शहरं
Join us  
Trending Stories
1
महादेवी हत्ती परत आणण्यासाठी राजू शेट्टींची आत्मक्लेष पदयात्रा; अनेकांनी घेतला सहभाग
2
भारताच्या हाती खजिना लागला खजिना...! कोळशाच्या खाणीत दडलेला; लोकसभेत मोठी घोषणा...
3
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
4
वर्षभरापासून बेपत्ता होता नवरा, मोबाईलने उलगडलं गूढ; बायकोनेच रचलेला भयंकर कट
5
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; साध्वी प्रज्ञा ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
6
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
7
ट्रम्प यांचा 'हा' निर्णय भारताला नव्हे तर अमेरिकेलाच महागात पडणार? अहवालातून मोठा खुलासा!
8
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
9
मैदानावर विराट, व्यवसायात विकास! विराट कोहलीच्या १०५० कोटींच्या साम्राज्याचा 'हा' आहे खरा हिरो!
10
'पाकिस्तानात नाही, तर बलुचिस्तानमध्ये तेल सापडले', बलोच नेत्याचे डोनाल्ड ट्रम्प यांना पत्र
11
भारती सिंगने सर्वांसमोर जाळली महागडी 'लाबूबू डॉल'! कारणही सांगितलं, म्हणाली- "माझा छोट्या मुलाला.."
12
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
13
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
14
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
15
जिभेचे चोचले पडतील महागात! अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका, रिसर्चमध्ये खुलासा
16
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
17
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
18
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे
19
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
20
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप

किन्हवली पोलीस वसाहतीच्या दुरुस्तीला मुहूर्त कधी मिळणार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 3, 2020 01:04 IST

किन्हवली गावात असलेल्या किन्हवली पोलिसांच्या वसाहतीची प्रचंड दुरवस्था झाल्याने पोलीस कर्मचाऱ्यांवर भाड्याच्या घरांत राहण्याची वेळ आली आहे.

वसंत पानसरे किन्हवली : किन्हवली गावात असलेल्या किन्हवली पोलिसांच्या वसाहतीची प्रचंड दुरवस्था झाल्याने पोलीस कर्मचाऱ्यांवर भाड्याच्या घरांत राहण्याची वेळ आली आहे. ९३ गावपाड्यांच्या कायदा-सुव्यवस्थेचा भार सांभाळणाºया किन्हवली पोलिसांच्या वसाहत इमारतींची २० वर्षांपासून दुरु स्तीच झाल्याने दोन्ही चाळींना अखेर टाळे लावावे लागले आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांवर भाड्याने राहण्याची वेळ आली आहे.किन्हवली पोलीस ठाण्यावर ९७ हजार ११५ इतक्या लोकसंख्येच्या सुरक्षेचा भार आहे. किन्हवली, शेणवा, सोगाव, शेंद्रूण, डोळखांब बीटअंतर्गत एक सहायक पोलीस निरीक्षक, एक उपनिरीक्षक, पाच सहायक पोलीस उपनिरीक्षक, आठ पोलीस हवालदार, सहा पोलीस नाईक, १३ पोलीस शिपाई आणि नऊ महिला पोलीस शिपाई असे दोन अधिकारी आणि ४१ कर्मचारी कार्यरत आहेत. त्यांच्या निवासासाठी १९६०-६१ मध्ये अधिकारी निवास, १९६२ मध्ये चाळ क्रमांक-२ व १९६३ मध्ये चाळ क्र मांक-३ अशा निवासी इमारतींचे बांधकाम करण्यात आले होते. सुरु वातीला १५ पोलीस कुटुंबे येथे राहत होती. २० वर्षांपासून कुठल्याही प्रकारची डागडुजी न झाल्याने इमारतींच्या भिंतींना भगदाडे पडली आहेत. तसेच दारे-खिडक्या मोडकळीस आलेल्या आहेत. शौचालये व मलनि:सारण व्यवस्था निकामी झालेली आहे. गळक्या छपरावर गवताचे जंगल तयार झाले आहे. त्यामुळे कंटाळलेल्या पोलीस कर्मचाºयांनी आपापल्या खोल्यांना टाळे लावून भाड्याच्या घराला पसंती दिली आहे. वसाहतीच्या दुरु स्तीसाठी महाराष्ट्र शासनाने १८ लाख दोन हजार ४०९ रु पये इतका निधी मंजूर केला होता. मात्र, हा निधी प्रत्यक्षात वितरित न झाल्याने २० वर्षांपासून दुरु स्तीचे काम रखडले आहे. ठाणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक डॉ. शिवाजी राठोड यांनी पोलीस ठाण्याला भेट दिली होती. त्यांनी पोलीस ठाण्याची जागा नावावर करण्याबाबतचा प्रस्ताव मागवला असून जिल्हाधिकाºयांना विनंती करून जागेच्या मालकीबाबतचा अडथळा दूर करण्याचे आश्वासन दिल्याचे किन्हवलीचे सहायक पोलीस निरीक्षक गजेंद्र पालवे म्हणाले.>जागेच्या मालकीची तांत्रिक अडचणशहापूर सार्वजनिक बांधकाम विभागाने उपविभागीय पोलीस अधिकारी कृष्णात पिंगळे यांच्या कार्यकाळात संबंधित इमारतींची पाहणी करून नव्या इमारतीचा प्रस्ताव पुढे पाठवला होता. काही तांत्रिक अडचणींमुळे हा प्रस्ताव लालफितीत अडकून पडला आहे. पोलीस ठाण्याच्या कब्जात असलेली १०९० चौरस मीटर जागा महाराष्ट्र शासनाच्या नावे असल्याने कोणतेही नवे बांधकाम करता येत नसल्याची माहिती गजेंद्र पालवे यांनी दिली.