शहरं
Join us  
Trending Stories
1
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
2
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
3
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
4
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
6
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
7
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
8
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
9
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
10
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
11
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
12
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
13
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
14
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
15
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
16
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
17
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
18
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
19
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
20
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
Daily Top 2Weekly Top 5

कसली होळी न् कसलं काय? मजुरीबाबत शिमगाच हाय! आदिवासींच्या होळी सणावर विरजण?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2021 09:02 IST

वास्तविक २ ऑक्टोबरपासून रोहयोची अंमलबजावणी करणे आवश्यक आहे; परंतु मागणीचे प्रस्ताव, शेतीची कामे तसेच दिवाळी सणाच्या लंगड्या सबबी पुढे काढून रोहयोची कामे लांबणीवर टाकण्यात येतात. पर्यायाने स्थानिक मजुरांना कामाच्या शोधार्थ इतरत्र भटकावे लागत आहे. 

खोडाळा : केंद्रीय अर्थसंकल्पात हजारो कोटींची भरघोस तरतूद केली असा प्रचंड गाजावाजा केला जात असला, तरी राज्यातील रोजगार हमी योजनेचे पार तीनतेरा वाजले आहेत. मोखाड्यासारख्या दारिद्र्याने गांजलेल्या कुपोषणग्रस्त तालुक्यात आदिवासी मजुरांना रोजगार हमीवर काम देण्यात आणि त्यांनी केलेल्या कामाची मजुरी देण्यात सरकार अपयशी ठरले आहे. या भागात महिन्याला सरासरी  मनुष्य दिवससुद्धा काम उपलब्ध झालेले नाही आणि काम दिले असले तरी सरकारच्या तिजोरीत खडखडाट असल्याने आदिवासी मजुरांच्या होळीच्या सणावर विरजण पडणार आहे. स्थानिक ठिकाणीच काम हे रोहयोचे ब्रीदवाक्य आहे. घाम वाळायच्या आधी दाम अशी नैतिक जबाबदारी असतानाही तब्बल दोन महिन्यांपासून मजुरांच्या हातात पगार पडलेला नाही. आजमितीस मोखाडा तालुक्यातील १६ हजार मजुरांचा तब्बल दोन कोटी रुपयांचा पगार थकीत आहे. आदिवासी भागात होळी सणाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. या दिवशी हरडे कडे, गूळ खोबरे, पुरणपोळ्या, लहानग्यांना नवीन कपडे असा सर्व थाटमाट असतो, परंतु हाती दिडकी नसल्याने ‘होळी सण मोठा, आनंदाला नाही तोटा’ या आनंदी म्हणीचा विपर्यास करून ‘होळी सण मोठा, पण हातात नाही नोटा’ असे म्हणण्याची वेळ तालुक्यातील आदिवासी बांधवांवर आलेली आहे.वास्तविक २ ऑक्टोबरपासून रोहयोची अंमलबजावणी करणे आवश्यक आहे; परंतु मागणीचे प्रस्ताव, शेतीची कामे तसेच दिवाळी सणाच्या लंगड्या सबबी पुढे काढून रोहयोची कामे लांबणीवर टाकण्यात येतात. पर्यायाने स्थानिक मजुरांना कामाच्या शोधार्थ इतरत्र भटकावे लागत आहे. 

पगाराचीही परवडमोखाडा तालुक्यातील करोळ  येथील ५४६ मजुरांनी डिसेंबरमध्ये काम करूनही येथील मजुरांना हक्काच्या आणि घामाच्या पैशांसाठी प्रदीर्घ काळ प्रतीक्षा करावी लागत असल्याने रोहयो यंत्रणेच्या कार्यक्षमतेवरच बोट ठेवले जात आहे. त्याशिवाय एकट्या करोळ येथील ६५०० मजुरांचे पगार शासन स्तरावर थकीत आहेत, तर संपूर्ण मोखाडा तालुक्यातील १६ हजार मजुरांचे दोन कोटींहून अधिक पगार अदा करण्यात आलेले नाहीत. 

 

टॅग्स :HoliहोळीVasai Virarवसई विरार