शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! कोट्यवधींचे महाघोटाळे, बोगस भरतीही; शनि शिंगणापूर मंदिर ट्रस्ट बरखास्त
2
Today Daily Horoscope : आजचे राशीभविष्य - १२ जुलै २०२५; नशिबाची उत्तम साथ; यश व कीर्ती लाभेल, आनंदवार्ता मिळेल
3
शिंदेसेना वादात, विरोधकांना संधी; आमदारांच्या व्हायरल व्हिडिओमुळे एकनाथ शिंदेंची पंचाईत
4
होमिओपॅथीची नोंद एमएमसीमध्ये करायची की नाही?; तज्ज्ञ समिती करणार अभ्यास
5
बीकेसी ते शिळफाट्यादरम्यान बुलेट ट्रेनसाठीचा बोगदा पूर्ण; प्रकल्पाला मिळणार गती
6
अखेर ६ दिवसांनी बोया सापडला पण सर्च ऑपरेशनमध्ये आढळल्या ९२४ बेकायदा मच्छीमार बोटी
7
कुजबुज! उपमुख्यमंत्र्यांच्या कपाटात दडलं काय?; आमदारांचे PA, कार्यकर्त्यांचे लक्ष वेधले
8
कॅनडावरील टॅरिफ वाढवून केला ३५%; अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांची घोषणा
9
मतदार याद्यातील घोळ, घुसखोरी आणि गोंधळ; घोळ निस्तरणे निवडणूक आयोगाला शक्य होत नाही
10
...तर गो बॅक टू द थर्ड वर्ल्ड; न्यू यॉर्कमध्ये हाताने बिर्याणी खाल्ली, काय बिघडले?
11
फास्टॅग नीट न लावल्यास चालक ब्लॅकलिस्टमध्ये; तुम्हीही वाहन चालवताना करता का 'ही' चूक?
12
Video : शिवाजीनगर येथे पीएमटी बसला आग;नागरिकांच्या तत्परतेने टळली जीवितहानी
13
Wimbledon 2025: अल्काराझनं सलग तिसऱ्यांदा गाठली फायनल! नदालनंतर अशी कामगिरी करणारा ठरला दुसरा
14
दोन भिन्न वंशावळी न्यायालयात का सादर केल्या गेल्या? सात्यकी सावरकर यांनी याचा खुलासा करावा
15
नवऱ्याने रागाच्या भरात बायकोच्या नाकाचा घेतला चावा, झाले दोन तुकडे... नेमकं घडलं तरी काय?
16
"जनसुरक्षा विधेयका'चं नाव 'भाजप सुरक्षा विधेयक' करायला हवं"; मिसा, टाडाचा उल्लेख करत उद्धव ठाकरेंचा सरकारवर हल्लाबोल
17
"नोटांनी भरलेली बॅग मी आल्याबरोबर कपाटात..."; खळबळ उडवणाऱ्या व्हिडीओवर संजय शिरसाटांनी सोडलं मौन
18
Video: तुफान राडा ! आधी 'कॅप्टन' गिल पंचांशी भांडला, मग सिराजचाही पारा चढला, काय घडलं?
19
“नव्या कायद्याची गरज का? जनतेच्या मनातील संभ्रम...”; जनसुरक्षा विधेयकाला काँग्रेसचा विरोध
20
“आम्ही राज्यपालांना जनसुरक्षा विधेयक मंजूर करू नये ही विनंती करणार”; ठाकरे गटाचा निर्धार

कुठे पारडे फिरले तर, कुठे प्रस्थापितच सरस

By admin | Updated: December 24, 2016 02:59 IST

विक्रमगड नगरपंचायतीच्या १७ नगरसेवकापैकी १६ नगरसेवकान मधून आज झालेल्या नगरअध्यक्ष पदाचा निवडणुकीत

