शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
2
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
3
DSP सिराजचा ऑन ड्युटी फॉर्म्युला! सर्वाधिक विकेट्स अन् १००० पेक्षा अधिक चेंडू टाकण्याचा मोठा पराक्रम
4
धक्कादायक! नागपुरात भर रस्त्यावर महिला पोलिसाला मारहाण करत विनयभंग
5
मोबाईलसाठी रेल्वेतील प्रवाशाच्या हातावर फटका, तरुणाने गमावला पाय; २० हजार रुपयेही पळवले
6
Pahalgam Attack: ते दहशतवादी पाकिस्तानी असल्याचे लष्कराने म्हटले नाही; संरक्षण मंत्रालयाचा खुलासा
7
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या
8
IND vs ENG : एक मालिका अन् दोन मालिकावीर! गंभीरमुळं गिलसोबत हॅरी ब्रूकला मिळाला हा पुरस्कार
9
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?
10
मारहाण, शिवीगाळ असं काहीच घडलं नाही; पुणे पोलिसांनी मुलींचे सगळेच आरोप फेटाळले
11
'भारत आगीशी खेळत आहे'; डोनाल्ड ट्रम्प, एस. जयशंकर यांच्याबद्दल खोटी विधाने केली पोस्ट, 'एक्स'ने खातीच केली बंद
12
iPhone 16: पहिल्यांदाच आयफोन १६ च्या खरेदीवर एवढी मोठी सूट!
13
भारत रशियाला युक्रेनविरुद्ध युद्धासाठी अप्रत्यक्षपणे निधी पुरवतोय, अमेरिकेचा आरोप!
14
येमेनमध्ये निमिषा प्रियाच्या अडचणी वाढल्या! मृताच्या भावाने पत्र लिहून केली मोठी मागणी
15
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
16
आपच्या सत्येंद्र जैन यांना दिलासा, CBIच्या क्लोजर रिपोर्टवर कोर्टाचं शिक्कामोर्तब
17
माझा 'तो' व्हिडीओ रोहित पवारांना कुणी पाठवला? मंत्री मेघना बोर्डीकर म्हणाल्या...
18
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
19
Siraj, IND vs ENG: ‘पूरा खोल दिए पाशा...’; सिराजच्या 'मॅचविनिंग' गोलंदाजीवर ओवेसींची हैदराबादी शैलीत स्तुती
20
कमाल झाली राव! रशियन महिलेने सांगितली भारतीय पुरुषाशी लग्न करण्याची खास कारणं, जिंकलं मन

वाडा नगरपंचायत निवडणूक : पालकमंत्री सवरांसह खासदार कपिल पाटलांची प्रतिष्ठा पणास,

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2017 05:56 IST

वाडा नगरपंचायतीची निवडणूक येत्या १३ तारखेला होत असून या निवडणुकीत राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा पालघरचे पालकमंत्री विष्णू सवरा यांनी त्यांची मुलगी निशा सवरा हिला नगराध्यक्षपदाच्या निवडणूक रिंगणात उतरवले आहे.

