पालघर : पाण्याचा अपव्यय टाळून पाणी काटकसरीने वापरावे याविषयी जनजागृती होण्यासाठी जलजागृती सप्ताह साजरा करण्यात आला. पाण्याची बचत हीच पाण्याची निर्मिती आहे. त्यामुळे काळाची गरज ओळखून पाणी बचतीचे कार्य यापुढेही अखंडपणे सुरू ठेवणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन खारभूमी विकास विभाग, ठाणे चे कार्यकारी अभियंता मे.ग.वाघमारे यांनी केले.दि. १६ ते २२ मार्च या दरम्यान पालघर जिल्ह्यात जलजागृती सप्ताह साजरा करण्यात आला. बुधवारी जागतिक जलिदनानिमित्त या सप्ताहाचा समारोप कार्यक्र म जिल्हाधिकारी कार्यालय, येथे आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी ते बोलत होते.पाणी ही संपत्ती असून ती अत्यंत काटकसरीने व योग्य पध्दतीने वापरावी. असे आवाहन वाघमारे यांनी यावेळी केले. तसेच जलसंपदा विभागातील संखे यांनी पाणी विषयक मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाच्या प्रारंभी उपस्थितांनी सामुहिक जलप्रतिज्ञा घेतली. या कार्यक्रमास जलसंपदा विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. या जलजागृती सप्ताहांतर्गत जिल्ह्यात ८ तालुक्यांमध्ये चित्ररथ फिरविण्यात आला. पाण्याची बचत हीच पाण्याची निर्मिती आहे हा विचार बिंबवण्यात आला.तसेच सर्व तालुक्यांमध्ये आम्ही सारे वसईकर या संस्थेने जलजागृती या संस्थने जलजागृती विषयी पथनाट्य सादर करण्यात आले. शालेय विद्यार्थ्यांच्या चित्रकला स्पर्धा घेण्यात आल्या. तसेच पाणी वापर संस्थांच्या बैठका घेवून जलजागृतीचे महत्व पटवून देण्यात आले आहे. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन सुनील तांबेवाघ यांनी केले. (वार्ताहर)
‘पाण्याची बचत हीच पाण्याची निर्मिती’
By admin | Updated: March 25, 2017 01:06 IST