विधानसभा क्षेत्रातील ‘नेत्यांचा’ कस लागणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 12, 2019 10:48 PM2019-03-12T22:48:26+5:302019-03-12T22:48:49+5:30

समस्या व प्रश्न अजूनही अनुत्तरित; कुपोषण, रेल्वे, रोजगार,अपघात, वाहतूककोंडी आदी विषय प्रलंबित

What will be the 'leaders' of the assembly segment? | विधानसभा क्षेत्रातील ‘नेत्यांचा’ कस लागणार

विधानसभा क्षेत्रातील ‘नेत्यांचा’ कस लागणार

googlenewsNext

- पंकज राऊत

मतदारसंघाच्या पुनर्रचनेमुळे अनुसूचित जमातीसाठी आरिक्षत असलेला (१३१) बोईसर विधानसभा मतदारसंघ २००९ मध्ये निर्माण झाला असून ते पालघर व वसई या दोन तालुक्यांमध्ये विभागले आहे. ही मतदार संघाची गोंधळात टाकणारी रचना तर आहेच परंतु वेगवेगळ्या भागातील वेगवेगळ्या समस्या व प्रश्न अजूनही अनुत्तरित असल्याने लोकसभेच्या पालघर मतदार संघाच्या निवडणुकीत बोईसर विधानसभा क्षेत्रातील सर्वच लोकप्रतिनिधींचा कस लागणार आहे

पालघर तालुक्यातील बोईसरसह पूर्वेकडील भाग, सफाळ्याच्या पश्चिमेकडील गावे ते राष्ट्रीय महामार्गालगतच्या गावापासून वसई तालुक्यातील शिरसाड पूर्वेकडील भाग पेल्हार ते गोखिवरे पर्यंत असा शहरी , ग्रामीण व डोंगर पट्टीतील भागाचा बोईसर विधानसभा क्षेत्रात अंतर्भाव असून शहरी भागात कामगार, नोकरदार व व्यावसायिक तर ग्रामीण व डोंगरपट्टी भागात शेती, शेतमजूरी, रेती व काही प्रमाणात मच्छीमारी करून उदरिनर्वाह करणारा संमिश्र मतदार या क्षेत्रात मोठ्या प्रमाणात आहे.

बहुजन विकास आघाडी , शिवसेना , भाजपा, श्रमजीवी संघटना व काँग्रेस या सर्व पक्ष व संघटनांचे कमी-जास्त प्रमाणात भागा - भागात प्राबल्य असून या मतदार संघात काही प्रमाणात कुपोषण, डहाणू-चर्चगेट थेट लोकल सेवांत वाढ, भूमिपुत्रांना हक्काचा रोजगार, ठप्प झालेला रेती व्यवसाय, प्रदूषण, महामार्गावरील जीवघेणे अपघात, वाहतूक कोंडी, रस्त्यांची दुर्दशा, या महत्त्वाच्या ज्वलंत प्रश्नांबरोबर मुबलक पाणी, आरोग्य, शिक्षण, या मूलभूत गरजाही लोकांपर्यंत न पोहोचल्याने सर्वच पक्षांबाबत कमी-जास्त प्रमाणात असलेला नाराजीचा सूर मतदानातून लवकरच पहावयास मिळणार आहे.

लोकसभेच्या पालघर मतदार क्षेत्रांमधील बोईसर विधानसभेचे विद्यमान आमदार विलास तरे हे बविआचे असून ते २००९ व २०१४ सलग दोन वेळा विधानसभेवर निवडून गेले आहेत. त्यांना २००९ मध्ये ५३,७२७ मते (३८.९ टक्के) (१३०७८ मताधिक्य) तर २०१४ मध्ये ६४,५५० मते (३७.६९टक्के) (१२,८७८) एवढ्या मताधिक्यांनी ते निवडून आले आहेत. २०१४ च्या बोईसर विधानसभा निवडणुकीमध्ये शिवसेना व भाजपा स्वतंत्रपणे लढली होती. त्या निवडणुकीमध्ये दुसऱ्या क्र मांकांची मते शिवसेनेचे उमेदवार कमळाकर दळवी यांना ५१,६७७ तर भाजपाचे तत्कालीन उमेदवार जगदीश धोडी यांना तिसऱ्या क्र मांकाची म्हणजे ३०,२२८ मते मिळाली होती.

