शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपा मंत्र्यांच्या समर्थकांची गुंडगिरी; युवकाला नाक घासून माफी मागायला लावली, पोलिसही हतबल
2
सुवर्णाची झळाळी, शिर्डीत लक्ष्मीपूजनाचा सोहळा; साईमंदिरात दिवाळी, साई मूर्तीवर अडीच कोटींचे अलंकार
3
पाकिस्तानात मोठा हल्ला, २५ सैनिक मारले गेले; TTP चा खैबर पख्तूनख्वा इथल्या लष्करी तळावर कब्जा
4
एका रात्रीत मोठा गेम! महायुतीचेच ३ माजी आमदार भाजपा फोडणार?; स्थानिक कार्यकर्तेच संतापले
5
क्रिकेटमधील पराभव जिव्हारी लागला, १०० च्या स्पीडने कार पळवली; दिवाळीची खरेदी करणाऱ्यांना चिरडले
6
ट्रेनमधील पांढऱ्या बेडशीट्स विसरा; भारतीय रेल्वे आता देणार खास प्रिंटेड कव्हर ब्लँकेट्स !
7
Mumbai: व्हॅनमधून रडण्याचा आवाज आला, पोलिसांनी पुढं जाऊन पाहिलं तर...; घटनेनं परिसरात खळबळ!
8
दिवाळीत ₹6 लाख कोटींची विक्रमी उलाढाल; भारतीयांची 'Made In India' वस्तूंना पसंती
9
कोण आहे फ्रांसेस्का ऑर्सिनी? ज्यांच्याकडे ५ वर्षाचा ई-व्हिसा असूनही भारतात प्रवेश नाकारला
10
Crime: आधी हात-पाय बांधले, नंतर उशीनं तोंड दाबलं...; व्यसनमुक्ती केंद्रातील घटनेनं खळबळ!
11
ODI Record: वनडेमध्ये आतापर्यंत कधीच 'असं' घडलं नव्हतं, ते वेस्ट इंडीजनं केलं!
12
सोलापूरात भाजपात दुफळी! "बाहेरून येणाऱ्यांनी किमान ३-४ वर्ष पक्षाचं काम करावं, त्यानंतरच.."
13
मोठी बातमी! १२ हजार भावांनी घेतला लाडकी बहीण योजनेचा लाभ; १६४ कोटींचा घोटाळा आला समोर
14
मुहूर्त ट्रेडिंग: शेअर बाजारात तेजी; निफ्टी वर्षाच्या सर्वोच्च पातळीवर, सेन्सेक्स 62 अंकांनी वधारला
15
Mumbai Fire: माजी उपमहापौर अरुण देव यांच्या अंधेरी येथील घराला आग
16
२० एकर जमिनीसाठी लेकीने आईचा घेतला बळी, पतीच्या मदतीने मृतदेह रिक्षात भरला अन् तितक्यात...
17
BCCI: "आशिया चषक भारताला न दिल्यास..." बीसीसीआयचा मोहसिन नक्वी यांना इशारा!
18
अमित शाह यांच्यावर गंभीर आरोप, प्रशांत किशोर यांनी दाखवला फोटो; जनसुराजच्या उमेदवाराचं अपहरण?
19
Beed: फटाका विझलाय समजून पुन्हा पेटवायला गेला अन्...; बीडमध्ये सहा वर्षांच्या मुलासोबत भयंकर घडलं!
20
"तात्या विंचू तुम्हाला चावेल...", संजय राऊतांच्या टीकेवर महेश कोठारेंची प्रतिक्रिया, म्हणाले- "ते माझ्याविषयी जे बोलले..."

वाडा नगरपंचायतीवर आघाडीचे वर्चस्व कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 5, 2021 00:17 IST

चारही समिती सभापतींची बिनविरोध निवड

लोकमत न्यूज नेटवर्कवाडा : वाडा नगरपंचायतीच्या चार विषय समित्यांसाठी झालेल्या निवडणुकीत शिवसेना दोन आणि मित्रपक्ष राष्ट्रवादी काँग्रेस व रिपब्लिकन पक्षाला प्रत्येकी एका समितीवर बिनविरोध विजय मिळाला आहे. विषय समित्यांच्या सभापतीपदासाठी सोमवारी निवडणूक झाली. या निवडणुकीत विरोधी पक्ष भाजपने उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने निवडणूक बिनविरोध झाली.वाडा नगरपंचायतीमध्ये एकूण १७ सदस्य संख्या असून यामध्ये शिवसेना ६, भाजप ६, काँग्रेस २, राष्ट्रवादी काँग्रेस, बहुजन विकास आघाडी व आर.पी.आय. यांचा प्रत्येकी एक सदस्य असे संख्याबळ आहे. नगराध्यक्ष हे थेट जनतेतून निवडून आले आहेत. या पदावर शिवसेनेच्या गीतांजली कोळेकर विराजमान आहेत. सत्तास्थापनेवेळी झालेल्या करारानुसार समितीच्या वाटपाबाबत वाटाघाटी करण्यात आल्या होत्या.सोमवारी झालेल्या निवडणुकीत पाणीपुरवठा समिती संदीप गणोरे, महिला व बालकल्याण समिती शुभांगी धानवा यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. तर, नियोजन समितीच्या सभापतीपदी रामचंद्र जाधव, बांधकाम समितीच्या सभापतीपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या सुचिता पाटील यांच्या उमेदवारीवर विरोधी पक्षाने तांत्रिक मुद्दा उपस्थित करून आक्षेप घेतला होता. त्यांच्याविरोधात अनुक्रमे भाजपचे रामचंद्र भोईर व रिमा गंधे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. मात्र, पीठासीन अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी अर्चना कदम यांनी विरोधी पक्षाने उपस्थित केलेल्या हरकती अमान्य केल्याने भाजपच्या सदस्यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने निवडणूक बिनविरोध झाली.दरम्यान, नवनिर्वाचित नियोजन समिती सभापती रामचंद्र जाधव, बांधकाम समिती सभापती सुचिता पाटील, पाणीपुरवठा समिती सभापती संदीप गणोरे व महिला व बालकल्याण समिती सभापती शुभांगी धानवा यांचे अभिनंदन होत आहे.

भाजपची माघार शिवसेना ६, भाजप ६, काँग्रेस २, राष्ट्रवादी, बहुजन विकास आघाडी व आर.पी.आय. यांचा प्रत्येकी एक सदस्य असे संख्याबळ आहे. मात्र राज्यातील महाविकास आघाडीचा प्रयोग वाडा तालुक्यातही झालेला असल्यामुळे येथे भाजपला विरोधी पक्षात बसावे लागले आहे. भाजपच्या उमेदवारांनी माघार घेतल्यामुळे चारही समित्यांचे सभापती बिनविरोध निवडले गेले आहेत.