शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
3
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
4
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
5
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
6
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
7
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
8
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
9
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
10
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
11
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
12
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
13
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
14
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
15
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
16
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
17
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
18
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
19
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
20
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
Daily Top 2Weekly Top 5

नायगावात पाणी झाले ‘कुलूप बंद, पाणीबाणीचा असाही परिणाम

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 23, 2018 23:43 IST

नायगाव पूर्व मधील गणेश नगर येथे सध्या पाणीबाणी सुरू आहे.

नालासोपारा : नायगाव पूर्व मधील गणेश नगर येथे सध्या पाणीबाणी सुरू आहे. पाणी जास्त मौल्यवान असून त्याच्या एका थेंबाचीही चोरी होवू नये याकरिता येथील रहिवासी पाण्याच्या पिंपांना कुलूप लावत असल्याचे आश्चर्यचकीत करणारे चित्र दिसून येत आहे. पाण्याची टंचाई आणि त्यात पाणी कमी पडू नये म्हणून ही उपाययोजना केली जात असल्याचे रहिवाशांचे म्हणणे आहे. मौल्यवान वस्तू कोणी चोरून नेईल या भीतीने जशी कुलूपात सुरक्षित ठेवली जाते, बँकेच्या लॉकर्सचा आधारही घेतला जातो. त्याच रितीने आता नायगावमध्ये पाणी सांभाळण्यासाठी पिंपांना कुलूप लावले जात आहे.याठिकाणी वसई विरार महापालिकेचे पाणी अद्याप आले नाही. त्यामुळे टँकरने पाणीपुरवठा होत असतो. चाळीत प्रवेश करताच याठिकाणी पाण्याची मोठमोठी कुलूपबंद पिंपे ठेवलेली दिसतात. रात्री साडेआठ वाजता टँकर येताच पाणी भरण्याची धावपळ सुरु होते ते भरले की त्याला बाहेरून कुलूप ठोकले जाते. याठिकाणी चाळीत राहणाऱ्या रहिवाशांची सुमारे २५० हून अधिक पिंपे बाहेर असतात. बैठ्या चाळीतील घरांचे क्षेत्रफळ कमी असल्याने घराच्या समोर हीे पिंपे ठेवली जातात.वसई विरार महापालिकेने या ठिकाणी पाईपलाईन टाकण्यास सुरुवात केली आहे. परंतु अनेक इमारती पाण्यावाचून आहेत. त्यामुळे टँकरचा पाणीपुरवठा या भागात होत असतो. एका टँकरसाठी १ हजार ते १५०० रुपये मोजावे लागतात. गणेश चाळीत देखील हीच परिस्थिती आहे.