विधानसभा क्षेत्रातील समस्या
मूलभूत नागरी सोयीसुविधांचा अभाव व जीवघेण्या समस्या, लोकप्रतिनिधींच्या उदासिनतेमुळे आजचे भयाण वास्तव पाहावयास मिळत आहे तर कष्टकऱ्यांची परिस्थिती दयनिय असून स्थानिक भूमिपुत्रांसाठी घटता रोजगार, कामगार कायदा धोरणाचे उघडपणे होत असलेले उल्लंघन यामुळे मतदाराला आपला हक्क जागृत राहून बजवावा लागणार आहे.
कंत्राटी कामा एवजी स्थानिकांना कारखान्यांमध्ये कायम स्वरूपी प्राधान्य मिळायला पाहिजे पालघर तालुक्यातील अनेक गावात सूर्याचे पाणी पोहचलेले नाही तर अनेक गावांतील कालव्यांची कामे अपूर्ण असून सर्वसामान्यांच्या घरात शिक्षणाचा अंधार, शेतकरी आपल्या जमिनी विकून एकमेव आणि महत्त्वाचे असे जगण्याचे साधन गमावत चालला आहे.
भू- माफीयांचे होत असलेले आक्र मण चिंतेत भर टाकत आहे , आदिवासी , दलित, कष्टकरी व वंचित समाजाला ताठ मानेने उभे करण्यासाठी मानिसकतेत बदल करून शेतकरी, शेतमजूर, मच्छीमार व कामगार वर्गाला त्यांच्या न्याय हक्कांसाठी मोठ्या लढ्याची गरज आहे.

दृष्टीक्षेपात राजकारण
युतीची राष्ट्रीय पातळीवरील नेत्यांबरोबर बोलणी सुरू झाली तेव्हा पालघर लोकसभेच्या जागेकरिता शिवसेना आग्रही राहून पालघरची जागा पदरात पाडून घेतल्याची चर्चा असल्याने आगामी निवडणुकीमध्ये भाजपाचे नाराज पदाधिकारी व नेत्यांचा सहभाग व योगदान यावर खूप काही अवलंबून आहे.
नुकत्याच झालेल्या पालघर लोकसभेच्या पोटनिवडणुकीमध्ये श्रमजीवीचे विवेक पंडित यांनी भाजपाच्या गटात दाखल होऊन महत्त्वाची भूमिका बजावली होती आता युतीच्या निर्णयानंतर २०१९ च्या निवडणुकीत त्यांची भूमिका काय असणार ? हे औत्सुक्याचे ठरेल.
भाजपाचे पदाधिकार व कार्यकत्यांमध्ये नाराजीचा सूर असला तरी केंद्रात नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली पुन्हा सत्ता व मजबूत सरकार यावे याकरिता या निवडणुकीत शिवसेनेचा उमेदवार असला तरी नाराजी गिळून सेनेला साथ द्यावी लागणार आहे .
२०१८ च्या पोटनिवडणुकीत बोईसर विधानसभा क्षेत्रांमध्ये भाजपाचे राजेंद्र गावित यांना ४१६३२ , शिवसेनेचे श्रीनिवास वनगा यांना ४५९९१ मते मिळाली होती. आता युतीच्या दृष्टिकोनातून पाहिले तर या दोघांच्या मतांची बेरीज ९१६२३ होते तर बवीआचे बळीराम जाधव यांना ४६७५४ मते मिळाली होती.

Web Title: What will be the 'leaders' of the assembly segment?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.