शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

घराचा ताबा घेण्यास गेले, महसूल कर्मचाऱ्यास लाइट घालवून मारले

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 2, 2023 09:58 IST

मीरा रोडच्या नयानगर भागातील अस्मिता सुपर मार्केटसमोर असलेल्या सलमा इमारतीत अब्दुल रहमान शेख यांची ३०३ क्रमांकाची सदनिका आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क मीरा रोड : जिल्हा दंडाधिकारी ठाणे यांनी दिलेल्या आदेशानुसार मीरा रोडच्या नयानगरमधील एका सदनिकेचा ताबा बँकेला देण्यास गेलेले अव्वल कारकुन यांना दोघांनी मारहाण केल्याची घटना बुधवारी घडली. संपूर्ण इमारतीतील आणि घरातील वीज घालवून मारहाण करण्यात आली. विशेष म्हणजे ते पोलिस बंदोबस्तात सदनिकेचा ताबा घेण्यासाठी गेले होते.

मीरा रोडच्या नयानगर भागातील अस्मिता सुपर मार्केटसमोर असलेल्या सलमा इमारतीत अब्दुल रहमान शेख यांची ३०३ क्रमांकाची सदनिका आहे. एका प्रकरणात ही मालमत्ता जप्त करून तिचा ताबा भारत सहकारी बँकेला देण्याचे आदेश ठाणे जिल्हादंडाधिकारी यांनी १३ फेब्रुवारीला दिले होते. त्यानुसार अपर तहसीलदार कार्यालयाचे अव्वल कारकून प्रशांत कापडे नयानगर पोलिसांनी दिलेल्या एक महिला व एक पुरुष पोलिसांचा बंदोबस्त घेऊन सदनिकेच्या ठिकाणी गेले. त्यावेळी घरात तीन पुरुष व तीन-चार महिला होत्या.

तोंडावर रुमाल बांधून आले दोघे जिल्हा दंडाधिकाऱ्यांचे आदेश असल्याचे सांगून घर रिकामे करण्यास वेळ दिला. मात्र, सायंकाळी ७:३० च्या सुमारास आधी सदनिकेतील व नंतर इमारतीतील वीज बंद करण्यात आली. त्यानंतर तोंडावर रुमाल बांधून आलेल्या दोघांनी कापडे यांना छातीत व कानावर मारले. यावेळी पोलिसांनाही धक्काबुक्की झाल्याचे सांगण्यात आले. अद्याप याप्रकरणी गुन्हा दाखल झालेला नाही.