शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
"बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून... "; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

पांढऱ्या कांद्याने आणले यंदा शेतकऱ्यांच्या डोळ्यांत पाणी

By admin | Updated: April 10, 2017 05:15 IST

रूचकर चवदार आणि औषधी गुणधर्मांमुळे नावारुपाला आलेला वाड्याचा पांढरा कांदा बाजारात येऊ लागला आहे

वसंत भोईर/वाडारूचकर चवदार आणि औषधी गुणधर्मांमुळे नावारुपाला आलेला वाड्याचा पांढरा कांदा बाजारात येऊ लागला आहे. मात्र यावर्षी त्याला योग्य भाव नसल्यामुळे नफा तर सोडाच पण झालेला खर्च वसूल होतो की नाही, अशी भीती शेतकरी व्यक्त करत असून त्याने शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आणले आहे. वाडा तालुक्याला भाताचे कोठार म्हणून संबोधिले जाते. भातानंतर येथील शेतकरी कडधान्य, फळ, फुलांची शेती करीत आहेत. पूर्वी एकमेव भाताचे पिक घेतले जायचे. आता मात्र पांढ-या कांद्याला येथील हवामान पोषक असल्याने अनेक शेतकरी आता त्याची शेती करू लागले आहेत. चांबले, नेहरोली, बिलावली, डाकिवली, देवघर, कुडूस, गातेस, सांगे व नाणे या गावात पांढरा कांद्याची लागवड मोठ्या प्रमाणात केली जाते. भात शेती नंतर शेतीची नांगरणी करून ८.८ आकाराच्या कुंड्या तयार करून त्यावर कांद्याचे रोप लावले जाते. कांद्याला १० ते १२ दिवसातून पाणी दिले जाते. त्यामुळे कमी पाण्यात कांदा तयार होतो. त्यामुळे शेतक-यांनी त्याच्या लागवडीस पसंती दिली आहे. कांद्याला शेणखत, दाणेदार, १८:१८:१८ अशी खते दिली जातात. तर रोगाच्या संरक्षणासाठी किटक नाशके फवारली जातात. एका एकराला ६० हजारांचा खर्च येतो. यावर्षी थंडी पडल्यामुळे कांदा पिकावर परिणाम होऊन कांद्याची म्हणवी तशी वाढ झालेली नाही, अशी माहिती कुडूसचे शेतकरी शरद चौधरी यांनी दिली. मजुरीचे दर, औषधे, खते व यांत्रिक उपकरणे याचे दर वाढल्याने कांदा शेती परवडत नाही. असे शेतकरी सांगतात. पांढरा कांदा टिकावू असून साधारणपणे एक वर्षापर्यंत टिकतो त्यामुळे शेतकरी पांढ-या कांद्याची लागवड करत आहे. मात्र भाव नसल्यामुळे पांढरा कांद्याची शेती तोट्यात चालली आहे.