शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Mumbai Kalyan Lok Sabha Election 2024 Live Updates: ईव्हीएमला हार घातल्याने शांतिगिरी महाराज यांच्यावर गुन्हा दाखल
2
'शिंदेंसोबत जाऊ नका सांगितलं होतं'; गजानन किर्तीकरांच्या पत्नीने मांडली रोखठोक भूमिका
3
अहमदाबाद विमानतळावर मोठी कारवाई, इस्लामिक स्टेटचे ४ दहशतवादी पकडले, श्रीलंकेचे कनेक्शन उघड
4
Maharashtra HSC 12th Result 2024 राज्यभरातील विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी: उद्या १२ वीचा निकाल जाहीर होणार
5
Multibagger Stock: ४ वर्षांत ₹१ लाखांचे झाले ४० लाख, दीड रुपयांच्या शेअरमध्ये गुंतवणूक करणारे मालामाल
6
Reliance Power Share Price : ₹४५० वर आलेला IPO, आता ₹२६ वर आला हा पॉवर शेअर; एक्सपर्ट म्हणाले...
7
“पंतप्रधान प्रचंड घाबरले, म्हणून मला भटकती आत्मा, राहुल गांधींना शहजादा म्हणाले”: शरद पवार
8
सोनं पुन्हा महागणार, ७५,००० रुपयांच्या पुढे जाणार; इराणमधून आली मोठी बातमी
9
अपघात की हत्या? राष्ट्राध्यक्ष इब्राहिम रईसी यांच्या मृत्यूमागे इस्रायलचे षड्यंत्र? चर्चांना उधाण...
10
IPL 2024: RCB कडून खेळण्यापेक्षा त्यांचा सामना पाहणं खूप कठीण; असं का म्हणाली स्मृती?
11
एका कोंबड्यानं घेतला तिघांचा जीव; दोन भावांसह एका युवकाचा मृतदेह विहिरीत सापडला
12
बेडरुममध्ये नोटांचा ढीग, 50 कोटींची रोकड जप्त; IT च्या छापेमारीत सापडलं कोट्यवधींचं घबाड
13
पैसे घेऊन कोणी आपलं आयुष्य विकायला तयार नाही; मतदानानंतर काय म्हणाले उद्धव ठाकरे?
14
Lok Sabha Elections: "समस्या केवळ दोन कारणांमुळे उद्भवतात...", सचिनने सांगितले मतदानाचे महत्त्व
15
Multibagger Share : ₹१६५० पार जाणार 'हा' शेअर, लिस्टिंगनंतर सातत्यानं देतोय नफा; १३०० टक्क्यांची वाढ
16
Multibagger Stock: शेअर असावा तर असा! २ वर्षांत ५००% पेक्षा अधिक रिटर्न, तुमच्याकडे आहे का?
17
Video - तरुणाने 8 वेळा केलं मतदान, पोलिंग पार्टी सस्पेंड; राहुल गांधींनी व्यक्त केला संताप
18
पवईमध्ये मतदार भडकले, EVM मशीन बंद; आदेश बांदेकरांनी शेअर केला Video
19
ऑनलाईनही पैशांचं वाटप होतंय; उद्धव ठाकरे गटाचे नेते सचिन अहिर यांचा गंभीर आरोप
20
गरोदर दीपिकाला मतदान केंद्राबाहेर सांभाळताना दिसला रणवीर सिंह, बेबीबंप पाहून चाहते म्हणाले...

विधानसभा क्षेत्रातील ‘नेत्यांचा’ कस लागणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 12, 2019 10:48 PM

समस्या व प्रश्न अजूनही अनुत्तरित; कुपोषण, रेल्वे, रोजगार,अपघात, वाहतूककोंडी आदी विषय प्रलंबित

