शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
2
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव
3
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
4
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...
5
ही पाच ठिकाणं आहेत पाकिस्तानी सैन्याचे पंचप्राण, भारताने इथे हल्ला केल्यास पाकिस्तान गुडघे टेकून पत्करेल शरणागती
6
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
7
काश्मीरच्या बडगाममध्ये CRPF च्या वाहनाचा अपघात; अनेक जवान जखमी
8
अक्षय कुमार-ऋषी कपूर यांच्यासोबत केलं काम, पण आता उदरनिर्वाहासाठी अभिनेता करतोय वॉचमेनची नोकरी
9
"महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या समस्या सोडवण्यासाठी सर्वतोपरी मदत करणार’’, अजित पवार यांचं आश्वासन
10
पहलगाम हल्ल्यानंतर घेतलेल्या भूमिकेवरून काँग्रेसनं मोदींना घेरलं, हे चार प्रश्न उपस्थित करून केली कोंडी
11
रेल्वे कर्मचाऱ्यांनी निवृत्त सहकाऱ्याला दिला 'असा' निरोप; ये- जा करणारे बघतंच राहिले!
12
INDW vs RSAW : प्रतिकाच्या विक्रमी खेळीनंतर स्नेह राणाचा 'पंजा'; टीम इंडियाचा सलग दुसरा विजय
13
बाबूरावला कंटाळले परेश रावल, म्हणाले- "हेरा फेरी म्हणजे गळ्याला लागलेला फास..."
14
१८ वर्षांची तरुणी पडली ५५ वर्षीय व्यक्तीच्या प्रेमात, पुढं घडलं भयंकर, ऐकून पायाखालची जमीन सरकेल
15
गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांचा पगार किती? कंपनीने फक्त सुरक्षेवरच खर्च केले ७१ कोटी रुपये
16
बंगळुरूत 'पाकिस्तान जिंदाबाद' म्हणणाऱ्या व्यक्तीला बेदम मारहाण, जागीच मृत्यू; गृहमंत्री म्हणाले...
17
झिपलाईन ऑपरेटर अल्लाहू अकबर का म्हणत होता? पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांचा वेगळाच दावा...
18
तणावपूर्ण परिस्थितीदरम्यान पाकिस्तानकडून सायबर ‘वार’, भारतीय लष्कराची वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न 
19
१ लाखांपेक्षा अधिक गुंतवणूकदार कंगाल झाले; ९२% आपटला हा शेअर, आता विकणंही झालं कठीण
20
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय

कातकरी घरकुलाच्या प्रतीक्षेत; सात वर्षांपासून संघर्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2019 23:52 IST

