलेल्यांनी आपापल्या जिल्ह्यात त्याची लागवड करून पहिली मात्र त्या ठिकाणी ते यशस्वी झालेले नाही. गुटी कलमापासून नवीन रोपांची निर्मिती करता येत. शिवाय अगदी स्वस्तात कलम उप्लब्ध होते. त्यामुळे घरोघरी परसबागेत ते पाहायला मिळते. स्थानिक स्वराज्य संस्थेने वृक्षारोपण योजनेतून त्याचे वाटप स्थानिकांना केल्यास रोजगारासह हिरवापट्टा वाढेल.वाढती उष्णता आणि पावसानंतर बदललेल्या वातावरणामुळे मोठ्या प्रमाणात फळगळतीचा धोका असतो. शिवाय कीटकांचा प्रादुर्भाव टाळण्याकरिता प्लेनोफिक्स कीटकनाशकाची फवारणी आवश्यक आहे.उत्तम सहाणे,शास्त्रज्ञ, कृषी विज्ञान केंद, कोसबाड

टॅग्स :Vasai Virarवसई विरार