शहरं
Join us  
Trending Stories
1
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
2
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
3
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
4
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
5
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
6
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
7
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
8
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
9
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
10
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
11
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
12
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
13
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
14
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
15
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
16
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
17
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
18
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
19
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
20
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

विरारच्या काही भागांत पाणीटंचाई!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2021 00:26 IST

चार दिवसाआड पाणी येत असल्याने महिलांमध्ये तीव्र संताप

विरार : मनवेलपाडा, कारगिल नगर, नाना-नानी पार्क आदी भागात गेल्या काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणात पाणीटंचाई निर्माण झाली असून, चार दिवसाआड येणाऱ्या पाण्यामुळे महिला हैराण झाल्या आहेत. मात्र, महापालिकेकडून यावर अद्याप कोणतीही उपाययोजना करण्यात आलेली नाही. मनवेलपाडा, कारगिल नगर, नाना-नानी पार्क आदी भागात मोठ्या प्रमाणात लोडबेअरिंग इमारती आणि चाळी आहेत. लाखो वस्तीच्या या भागात प्रत्येक चाळ किंवा इमारतीनुसार नळजोडण्या आहेत. काही चाळी किंवा इमारतींना तर अद्यापही नळजोडण्या मिळालेले नाहीत.  परिणामी १०-१० रुम एका नळजोडणीवर अवलंबून असतात. यात एक तास पाणी येणार असेल तर या १० रुमना तितकी मिनिटे विभागून पाणी भरावे लागते. यामुळे महिलांचा बहुतांश वेळ हा पाणी भरण्यात जातो. कित्येक वेळा तर रात्री-अपरात्री पाणी सोडण्यात येत असल्याने महिलांना नाहक त्रास सहन करावा लागतो.त्यातच आता गेला महिनाभर चार दिवसाआड पाणी येत असल्याने महिला प्रचंड त्रासल्या आहेत. यासंदर्भात येथील महिलांनी स्थानिक नगरसेवक व पालिका प्रशासनाकडे विचारणा केली असली, तरी त्याबाबतचे योग्य उत्तर मिळत नसल्याच्या तक्रारी आहेत.  दरम्यान, नालासोपारा-मोरेगाव येथील जलकुंभ व या जलकुंभापासून विविध ठिकाणी टाकण्यात येणाऱ्या जलवाहिन्यांचे काम सुरू असून सर्व कामे पूर्ण होणार असल्याची माहिती दिली होती.  केंद्र शासन पुरस्कृत अमृत अभियान योजनेंतर्गत वसई तालुक्यात विविध ठिकाणी उभारण्यात येणारे जलकुंभ व या जलकुंभांपासून टाकण्यात येणाऱ्या जलवाहिन्यांच्या कामाचा आढावा वसई-विरार शहर महापालिका आयुक्त, पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी, अमृत अभियान योजनेच्या अधिकाऱ्यांकडून वेळोवेळी घेण्यात आला होता. तर पालकमंत्री दादाजी भुसे यांनी घेतलेल्या आढावा बैठकीत १४ पैकी ८ जलकुंभांचे काम करण्यात येईल, अशी माहिती आयुक्त गंगाथरन डी. यांनी  दिली होती. ...तर पालिकेवर हंडा-कळशी मोर्चाविरार परिसरात गेल्या काही दिवसांपासून निर्माण झालेल्या पाणीटंचाई-विरोधात नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत असून भारतीय जनता पक्ष आक्रमक झाला आहे. येत्या आठ दिवसांत परिसरात पाणीपुरवठा सुरळीत झाला नाही, तर महानगरपालिकेवर हंडा-कळशी मोर्चा काढण्याचा इशारा देण्यात आला आहे. 

टॅग्स :water scarcityपाणी टंचाई