- पंकज राऊतमतदारसंघाच्या पुनर्रचनेमुळे अनुसूचित जमातीसाठी आरिक्षत असलेला (१३१) बोईसर विधानसभा मतदारसंघ २००९ मध्ये निर्माण झाला असून ते पालघर व वसई या दोन तालुक्यांमध्ये विभागले आहे. ही मतदार संघाची गोंधळात टाकणारी रचना तर आहेच परंतु वेगवेगळ्या भागातील वेगवेगळ्या समस्या व प्रश्न अजूनही अनुत्तरित असल्याने लोकसभेच्या पालघर मतदार संघाच्या निवडणुकीत बोईसर विधानसभा क्षेत्रातील सर्वच लोकप्रतिनिधींचा कस लागणार आहेपालघर तालुक्यातील बोईसरसह पूर्वेकडील भाग, सफाळ्याच्या पश्चिमेकडील गावे ते राष्ट्रीय महामार्गालगतच्या गावापासून वसई तालुक्यातील शिरसाड पूर्वेकडील भाग पेल्हार ते गोखिवरे पर्यंत असा शहरी , ग्रामीण व डोंगर पट्टीतील भागाचा बोईसर विधानसभा क्षेत्रात अंतर्भाव असून शहरी भागात कामगार, नोकरदार व व्यावसायिक तर ग्रामीण व डोंगरपट्टी भागात शेती, शेतमजूरी, रेती व काही प्रमाणात मच्छीमारी करून उदरिनर्वाह करणारा संमिश्र मतदार या क्षेत्रात मोठ्या प्रमाणात आहे.बहुजन विकास आघाडी , शिवसेना , भाजपा, श्रमजीवी संघटना व काँग्रेस या सर्व पक्ष व संघटनांचे कमी-जास्त प्रमाणात भागा - भागात प्राबल्य असून या मतदार संघात काही प्रमाणात कुपोषण, डहाणू-चर्चगेट थेट लोकल सेवांत वाढ, भूमिपुत्रांना हक्काचा रोजगार, ठप्प झालेला रेती व्यवसाय, प्रदूषण, महामार्गावरील जीवघेणे अपघात, वाहतूक कोंडी, रस्त्यांची दुर्दशा, या महत्त्वाच्या ज्वलंत प्रश्नांबरोबर मुबलक पाणी, आरोग्य, शिक्षण, या मूलभूत गरजाही लोकांपर्यंत न पोहोचल्याने सर्वच पक्षांबाबत कमी-जास्त प्रमाणात असलेला नाराजीचा सूर मतदानातून लवकरच पहावयास मिळणार आहे.लोकसभेच्या पालघर मतदार क्षेत्रांमधील बोईसर विधानसभेचे विद्यमान आमदार विलास तरे हे बविआचे असून ते २००९ व २०१४ सलग दोन वेळा विधानसभेवर निवडून गेले आहेत. त्यांना २००९ मध्ये ५३,७२७ मते (३८.९ टक्के) (१३०७८ मताधिक्य) तर २०१४ मध्ये ६४,५५० मते (३७.६९टक्के) (१२,८७८) एवढ्या मताधिक्यांनी ते निवडून आले आहेत. २०१४ च्या बोईसर विधानसभा निवडणुकीमध्ये शिवसेना व भाजपा स्वतंत्रपणे लढली होती. त्या निवडणुकीमध्ये दुसऱ्या क्र मांकांची मते शिवसेनेचे उमेदवार कमळाकर दळवी यांना ५१,६७७ तर भाजपाचे तत्कालीन उमेदवार जगदीश धोडी यांना तिसऱ्या क्र मांकाची म्हणजे ३०,२२८ मते मिळाली होती.विधानसभा क्षेत्रातील समस्यामूलभूत नागरी सोयीसुविधांचा अभाव व जीवघेण्या समस्या, लोकप्रतिनिधींच्या उदासिनतेमुळे आजचे भयाण वास्तव पाहावयास मिळत आहे तर कष्टकऱ्यांची परिस्थिती दयनिय असून स्थानिक भूमिपुत्रांसाठी घटता रोजगार, कामगार कायदा धोरणाचे उघडपणे होत असलेले उल्लंघन यामुळे मतदाराला आपला हक्क जागृत राहून बजवावा लागणार आहे.कंत्राटी कामा एवजी स्थानिकांना कारखान्यांमध्ये कायम स्वरूपी प्राधान्य मिळायला पाहिजे पालघर तालुक्यातील अनेक गावात सूर्याचे पाणी पोहचलेले नाही तर अनेक गावांतील कालव्यांची कामे अपूर्ण असून सर्वसामान्यांच्या घरात शिक्षणाचा अंधार, शेतकरी आपल्या जमिनी विकून एकमेव आणि महत्त्वाचे असे जगण्याचे साधन गमावत चालला आहे.भू- माफीयांचे होत असलेले आक्र मण चिंतेत भर टाकत आहे , आदिवासी , दलित, कष्टकरी व वंचित समाजाला ताठ मानेने उभे करण्यासाठी मानिसकतेत बदल करून शेतकरी, शेतमजूर, मच्छीमार व कामगार वर्गाला त्यांच्या न्याय हक्कांसाठी मोठ्या लढ्याची गरज आहे.दृष्टीक्षेपात राजकारणयुतीची राष्ट्रीय पातळीवरील नेत्यांबरोबर बोलणी सुरू झाली तेव्हा पालघर लोकसभेच्या जागेकरिता शिवसेना आग्रही राहून पालघरची जागा पदरात पाडून घेतल्याची चर्चा असल्याने आगामी निवडणुकीमध्ये भाजपाचे नाराज पदाधिकारी व नेत्यांचा सहभाग व योगदान यावर खूप काही अवलंबून आहे.नुकत्याच झालेल्या पालघर लोकसभेच्या पोटनिवडणुकीमध्ये श्रमजीवीचे विवेक पंडित यांनी भाजपाच्या गटात दाखल होऊन महत्त्वाची भूमिका बजावली होती आता युतीच्या निर्णयानंतर २०१९ च्या निवडणुकीत त्यांची भूमिका काय असणार ? हे औत्सुक्याचे ठरेल.भाजपाचे पदाधिकार व कार्यकत्यांमध्ये नाराजीचा सूर असला तरी केंद्रात नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली पुन्हा सत्ता व मजबूत सरकार यावे याकरिता या निवडणुकीत शिवसेनेचा उमेदवार असला तरी नाराजी गिळून सेनेला साथ द्यावी लागणार आहे .२०१८ च्या पोटनिवडणुकीत बोईसर विधानसभा क्षेत्रांमध्ये भाजपाचे राजेंद्र गावित यांना ४१६३२ , शिवसेनेचे श्रीनिवास वनगा यांना ४५९९१ मते मिळाली होती. आता युतीच्या दृष्टिकोनातून पाहिले तर या दोघांच्या मतांची बेरीज ९१६२३ होते तर बवीआचे बळीराम जाधव यांना ४६७५४ मते मिळाली होती.

टॅग्स :palgharपालघरVasai Virarवसई विरार