जव्हार एकात्मिक आदिवासी प्रकल्प कार्यालयाचा अनागोंदी कारभार

- रवींद्र साळवे मोखाडा : तालुक्यातील पळसुंडा ग्रामपंचायतीतील कातकरी कुटुंब सात वर्षांपासून घरकुलाच्या प्रतीक्षेत आहे. २०११-१२ मध्ये गोपाळ बाळू वळवी, जनाबाई अशोक मिसाळ, सोपान गंगा वळवी या लाभार्थ्यांना जव्हार प्रकल्प कार्यालयाकडून घरकूल मंजूर झाली होती. ही घरकुले शूर झलकारी एकता महासंघ ठाणे यांच्या माध्यमातून बांधून दिली जाणार होती.या घरकुलाबरोबरच १९३ मंजूर घरकुले बांधण्याचा ठेका देखील जव्हार एकात्मिक आदिवासी प्रकल्प कार्यालयाने शूर झलकारीला दिला होता. मात्र, हे काम अर्धवट राहिले. आणि यात नाहक अनेक कातकरी कुटुंबांचा बळी गेला. अनेकांची घरे अर्धवट राहिली. अनेकांना तर या योजनेची दमडीही मिळाली नाही. यामुळे आजही हे कातकरी कुटुंब निवाऱ्याच्या प्रतीक्षेत आहेत.कुडामेडिच्या लहानशा झोपडीत वास्तव्य करणाºया या कुटुंबाची पावसाळ्यात मात्र अत्यंत बिकट परिस्थिती होते. झोपडीचं छत गळकं, कुड मोडलेत, जमीन ओली, यामुळे रहायचे कुठे, झोपायचे कुठे? अशा परिस्थितीत ऊन - पाऊस वारा थंडीमध्येही ही कुटुंबे जगत आहेत. या घरकुलांना प्रकल्प कार्यालयातून अनुदान दिले जाईल, असे सांगण्यात आले होते. यानंतर अनेकवेळा या लाभार्थ्यांनी प्रकल्प कार्यालयाचे उंबरठे झिजवले. परंतु प्रशासनाकडून चालढकल होत असल्याने सात वर्षे होत आली तरी कुणी दखल घेत नाही.माझ्या वडिलांना झोपडी मिळाली होती. त्यांच्या हयातीत काही ती तयार झाली नाही. आता माझ्या मुलाला देखील झोपडी मिळाली नाही. आम्ही कुडामेडीच्या झोपडीत रहातो. आता मतदानाच्या वेळेस आमच्याकडे मत मागायला आल्यावर आम्ही मृत आहोत असंच सांगणार. कारण आम्ही जिवंत असूनही कुणी आमच्याकडे लक्षच देत नाहीत, असे गंगाराम वळवी यांनी ‘लोकमत’ला सांगितले. गेली अनेक दशके दारिद्र्यात खितपत पडलेला हा कातकरी समाज विकासापासून कोसो मैल दूर आहे.मुंबईपासून १०० किलोमीटर अंतरावर असलेल्या पालघर जिल्ह्यातील आदिवासी पाड्यांवरील कातकरी समाज मुलभूत सुविधांपासूनही वंचित आहे वर्षातील काही दिवस हातात काम असेल तेव्हा या वस्तीवर राहायचे. अन्यथा संसार पाठीवर घेऊन घरापासून काही किलोमीटर लांब वीटभट्टी किंवा शेतावर मजुरीचे काम करायचे. मिळेल ते खायचे, पुरेसे शिक्षण नाही, यामुळे आश्रमशाळा जवळ असलेल्या वस्त्यांवरील मुले कशीबशी पाचवीपर्यंत शिकू शकतात. आर्थिक विवंचनेने ग्रासलेल्या गावाबाहेर असलेल्या या पाड्यांना मुलभूत सुविधाही मिळत नाहीत. मालकीची शेतजमीन नाही शिवाय उदरनिर्वाहचे इतर कोणतेही साधन उपलब्ध नसल्याने रोजगारासाठी कोसो दूर भटकंती करावी लागत आहे.कातकरी म्हटले की, उन्हातान्हात मेहनत करणारे, अंगावर वीतभर वस्त्र असलेले आणि रानावनात भटकणारे बांधव डोळ्यांसमोर येतात. स्वातंत्र्यानंतर सहा दशके उलटूनही कातकऱ्यांबाबत हे चित्र तसेच आहे. देशातील मूळनिवासी आदिम जमात असणारा कातकरी समाज हा कायमच गावकुसा बाहेर राहिला. त्यांच्याकडे मालकीची जमीन नाही, शिक्षणाचा गंध नाही, या समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शासनस्तरावर अनेक तोकडे प्रयत्न झाले. विविध योजना सुरू झाल्या खºया, मात्र त्यांची अंमलबजावणी झाली नाही. शासनाच्या उदासीन धोरणामुळे हा समाज दुर्लक्षित राहिला आहे. आता तरी आमच्यापर्यंत किमान मूलभूत सोयीसुविधा पोहोचवा, अशी मागणी या समाजाने केली आहे.यासंबंधातील माहिती तुम्हाला मोखाडा पंचायत समितीकडे मिळेल. ही माहिती त्यांच्याकडून घ्या.- सौरभ कटियार(प्रकल्प अधिकारी, जव्हार)आम्ही घरकुलांचे लाभार्थी ठरलो. त्या ठेकेदाराने पाया बांधून दिला. त्यानंतर तो परत आलाच नाही आणि प्रकल्प कार्यालयात आमची कुणी घेत दाद घेत नाही.- जनाबाई मिसाळ, वंचित लाभार्थी