शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

विटीदांडू हा खेळ प्रत्येक शाळेत पोहचवायचा आहे - विवेक कुवरा

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 24, 2019 00:42 IST

पालघर जिल्ह्यात विटी दांडू या खेळाची मुहूर्तमेढ रोवण्यात महत्त्वाची भूमिका बजावणारे प्रशिक्षक विवेक कुवरा यांच्याशी केलेली बातचीत.

- खलील गिरकरविटीदांडू हा आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळल्या जाणाऱ्या खेळाची २०१६ मध्ये पालघर जिल्हा असोसिएशनची स्थापना झाली. २०१९ मध्ये काठमांडू येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सुवर्णपदक मिळविणाºया राष्ट्रीय संघात या असोसिएशनचे सात खेळाडू होते. जिल्ह्यात या खेळाची मुहूर्तमेढ रोवण्यात महत्त्वाची भूमिका बजावणारे प्रशिक्षक विवेक कुवरा यांच्याशी केलेली बातचीत.प्रश्न : विटीदांडू या खेळाची पालघर जिल्ह्यात मुहूर्तमेढ कशी रोवली गेली?ग्रामीण भागात गावागावात हा खेळ मनोरंजनाकरिता खेळला जातो. मात्र हा स्पर्धात्मक पातळीवरचा सांघिक खेळ आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळला जातो. हे २०१६ मध्ये समजले. डहाणू तालुक्यातील विजय गुहे ही व्यक्ती जालना येथे गेली होती. त्यांना या खेळाविषयी माहिती झाल्यानंतर त्यांनी तालुक्यात येऊन प्रयत्न सुरू केले. मात्र त्यांना अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही. माझ्या स्नेह्यांकडून मला या खेळाची माहिती मिळाल्यानंतर याबाबत मी अध्यापन करीत असलेल्या कोसाबड येथील नूतन बाल शिक्षण संघाच्या अध्यापक विद्यालयातील विद्यार्थ्यांना याकरिता विश्वासात घेऊन माहिती दिली. या खेळाचे सखोल ज्ञान आणि नियम समजून घेण्याकरिता जालन्याला जाऊन प्रशिक्षण घेतले.प्रश्न: पहिल्यांदा खेळाडूंची प्रतिक्रि या कोणती होती?या खेळाकरिता संघ बांधणी करण्याचा प्रस्ताव पहिल्यांदा विद्यार्थ्यांसमोर ठेवल्यावर काही मिनिटे हशा पिकला. अशा पद्धतीचा सांघिक खेळ असतो, याबाबत त्यांना विश्वास बसला नाही. या कामी नूतन बाल संघाच्या अध्यापक विद्यालयातील प्राध्यापक आणि पदाधिकारी यांना विश्वासात घेतले. त्यांच्याकडून प्रतिसाद आल्यानंतर सरावाला सुरूवात झाली. खºयाअर्थाने ताराबाई मोडक आणि अनुताई वाघ यांच्या कर्मभूमीत या खेळाची मुहूर्तमेढ रोवली गेली.प्रश्न: स्पर्धात्मक प्रवास कसा सुरू झाला?विद्यार्थी आणि पालकांना एकत्रित करून खेळाकरिता साहित्याची निर्मिती करून सरावही सुरू केला. मात्र प्रत्यक्षात सामान्यांचा अनुभव नसल्याने बहुचर्चित ‘लगान’ चित्रपटातील भुवन आणि खेळाडूंची जी मानसिक अवस्था दाखवली होती नेमका तोच अनुभव आम्ही घेतला. पहिल्यांदा राज्यस्तरीय स्पर्धेत भाग घेतला आणि मुलींच्या संघाने प्रथम तर मुलांच्या संघाने द्वितीय क्रमांक पटकावला. जानेवारीत काठमांडू येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत भारताच्या दोन्ही संघाने सुवर्णपदक मिळविले.जिल्ह्यातील प्रत्येक शाळेत हा खेळ पोहचवायचा आहे. शिवाय खेळाडूंना राज्य आणि राष्ट्रीय संघाच्या निवडीकरिता तयार करताना प्रत्यक्ष सामन्यांचा अनुभव द्यायचा आहे. याकरिता योजना आखली आहे, परंतु निधीचा तुटवडा भासत आहे.

टॅग्स :palgharपालघर