शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

वाडा शहराला दूषित पाणीपुरवठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 6, 2019 23:39 IST

कचऱ्याचे पाणी मुरते बंधाºयात। भूजलही झाले प्रदूषित, प्रशासन कधी कारवाई करणार?

- वसंत भोईर

वाडा : शहराला पाणी पुरवठा वैतरणा नदीवर असलेल्या सिद्धेश्वर बंधाऱ्यांतून होते. या बंधाºयांच्या लगत अवघ्या १०० फूट अंतरावर वाडा नगरपंचायतीची कचराभूमी (डंपिंग ग्राऊंड ) आहे. पावसाळ्यात या डंपिंगमधून निचरा होणारे घाण पाणी वाहून या जलाशयात जात आहे.

वाडा शहरात गेल्या वर्षभरापासून कचरा भूमीचा प्रश्न चांगलाच गाजत आहे. वाडा नगरपंचायतकडे स्वत:च्या मालकीची जागा नसल्याने अन्य ठिकाणी जागा भाड्याने घेऊन शहरातील कचरा टाकला जातो. या पूर्वी शहरातील कचरा वाडा- भिवंडी या राज्य महामार्गालगत गांध्रे गावानजिक जागा भाड्याने घेऊन टाकला जात होता. मात्र रस्त्यालगत टाकल्या जाणाºया कचºयावर मोकाट जनावरे येऊन या महामार्गावर अपघात वाढल्याने तसेच या कचरा भूमीमुळे परिसरात दुर्गंधी वाढल्याने ही कचराभूमी बंद करण्यात आली.

वाडा शहरात कचराभूमीसाठी कुठेच जागा उपलब्ध न झाल्याने वाडा शहराला पाणी पुरवठा करणाºया सिद्धेश्वर बंधाºयालगतच्या मोकळ्या जागेत गेल्या दोन महिन्यांपासून नगरपंचायतीने वाडा शहरातील कचरा टाकण्यास सुरुवात केली. उन्हाळ्यात या कचराभूमीचा फारसा त्रास कुणाला झाला नाही. मात्र पावसाळा सुरु झाल्यापासून या कचराभूमीतील घाण पाणी थेट वाडा शहराला पाणी पुरवठा करणाºया जलाशयात जात आहे.

आधीच वाडा शहराला अत्यंत गढूळ, अशुद्ध पाण्याचा पुरवठा होत आहे. आता त्यात आणखीन भर दूषित पाण्याची पडू लागल्याने वाड्यातील ३५ हजार नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.दरम्यान या कचराभूमीतून निघणारे घाण पाणी नदीपात्रात जात आहे. नदी प्रवाहीत असल्याने या नदीकडील ऐनशेत, गांध्रे, तुसे या गावातील ग्रामस्थांनी ही कचराभुमी बंद करण्याची मागणी केली आहे.वाडा शहरवासीयांचे आरोग्य धोक्यातवाडा शहराला पाणी पुरवठा करणाºया जलाशयालगत टाकल्या जाणाºया कचºयांमध्ये हॉटेलमधील शिळे, खरकटे अन्न, खाटकांकडून कापण्यात येणाºया शेळ्या, मेंढी, कोंबड्या यांची आतडी, गावातील मृत जनावरे, कुत्री, डुकरे यांचे अवशेष अशा प्रकारची घाण येथील कचराभूमीवर टाकली जात आहे.येथील कचºयापासून व अन्य घाणीपासून तयार होणारे जीवजंतू पाण्याच्या प्रवाहातून नदीपात्रात (जलाशयात) जात आहे. यामुळे जलाशयातील पाणी दूषित होऊन मानवी जीवनास अतिशय धोकादायक व अपायकारक आहे. 

नदीपात्रालगतची कचराभूमी तातडीने अन्यत्र हलविण्यात यावी, अन्यथा नगरपंचायत प्रशासन विरोधात आंदोलन केले जाईल.- विजय दुरगुडे, ग्रामस्थवाडा शहरालगत मोठ्या प्रमाणात शासकीय जागा उपलब्ध असतांनाही त्या नगरपंचायतीकडे वर्ग करण्यास येथील लोकप्रतिनिधींना अपयश आल्यामुळेच ही परिस्थिती उद्भवली आहे. हे येथील लोकप्रतिनिधींच्या असाह्यतेचे द्योतक आहे.- किरण थोरात, सामाजिक कार्यकर्ता