शहरं
Join us  
Trending Stories
1
"मुंबईत जो येईल त्याचं स्वागत करू..."; निशिकांत दुबेंबाबत देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
2
रॉयल एनफिल्डने चीनचे रेअर अर्थ मटेरिअल टाळले! नवीन धातू वापरला, ऑटो कंपन्या चकीत झाल्या...
3
‘झुकेगा नही’! ट्रम्प यांची धमकी, पण सरकार ठाम; अमेरिकेला भारताचं स्वतंत्र धोरण का खुपतंय?
4
ऑपरेशन महादेवमध्ये मारले गेलेले सगळे दहशतवादी पाकिस्तानीच! 'त्या' एका पुराव्याने समोर आली कुंडली
5
IND vs ENG: ३५ धावा की ४ गडी... पाचवी कसोटी निर्णायक वळणावर, 'हा' घटक भारतासाठी ठरेल 'गेमचेंजर'
6
ट्रम्प यांच्यासोबतची मैत्री तुटल्यानंतर मस्क मोठ्या अडचणीत; टेस्लाला द्यावे लागणार तब्बल २ हजार कोटी
7
ट्रम्पच्या जिगरी दोस्तावर पाकिस्तान का चिडला? पोस्ट लिहीत व्यक्त केला राग! शाहबाज शरीफ म्हणाले... 
8
"सचिन माझ्या मुलाचा बाप...", महिलेने दाखवला DNA रिपोर्ट; राजा रघुवंशीच्या घरात भलताच वाद
9
हृदयस्पर्शी! बाळासाठी वडील झाले वासुदेव, पुराच्या पाण्यातून काढली वाट, भावुक करणारा Video
10
शिवसेनेचा बाप मीच आहे, भाजपा आमदार परिणय फुकेंचं वादग्रस्त विधान; शिंदेसेना संतप्त
11
Shravan 2025: शास्त्रानुसार, संसारी व्यक्तीने रुद्राक्षाची जपमाळ ओढावी, पण गळ्यात घालू नये!
12
रक्षाबंधन नेमके कधी आहे? शुभ मुहूर्त कोणता? पाहा, महत्त्व, महात्म्य अन् काही मान्यता
13
नोकरीसाठी विदेशात जायचंय तर पत्नीला भारतात ठेवा, अटीविरुद्ध ‘तो’ सुप्रीम कोर्टात
14
७१% चं रेकॉर्डब्रेकिंग इनक्रिमेंट! 'हे' आहेत भारतातील IT क्षेत्रातील सर्वाधिक कमाई करणारे CEO; मिळणार १५४ कोटी सॅलरी
15
४४ भूखंड, एक किलो सोने, २ किलो चांदी...! आरटीओ अधिकाऱ्याची संपत्ती एवढी की पाहून अधिकारी थक्क झाले...
16
वय वर्ष ८०, तरीही फिट! दिलीप प्रभावळकरांना स्वत:च्या फिटनेसचं आश्चर्य, म्हणाले- "एकदा ५ कुत्रे माझ्या लागले तेव्हा..."
17
त्याच पाकिस्तानने सणसणीत वाजवली! इराणच्या अण्वस्त्र कार्यक्रमाला दिला पाठिंबा, अमेरिका...
18
NSDL IPO Allotment Status: NSDL आयपीओला तुफान प्रतिसाद; लेटेस्ट GMP सह जाणून घ्या कसं चेक कराल अलॉटमेंट स्टेटस?
19
विराट कोहलीसोबतच्या अफेअरच्या चर्चांवर तमन्नानं अखेर सत्य सांगितलं, म्हणाली...
20
झारखंडचे माजी मुख्यमंत्री शिबू सोरेन यांचे निधन; किडनीच्या आजाराने होते त्रस्त

पालघरच्या वाहतूककोंडीवर उपाय सापडणार तरी कधी?

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 15, 2024 10:15 IST

रेल्वे स्थानक परिसर वगळता शहरात कुठेही पार्किंग व्यवस्था नाही

पालघर : पालघर रेल्वे स्थानकाच्या पश्चिमेला रेल्वेने नेमलेल्या ठेकेदाराच्या पे अँड पार्किंग व्यवस्थेत फक्त ४०० मोटारसायकली पार्क करण्याची क्षमता आहे. याशिवाय अन्य कुठलीही पार्किंगची व्यवस्था शहरात नाही. या रेल्वे स्थानकातून दररोज ४० ते ४५ हजार प्रवासी ये-जा करीत असतात. त्यांच्या वाहतुकीसाठी रिक्षा, कॅबसोबतच प्रवाशांच्या हजारो मोटारसायकली रेल्वे स्थानकाच्या आजूबाजूला मिळेल त्या जागेत पार्क करतात. त्यामुळे पालघरमधील वाहतूककोंडीच्या प्रश्नावर मागील १२ ते १५ वर्षांपासून तोडगा निघालेला नाही.

पालघरच्या विकास आराखड्यात वाहनतळासाठी जागा राखीव ठेवण्यात आली असली तरी त्याची प्रत्यक्षात अंमलबजावणी करण्यात नगर परिषदेला आजही यश आलेले नाही. जिल्हाधिकारी, जिल्हा पोलिस अधीक्षक आणि जिल्हा परिषदेसह अन्य सुमारे ६०च्या वर विविध विभागांची कार्यालये सुरू झाल्याने पालघर शहराचे नागरीकरण झपाट्याने वाढले आहे. त्याचा ताण प्रशासनावर पडू लागला आहे. 

मार्गाचे रुंदीकरणाचे काम अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. त्यामुळे शहरातील सर्वांत जास्त वाहतूककोंडी याच रस्त्यावर होत आहे. याच मार्गावरील रस्त्याच्या कडेला दोन्ही बाजूने मोटारसायकली पार्क करून ठेवलेल्या असतात. त्याच रस्त्यावर तीनचाकी रिक्षांचे बेकायदेशीर उभे राहिलेले रिक्षा स्टँड वाहतूककोंडीस प्रमुख कारण ठरत आहे.

आजपर्यंत ५० बैठकापालघर शहराचा वाहतूककोंडीचा प्रश्न कायमस्वरूपी सुटावा यासाठी आजपर्यंत ५० बैठका पार पडल्यानंतर त्यातून पी १-पी २, एकमार्गी वाहतूक, अवजड वाहनांची वाहतूक, वेळ आदी डझनभर उपाययोजनांचा कालावधी एखाद महिन्याच्या पुढे जाऊ शकलेला नाही. त्यामुळे वाहतूककोंडीच्या जटिल समस्येवर आजपर्यंत ठोस उपाययोजना आखण्यात अजूनही यश मिळालेले नाही.

इमारतींमध्ये पार्किंग व्यवस्था नाहीशहरात उभ्या राहिलेल्या अनेक इमारतींना आपली स्वतःची स्वतंत्र पार्किंग व्यवस्था नसल्याने त्याचा परिणामही वाहतूककोंडीत भर टाकीत असून, रस्त्याच्या बाजूला नागरिकांना चालण्यासाठी बनविलेले पदपथ दुकानदारांनी गिळंकृत केले आहेत. परिणामी नागरिकांना धोकादायकरीत्या रस्त्यावरून पायी चालत जावे लागत आहे.

टॅग्स :palgharपालघर