शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

विरारमधील जलस्रोत संकटात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 14, 2018 05:09 IST

पन्नास वर्ष जुना बावखल बाधीत : सांडपाण्यामुळे परिसरात रोगराई

विरार : येथील एका अनधिकृत इमारतीच्या विकासकाने सांडपाणी दोन फुटावर असलेल्या मुख्य नाल्यात न सोडता शेजारी असलेल्या जवळपास ५० वर्ष जुन्या बावखलात सोडल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. परिणामी येथील रहिवाशाना डासांचा त्रास सहन करावा लागत आहे.

एकीकडे वसई विरार शहरात पाण्याचा तुटवडा असतानाच नैसर्गिक गोड्या पाण्याचे स्रोत नष्ट करण्याचे प्रयत्न अनधिकृत विकासकांकडून सुरु आहे. झपाट्याने वाढत चाललेली बांधकामे व त्याकडे महापालिकेने केलेल्या दुर्लक्षामुळे हे प्रकार वाढत चालले आहे. विरार पूर्व येथील फुलपाडा स्थित गांधी चौक येथे झा निवास ही इमारत आहे. तिचे बांधकाम मुख्य नाल्याच्या कठड्यावर केले आहे. ती इमारत दहा वर्ष जुनी असून तेथे जवळपास शंभरहुन अधिक कुटुंब येथे राहत आहेत. या प्रकरणाबाबत महापालिका आयुक्त सतीश लोखंडे यांना माहिती दिली असता त्यांनी तात्काळ लक्ष देत सबंधित अधिकाऱ्यांना चौकशीचे आदेश दिले आहेत.याबाबत विकासक पवन तिवारी म्हणाले की, या इमारतीचे बांधकाम हे दहा वर्ष जुने आहे. इमारत बांधली होती तेव्हा आम्ही त्याची ड्रेनेज लाईन चेंबर बनवून मुख्य नाल्यात सोडली होती. त्यानंतर या इमारतीचा ताबा सोसायटी स्थापन झाल्यानंतर रहिवाशांना देण्यात आला. गेल्या दोन वर्षांपासून चेंबर तुटलेल्या अवस्थेत असल्याने बिल्डिंगचे सांडपाणी बावखलात जात आहे.दहा वर्षांपूर्वी इमारत बांधली होती तेव्हा आम्ही त्याची ड्रेनेज लाईन चेंबर बनवून मुख्य नाल्यात सोडली होती. गेल्या दोन वर्षांपासून चेंबर तुटलेल्या सांडपाणी बावखलात जात आहे. चेंबर दुरु स्त करण्याचे काम सोसायटीचे आहे.- पवन तिवारी (विकासक)या परिसरात आम्ही पिढ्या-न-पिढ्या राहत असून पूर्वी या बावखलाच्या पाण्याचा पिण्यासाठी, शेतीसाठी वापर केला जात होता. मात्र हे बावखल आता सांडपाण्याच्या विळख्यात अडकले आहे.- अक्षय पाटील, स्थानिक 

टॅग्स :Vasai Virarवसई विरारWaterपाणी