विक्रमगड : विक्रमगड नगरपंचायतीच्या १७ नगरसेवकापैकी १६ नगरसेवकान मधून आज झालेल्या नगरअध्यक्ष पदाचा निवडणुकीत विक्रमगड विकास अघाडीचे रविंद्र विलास खुताडे यांची नगराध्यक्षपदी निवड झाली. त्यांना यापूर्वीच विकास आघाडीचे सहा नगरसेवकांचा तसेच राष्ट्रवादी चा एक, भाजपाच्या दोन अशा एकूण दहा नगरसेवकानी हात वर करून मतदान केल्याने खुताडे याची नगरअध्यक्षपदी निवड झाली. तर उपनगरअध्यक्षपदी विकास आघाडीचे नगरसेवक नीलेश(पिंका) पडवले याचा विरोधात एक ही उमेदवारी अर्ज न आल्याने त्यांची उपनगरअध्यपदी बिनविरोध निवड झाली आहे. या निवडणूकीमध्ये शिवसेनेच्या एकमेव महिला नगरसेविका सुनिता नाईक यांनी नगराध्यक्ष निवडीकडे पाठ फिरवली होती. तर श्रमजीवी - जागृत विकास पैनलचा बाजुने सहा नगरसेवक होते. विक्र मगड नगरपंचायतीमध्ये दहा असे अधिक संख्या बळ मिळवून विकास आघाडीने सत्ता स्थापन केली आहे. या नवनिर्वाचीत नगरअध्यक्ष, उपनगरअध्यक्षचे व नगरसेवकाचे तसेच विकास आघाडीचे संयोजक नीलेश सांबरे, काँग्रेसचे तालुका अध्यक्ष प्रमोद पाटील यांचे फटाक्यांच्या आतषबाजीकरुन विजयोत्सव साजरा करण्यात आला.नगरअध्यक्षपदासाठी अनुसुचित जमातीचा पुरु ष आरक्षण असल्याने विकास आघाडीकडुन प्रभाग १३ मधुन ८७ मतांनी विजयी झालेले अनुसुतचित जमातीचे तरु ण तडफदार उमेदवार रविंद्र खुताडे हे हया पहिल्या नगरअध्यक्षपदाच्या खुर्चीवर बसण्याचा बहुमान मिळवला आहे. तसा त्यांचा हा राजकारणातला पहिलाच अनुभव आहे. या वेळी निवडणुकीचे पिठासन अधिकारी म्हणून मोहन नदलकर याचा सह तहसीलदार सुरेश सोनवणे यानी काम पाहिले तर सुरक्षेचा दृष्टीकोणातून अतिरक्त पोलिस फौजफाटामधे ५० पोलिस कर्मचारी व अधिकारी याना पाचारण करण्यात आले होते. दरम्यान, शांततेत निवडणूक पार पाडल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले. (वार्ताहर)तलासरीच्या नगराध्यक्षपदी स्मिता वळवी, उपनगराध्यक्षपदी सुरेश भोयेतलासरी : तलासरी नगरपंचायतीच्या पहिल्या नगराध्यक्षपदी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या स्मिता सुरेश वळवी यांची बिन विरोध निवड झाली तर उपनगराध्यक्ष पदी माकपाचेच सुरेश भोये यांचीही बिन विरोध निवड झाली. इतर दोघांनी आपले उमेदवारी अर्ज माघारी घेतल्याने निवड बिनविरोध झाल्याची घोषणा निवडणूक निर्णय अधिकारी स्वप्नील कापडणीस यांनी केली. या वेळी तलासरी नगर पंचायतीचे मुख्याधिकारी सागर साळुंखे उपस्थित होते. दुपारी दोन वाजता निवडणूक कार्यक्रम सुरु होताच नगराध्यक्षपदासाठी भरलेला अर्ज रामिला जवालिया यांनी मागे घेतल्याने स्मिता सुरेश वळवी याची निवड बिनविरोध झाल्याची घोषणा झाली. तर उपनगराध्यक्षपदासाठी भरलेला अर्ज वसंत कोळी यांनी माघारी घेतल्याने सुरेश भोये यांची बिन विरोध निवड झाल्याची घोषणा करण्यात आली. दरम्यान, नगरपरिषदेच्या एकुण १७ जागांपैकी माकपाला ११, भाजपाला ४ तर राष्ट्रवादी कॉग्रेस कडे २ नगरसेवकांची संख्याबळ असल्याने निवडणूकीचे चित्र स्पष्ट होतेनगराध्यक्ष व उपनगराध्यक्ष ची निवड घोषित करताच मार्क्स वादी कम्युनिस्ट पक्षाच्या कार्यकर्त्यांनी तलासरी नगर पंचायत कार्यालयाबाहेर एकच जल्लोष केला. यावेळी माकपचे नेते वनशा दुमाडा , नंदू हडळ, शंकर उंबरसडा , सुभाष मलावकर , शांती मलावकर , शैला अंधेर , इत्यादिसह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते. निवडीनंतर नगराध्यक्ष, व उप नगराध्यक्ष याची कार्यकर्त्यांनी तलासरी गावातून विजयी मिरवणूक काढली. (वार्ताहर)