वसंत भोईर/ लोकमत न्यूज नेटवर्कवाडा : वाडा नगरपंचायतीची निवडणूक येत्या १३ तारखेला होत असून या निवडणुकीत राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा पालघरचे पालकमंत्री विष्णू सवरा यांनी त्यांची मुलगी निशा सवरा हिला नगराध्यक्षपदाच्या निवडणूक रिंगणात उतरवले आहे. तर जिल्हा विभाजनानंतर होत असलेल्या या नवस्थापित नगरपंचायतीच्या निवडणूकीत सवरा यांच्या सोबत खासदार कपिल पाटील यांचीही प्रतिष्ठापणाला लागली आहे.त्यामुळे ही निवडणूक भाजप व सवरा यांच्या प्रतिष्ठेची होणार आहे. तर दुसरीकडे शिवसेनेच्या प्रचाराची धुरा पालघर जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष निलेश गंधे हे सांभाळत असून सवरा विरोधात निलेश गंधे असा सामना रंगला असून दोघांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. या निवडणूकीत खुद्द सवरा यांची मुलगी उतरल्याने ही निवडणूक शहरापूरती मर्यादित न राहता जिल्हा व राज्य पातळीवर गेली आहे. याच सुमारास ठाणे जिल्हा परिषदेची निवडणूक होते आहे. त्यामध्ये आपली राजकीय उपयुक्तता व प्रभाव सिध्द करण्यासाठी खासदार कपिल पाटील यांना या दोनही आघाडयांवर लढावे लागते आहे. या दृष्टीने ही निवडणूक राज्याचे लक्ष वेधून घेते आहे. लोकसभा निवडणूकीपूर्वी होणाºया या निवडणूका त्यामुळेच महत्वाच्या आहेत. कपिल पाटील यांना पुन्हा उमेदवारी मिळणार की नाही याचा फैैसला या दोन निवडणूकांतील भाजपाच्या यशाव्दारे होणार आहे.वाडा नगरपंचायतीची सदस्य संख्या १७ असून नगराध्यक्ष थेट जनतेतून निवडला जाणार आहे. त्यामुळे एकूण सदस्य संख्या १८ होते. या निवडणुकीत भाजप व शिवसेना हे दोन्ही पक्ष स्वबळावर निवडणूक लढवित आहेत. सर्वच्या सर्व जागांवर दोन्ही पक्षांनी उमेदवार उभे केले आहेत. तर काँग्रेस स्वबळावर निवडणूक लढवित असून त्यांनी बारा जागांवर उमेदवार उभे केले असून पाच जागा मित्रपक्षांना सोडल्या आहेत. राष्ट्रवादीने पाच तर बहुजन विकास आघाडीने बारा जागांवर उमेदवार उभे केले आहेत. सर्वच पक्षांनी आपापले उमेदवार उभे केले असले तरी खरी लढत ही शिवसेना व भाजप यांच्यातच होणार आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, बहुजन विकास आघाडी व मनसे या सर्व राजकीय पक्ष एकत्र आले तरी ही ताकद भाजप, शिवसेना यांच्या पुढे जाऊ शकणार नाही. येथील काही प्रभागात तिरंगी तर काही प्रभागात चौरंगी लढती होणार आहेत. काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस खाते खोलतील अशी शक्यता आहे. वाडा नगरपंचायतीची पहिल्यांदा निवडणूक होत असून वाडा शहरात तुलनेने शिवसेनेचे प्राबल्य आहे. त्या खालोखाल भाजप आहे. गेल्या ग्रामपंचायत निवडणूकीत शिवसेनेचे आठ तर भाजपाचे पाच सदस्य निवडून आले होते.(उत्तरार्ध उद्याच्या अंकी)मातोश्री वरून फर्मानशिवसेनेने वाड्याची निवडणूक अंत्यत प्रतिष्ठेची केली असून त्याची धुरा नेते एकनाथ शिंदे यांच्या खांद्यावर दिली आहे. त्यांना संपर्क प्रमुख रवींद्र फाटक हे सहकार्य करीत आहेत. सवरा यांना या निवडणुकीत धूळ चारून भगवा फडकवा असे फर्मान मातोश्री वरून सुटल्याची चर्चा शिवसैनिकांत असून ते जोमाने कामाला लागले आहेत.कार्यकर्त्यांचा फौजफाटा तैनातभाजपचे तालुक्यातीलव बाहेरील कार्यकर्ते प्रचाराला जोरदार लागले आहेत. प्रत्येक महत्वाच्या पदाधिकाºयांना प्रभागाची जबाबदारी देण्यात आली आहे. पदाधिकाºयाने नातेसंबंध व मित्र परिवार यांना भेटून भाजपच्या उमेदवाराला मतदान करण्याचे आवाहन केले जात आहे. त्यामुळे भाजपाच्या कार्यकर्त्यांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे.सवरा, गंधेंचा समान निधीआदिवासी विकास मंत्री विष्णू सवरा यांनी गेल्या वर्षी वाडा शहराच्या विकासासाठी एक कोटीचा निधी आणला होता. तर काही महिन्यापूर्वी पालघर जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष निलेश गंधे यांनीही विकासासाठी एक कोटीचा निधी आणला होता. मंत्र्याच्या बरोबरीने हा निधी आणल्याची चर्चा मतदारांत आहे.झाकण्याचा प्रयत्नपंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मोठ्या छबीपुढे सवरा पालकमंत्री असताना आपली छबी छोटी ठेवून अपयश झाकण्याचा केविलवाणा प्रयत्न करीत असल्याची उपरोधिक चर्चा मतदार करीत आहेत. 

टॅग्स :PoliticsराजकारणVasai Virarवसई विरार