शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "उद्या रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
4
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
5
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
6
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
7
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
8
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
9
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
10
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
11
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
12
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
13
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
14
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
15
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
16
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
17
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
18
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
19
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
20
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
Daily Top 2Weekly Top 5

‘शिवसेना सत्तेत असो वा नसो, आदिवासींची सेवा करणारच’

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2019 02:14 IST

‘आता गावात पाणी आणलय, पुढे घरा - घरात पोहोचवणार, शिवसेना सत्तेत असो वा नसो, आदिवासींची सेवा करणारच’ असे युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी येथे सांगितले.

मोखाडा : ‘आता गावात पाणी आणलय, पुढे घरा - घरात पोहोचवणार, शिवसेना सत्तेत असो वा नसो, आदिवासींची सेवा करणारच’ असे युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी येथे सांगितले. ते पाण्याच्या टाक्यांचे उद्घाटन प्रसंगी बोलत होते. तालुक्यात जानेवारी संपताच पाणी टंचाईचे वातावरण असून टॅँकरद्वारे पाणी पुरवठा सुरु आहे.सध्या ५ गावे आणि ११ पाड्यांना ७ टँकर द्वारे पाणी पुरवठा केला जातो आहे. टॅँकरद्वारे पाणी पुरवठा सुरु असूनही आदिवासी महिलांची पायपीट सुरूच आहे. ती थांबावी म्हणून शिवसेना व युवासेनेने तालुक्यातील किनिस्ते, गवरचरीपाडा, विकासवाडी, सोनारवाडी, चास हट्टीपाडा यासह अन्य ठिकाणी तीन हजार लीटर क्षमतेच्या १८ पाण्याच्या टाक्या बसवल्या आहेत त्यांचे उद्घाटन गुरुवारी ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी त्यांना आमची नळयोजना मंजूर करा अशी मागणी किनिस्ते येथील आदिवासी महिलांनी केली. त्यावेळी आता गावात पाणी आणलयं, पुढे घरा - घरात पाणी पोहोचवणार असल्याचे आश्वासन त्यांनी येथील महिलांना दिले. तर चास हट्टीपाडा येथे ठाकरे यांनी थेट आदिवासी महिलांमध्ये जाऊन, जमीनीवर बसून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. या दौैऱ्यात त्यांच्या सोबत सार्वजनिक बांधकाम मंत्री व आरोग्य मंत्री एकनाथ शिंदे, शिवसेना पालघर जिल्हा संपर्क प्रमुख आमदार रवींद्र फाटक, आमदार शांताराम मोरे, शिवसेना पालघर जिल्हा प्रमुख राजेश शहा, पालघर जिल्हा समन्वयक श्रीनिवास वनगा, पालघर जिल्हा परिषदेतील शिवसेनेचे गटनेते प्रकाश निकम, विक्र मगड विधानसभा संघटक प्रल्हाद कदम, मोखाडा पंचायत समितीचे सभापती प्रदीप वाघ, तालुका प्रमुख अमोल पाटील, मोखाडा नगरपंचायतीच्या नगराध्यक्षा मंगलाताई चौधरी यांसह मोठ्या संख्येने शिवसैनिक उपस्थित होते.येथील पाझर तलावाचे खोलीकरण, रु ंदीकरणासह तलावातील गाळ काढणे, नवीन एक लाख लीटर क्षमतेची पाण्याची टाकी, पाईपलाईन आणि जलशुध्दीकरण केंद्राचे नुतनीकरणासाठी सुमारे दीड कोटी रु पये खर्च करण्यात येणार आहे. त्याचे भूमिपूजन ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले आहे.

टॅग्स :Aditya Thackreyआदित्य ठाकरेShiv Senaशिवसेना