शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

वसई पश्चिम पट्ट्यातील पाण्याची तपासणी होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 27, 2017 02:58 IST

वसई : तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यात टँकरद्वारे होत असलेल्या प्रचंड पाणी उपशाने पाण्याची पातळी खालावून क्षाराचे प्रमाण वाढले आहे.

वसई : तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यात टँकरद्वारे होत असलेल्या प्रचंड पाणी उपशाने पाण्याची पातळी खालावून क्षाराचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे गावक-यांमध्ये घातक रोगांची लागण होऊ लागली आहे. ती रोखण्यासाठी येथील पाण्याचे नमुने तपासण्याचे आदेश महापालिका आयुक्तांना देण्यात आले आहेत. त्यानंतर हे पाणी पिण्यालायक आहे की नाही याचा निर्णय घेतला जाणार आहे.वसईच्या पश्चिम पट्ट्यात विहीरी आणि बोअरवेल हाच पेयजलाचा स्त्रोत आहे. गेल्या काही वर्षांपासून शहरी भागात पाणी पुरवठा करण्यासाठी टँकरने पाणी उपसा केला जात आहे. त्यामुळे पाण्यात क्षार, क्लोराईडचे प्रमाण अधिक असून हे पाणी पिण्यास अयोग्य असल्याचा निष्कर्ष जल तज्ञांनी काढला आहे.नंदाखाल, निर्मळ, गास, भुईगाव या गावातील पाण्यात क्षाराचे प्रमाण ७०० पासून १५० ते २०० मिलिग्रॅम प्रतिलिटर आहे. यामुळे मूत्रपिंडासह शरीरातील विविध अवयवांवर, केसांवर दुष्परिणाम होतात. या पाण्याचा सामू (पीएच) ८ आहे. काही ठिकाणी पाण्याचा सामू ९ ते ९. पर्यंत आहे. याचा परिणाम शरीरातील पेशींवर होतो. त्याशिवाय कर्करोगही होऊ शकतो, असा तज्ञांचा दावा आहे. इतकेच नाही तर पाण्यात जंतू, माती व रसायनांचेही प्रमाण असून त्यामुळे साथीच्या आजारांचे प्रमाण वाढले आहे.पश्चिम पट्ट्यातील अनेक गावातील पाण्यात क्लोराईडचेही प्रमाण जास्त आढळून आले आहे. सामान्य मानकाप्रमाणे त्याचे प्रमाण २५० मिलिग्रॅम प्रतिलिटर असणे आवश्यक आहे. मात्र, बोळींज, नंदाखाल, भुईगावया ठिकाणी क्लोराईडचे प्रमाण ३०० मिलिग्रॅम प्रतिलिटर आढळले आहे. अति उपशामुळे खारे पाणी स्वच्छ पाण्याची जागा घेत आहे. आगाशी, नंदाखाल, बोळींज या परिसरात नायट्रेटचे प्रमाण ४५ पासून १०० मिलिग्रॅमपर्यंत पोचले आहे. हा घटक जास्त असल्यास लहान मुले व गर्भवती महिलांना त्याची बाधा होऊ शकते. वसई तालुक्यात ३१ ग्रामपंचायती असून त्यापैकी पश्चिम पट्ट्यात ११ ग्रामपंचायती आहेत. याठिकाणी ५० सार्वजनिक विहीरी, चार नळ पाणी पुरवठा योजना व ५११ बोअरवेलद्वारे पाणी पुरवठा केला जातो. या सर्व जलस्त्रोताचे नमुने तपासले जाणार आहेत.>विधान परिषदेत उपस्थित झाला प्रश्नया गंभीर प्रकरणाची दखल घेऊन आमदार आनंद ठाकूर व हेमंत टकले यांनी हिवाळी अधिवेशनात प्रश्न उपस्थित केला होता. त्याच्या लेखी उत्तरात पाणी पुरवठा मंत्री बबनराव लोणीकर यांनी दिलेल्या उत्तरात या परिसरातील पिण्याच्या पाण्याच्या नमुन्यांची तपासणी करण्याचे आदेश महापालिका आयुक्तांना दिल्याची माहिती दिली आहे. तिचा अहवाल आल्यानंतर पाणी पुरवठा संबंधी ठोस कार्यवाही केली जाईल, असेही त्यांनी म्हटले आहे.