शहरं
Join us  
Trending Stories
1
Cough Syrup Case : विषारी 'कोल्ड्रिफ' कफ सिरप बनवणाऱ्या कंपनीच्या मालकाला अटक! औषध प्यायल्याने २० मुलांचा मृत्यू
2
तेजस्वी मुख्य चेहरा, एक-दोन नव्हे तर एवढे उपमुख्यमंत्री...! बिहारमध्ये महाआघाडीनं तयार केला जागा वाटपाचा असा फॉर्म्यूला
3
बिहार निवडणुकीपूर्वी NDA मध्ये रस्सीखेच; स्वत:ला मोदींचा हनुमान म्हणवणारा नेता का आहे नाराज?
4
अफगाणिस्तानचे परराष्ट्र मंत्री पहिल्यांदाच भारत दौऱ्यावर; भारतीय अधिकाऱ्यांसमोर मोठा पेच, कारण काय?
5
पुण्यात पुन्हा दहशतवादी?; ATS आणि पुणे पोलिसांकडून कोंढवा परिसरात रात्रभर सर्च ऑपरेशन
6
इस्रायल-हमास शांतता करार: डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा दोघांचीही सही मिळविली, युद्ध थांबणार?
7
आजचे राशीभविष्य-९ ऑक्टोबर २०२५: आनंदोत्सव साजरा करण्याचा दिवस; व्यवसाय-नोकरीत होईल लाभ!
8
दोन शिवसेनेतल्या सततच्या भांडणांचा फायदा कोणाला?
9
संपादकीय: दिलासा तूर्त, चिंता शाश्वत! कर्जमाफीचा उच्चार न करता दिलेले पॅकेज...
10
पाकवर हल्ला कोणाच्या सांगण्यामुळे राेखला? पंतप्रधान नरेंद्र माेदी यांचा काॅंग्रेसला सवाल
11
उद्योगांवर विजेचा ‘गुपचुप’ हल्ला, राज्यात स्थिती आणखी बिकट; प्रति युनिट दर ११.१५ रुपयांवर 
12
वाहनचालकांनो सावधान! विना हेल्मेट, राँग साइड, प्रखर दिव्यांविरुद्ध कठोर कारवाई करा : सुप्रीम कोर्ट
13
इलेक्ट्रिक कार विक्रीत दुप्पट वाढ; सप्टेंबरमध्ये नवा विक्रम; १५ हजार इव्हींची विक्री
14
‘६० कोटी जमा करा, मग याचिकेवर विचार’; शिल्पा शेट्टीवर न्यायालय संतापले...
15
शिवसेना पक्ष अन् धनुष्यबाण कुणाचा? १२ नोव्हेंबरला सुनावणी   
16
भाजपकडून लोकप्रिय चेहऱ्यांना संधी; गायिका मैथिलीस पक्षाची उमेदवारी? डॅमेज कंट्रोल मोड ऑन
17
एक जीबी डेटा आता चहाच्या एका कपापेक्षाही स्वस्त झाला आहे : मोदी
18
आता स्मार्ट चष्म्याने पाहा, बोला अन् पैसे द्या; फोनशिवाय अन् पिन न टाकता करता येणार व्यवहार 
19
प्रा. कितागावा, रॉबसन अन् याघी यांना नोबेल; मेटल-ऑर्गेनिक फ्रेमवर्कसाठी रसायनशास्त्रातील पुरस्कार 
20
भारताशी युद्ध झाल्यास आम्हीच बाजी मारणार; पाकचे संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची दर्पोक्ती

विक्रमगड तालुक्यातील पाणीटंचाई समस्या झाली गंभीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 11, 2021 00:50 IST

कायमस्वरूपी उपाययोजनांची मागणी

राहुल वाडेकर

विक्रमगड : तालुक्यामधील अनेक गावपाड्यांना गेल्या अनेक वर्षांपासून पाणीटंचाईचा मोठा सामना करावा लागत आहे. काही भागांत मार्चच्या पहिल्या आठवड्यापासून पाण्याची समस्या जाणवू लागली असल्याने या भागात टँकरचे प्रस्ताव तहसीलदार कार्यालयाकडे पाठविण्यात येत आहेत. दरवर्षी तालुक्यातील हजारो नागरिकांना पाणीटंचाईशी दोन हात करावे लागत असल्याने शासनाने धोरणात्मक निर्णय घेऊन पाणीटंचाईवर कायमस्वरूपी तोडगा काढावा, अशी मागणी येथील नागरिकांनी केली आहे.

विक्रमगड तालुक्यातील बराचसा भाग डोंगराळ असल्याने फेब्रुवारीनंतर तालुक्यातील काही गावपाड्यांना पाणीटंचाईचा सामना करावा लागतो. ही पाणीटंचाई मार्चपासून ते पाऊस पडेपर्यंत कायम राहते. हक्काच्या पाण्यासाठी या भागात महिला संघर्ष करीत आहेत. विक्रमगड तालुक्यात सुमारे २८ गावपाड्यांना पाणीटंचाईचा दरवर्षी सामना करावा लागतो. या २८ गावपाड्यांमधून सुमारे ४० ते ५० हजार नागरिकांना दिवसाला जवळपास २५ टँकर लागत आहेत.  तालुक्याचे प्रशासन या गावांमध्ये नागरिकांना पाणीपुरवठा करण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करीत असले तरी यावर कायमचा तोडगा अजूनही निघालेला नाही. वास्तविक, तालुक्यामध्ये पाण्याचे मोठे स्रोत आहेत. सूर्या ही मोठा धरण प्रकल्प आहे. खांड लघुपाटबंधारा, मुहू खुर्द लघुपाटबंधारा, चार मोठ्या नद्या उपलब्ध असताना येथील गावांना पाणीटंचाई उद्भवत आहे, ही शोकांतिका असल्याचे सांगितले जाते. शासनामार्फत अनेक वेळा येथील पाणीटंचाईचा निपटारा करण्यासाठी मोठमोठ्या योजना प्रस्तावित केल्या होत्या, मात्र या योजना अजूनही कागदावरच लालफितीत अडकल्या आहेत. ज्या गावांना टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जातो अशी गावे डोंगराळ भागात असल्याने तेथे नळपाणीपुरवठा करणे सोपे नसले तरी या तालुक्यांमध्ये जलस्रोत टिकवून ठेवण्यासाठी छोटे-मोठे बंधारे बांधणे गरजेचे असल्याचे सांगितले जाते.

तालुक्यातील भौगोलिक परिस्थितीमुळे पाणीटंचाईची परिस्थिती निर्माण होत असली तरी यावर शासनाने कायमस्वरूपी तोडगा काढायला हवा. तालुक्यात पाण्याचे स्रोत मोठ्या प्रमाणात आहेत. नदी-नाले यांच्यावर बंधारे बांधायला हवेत.- डॉ. सिद्धार्थ सांबरे, सामाजिक कार्यकर्ते

तालुक्यात अनेक पाणीपुरवठा योजना गेल्या ७-८ वर्षांपासून अपूर्ण आहेत. या पाणीपुरवठा योजना तातडीने पूर्ण करून चालू करायला हव्यात. तसेच तालुक्यातील अनेक गावांची वाढती लोकसंख्या बघता नवीन पाणीपुरवठा योजना राबवायला हव्यात.- प्रमोद विश्वनाथ पाटील, सदस्य - युवा प्रहार ग्रुप

टॅग्स :Vasai Virarवसई विरार