शहरं
Join us  
Trending Stories
1
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
4
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
5
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
6
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
7
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
8
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
9
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
10
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
11
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
12
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
13
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
14
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
15
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
16
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
17
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
18
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
19
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
20
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

वाडा तालुक्यात पाणीटंचाई?, नद्या आॅक्टोबरमध्येच कोरड्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 26, 2018 00:06 IST

पावसाने यावर्षी लवकरच दडी मारल्याने तालुक्यातील भातशेती मोठ्या संकटात आली आहे.

- वसंत भोईरवाडा : पावसाने यावर्षी लवकरच दडी मारल्याने तालुक्यातील भातशेती मोठ्या संकटात आली आहे. यासाठीच तालुक्यातील शेतकऱ्यांनी सोमवारी वाडा तहसीलदार कार्यालयावर मोर्चा काढला होता. यादरम्यान तालुक्यातील नद्यांवर जे बंधारे आहेत ते तात्काळ बंद करा अशी मागणी करण्यात आल्यानंतर प्रशासन कामाला लागले असून तात्काळ बंधारे बंद करून पाणी अडवायला सुरु वात केली आहे.किमान नद्यांमध्ये असलेला पाणीसाठा शाबूत राहावा यासाठी नद्यांवर असलेले बंधारे बंद करा. अशी मागणी शेतकºयांनी केल्यानंतर प्रशासनाने आब्जे, पाली अशा विविध ठिकाणी असलेले बंधारे बंद करायला सुरुवात केली आहे. गेल्या अडीच ते तीन महिन्यांपासून पावसाने पाठ फिरवल्याने नद्यांमधून वाहणारे पाणी कमी झाले होते. मात्र, असे असूनही जिल्हा परिषदेच्या पाटबंधारे विभागाने आणि लघु पाठबंधारे विभागाने वेळीच लक्ष न दिल्यामुळे आज बंधारे पूर्ण भरतात की नाही हाच मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. प्रशासनाच्या या दुर्लक्षामुळे यावर्षी बंधाºयांमधील पाण्याची पातळी अतिशय कमी आहे. पिंजाळ व वैतरणा नदीत तर काही दिवसात खडखडाट होईल अशी चिंता काही शेतकºयांनी व्यक्त केली असून पिकांच्या विनाशानंतर आता पाणीबाणी हे नवे आव्हान लोकांना सोसावे लागणार असेच दिसत आहे.>प्रशासनाला गांभीर्यच नाहीवाडा तालुक्यातून वैतरणा, पिंजाळ, तानसा व देहर्जे या चार नद्या वाहत असून त्यावर जागोजागी लहानमोठे बंधारे आहेत. खर तर हे बंधारे नीट व वेळेत बंद केले तर तालुक्यातील निम्म्याहून अधिक पाणीसंकट दूर झाल्याशिवाय राहणार नाही मात्र दुर्दैवाने प्रशासनाला याचे गांभीर्य नसल्याने नद्यांचे पाणी वाहून जाते.पावसाने गेल्या अडीच महिन्यांपासून पाठ फिरवल्याने भात पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान तर झालेच मात्र परतीच्या पावसानेही दगा दिल्याने तालुक्यातील नद्यांमधील पाणीसाठा देखील मोठ्या प्रमाणात कमी झाला असून सात महिने टिकेल इतका पाणीसाठा नद्यांमध्ये उरलेला नाही.