शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
3
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
4
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
5
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
6
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
7
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
8
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
9
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
10
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
11
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
12
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
13
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
14
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
15
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
16
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
17
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
18
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
19
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
20
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

तिवरे धरणासारखे खडखड धरणही फुटणार काय?, गळतीचे प्रमाण वाढले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 5, 2019 23:24 IST

जव्हार तालुक्यातील खडखड या गावात डोमिहीरा नावाने नदीवर आदिवासी उपाय योजने अंतर्गत सन २००५ मध्ये ७३ कोटी रुपये खर्च करून शासनाने आदिवासी समाजाला पाणी पुरवठा व्हावा यासाठी डोमिहीरा धरण बांधले.

- हुसेन मेमनजव्हार : गळतीमुळे चर्चेत असलेले पूर्वी ठाणे जिल्ह्यात असलेले आणि आता पालघर जिल्ह्याचा भाग असलेला जव्हार तालुक्यातील खडखड धरण हे बांधल्यापासून गळत असल्यामुळे सतत चर्चेत आहे. नुकतेच रत्नागिरी येथील तिवरे धरण निकृष्टकामामुळे फुटलेव त्यात कित्येक निष्पाप नागरिकांचा बळी घेतल्याची दुर्देवी घटना घडली आहे. तसेच खडखड येथील डोमीहीरा हे धरणही फुटते की काय? असा प्रश्न निर्माण झाला असून परिसरातील नागरीक भयभीत झालेले आहेत.संपूर्ण महाराष्ट्रात विक्रमी असा पाऊस पडतो, मात्र आज ही जव्हार तालुक्यातील आदिवासी पाड्यांवरील महिलांना पिण्याचे पाणी दूरवरून नेण्याची कसरत करावी लागते. येथे नेहमी पाणी टंचाई भासत असते. यामुळे शासन दरवर्षी कोट्यवधीचा निधी उपलब्ध करून विहीर, बंधारे, नळ-पाणी योजना तयार करून देत आहे.जव्हार तालुक्यातील खडखड या गावात डोमिहीरा नावाने नदीवर आदिवासी उपाय योजने अंतर्गत सन २००५ मध्ये ७३ कोटी रुपये खर्च करून शासनाने आदिवासी समाजाला पाणी पुरवठा व्हावा यासाठी डोमिहीरा धरण बांधले. धरण २०१२ मध्ये ९५ टक्केपूर्ण झाले. मात्र धरणाची भिंत ठिकाणी लीक असल्याचे त्यात पाणी भरताच समजले, यामुळे ठेकेदाराने केलेल्या कामाचे पितळ उघडे पडले. याला जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांच्या संगमताने झालेले निकृष्ट काम जबाबदार असल्याचा आरोपही स्थानिकांनी केला होता. या गळतीमुळे दररोज हजारो लिटर पाणी वाया जात आहे.आम्ही इतकी वर्षे जीव मुठीत धरूनच जगतो आहोत- याबाबत कित्येकवेळा तक्र ारी झाल्यावर ठेकेदाराला पुन्हा दुरूस्ती करावी लागली. मात्र गळती अद्याप थांबलेली नाही, निकृष्ट मालाचा वापर करून बांधलेल्या बंधारा कसा टिकेल? त्यामुळे कितीही वेळा गळती काढली तरी गळती थांबणार का? स्थानिक रहिवासी आपले जीव मुठीत घेऊनच इतके वर्ष वास्तव करीत आहेत.- डॅम बांधल्यापासून आम्ही भयभीतच आहोत, निकृष्ट बांधण्यात आलेल्या डॅमला पहिल्या वर्षापासून लागलेली गळती आहे, त्यामुळे आम्ही नेहमी डॅम फुटून एखादी दुर्देवी घटना घडेल की काय या दहशतीखाली जगतो आहोत.

टॅग्स :Vasai Virarवसई विरार