शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

नालासोपाऱ्यात मतदार वाढले; तर वसईत घटले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2018 03:57 IST

पालघर लोकसभा मतदारसंघ : सोपारा सर्वात मोठा विधानसभा मतदारसंघ

पारोळ : पालघर लोकसभा मतदार संघात या पोटनिवडणुकित दिड लाखांनी मतदार वाढले असून आता १७ लाख २४ हजार मतदार संख्या झाली असताना मात्र या वर्षी एकट्या नालासोपारा विधानसभा मतदारसंघात ८१ हजार मतदार वाढले असून ४ लाख २९ हजार मतदार संख्या असलेला पालघर जिल्हातील तो सर्वात मोठा विधानसभा मतदार संघ ठरला तर २ लाख ७४ हजार मतदार असलेल्या वसई विधानसभा मतदार संघात मात्र ४ हजार ३०० ने मात्र मतदार घटले यामुळे नालासोपारा मतदार संघाला महत्त्व प्राप्त झाले असून तो उमेदवार विजयासाठी महत्वाचा ठरणार आहे.नालासोपारा मतदार हा मतदार संख्येनुसार सर्वात मोठा असल्याने या मतदार संघात सर्वच पक्षाच्या मोठ्या नेत्यांच्या सभा, प्रचारसभा चालू आहेत. मुख्यमंत्री देवेद्र फडणवीस यांची जाहीर सभा झाल्यानंतर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ व शिवसेना पक्ष प्रमुख उद्वव ठाकरे यांच्या ही प्रचार सभा गाजल्या तसेच या भागात कोकणी, उत्तर भारतीय,या मतदारांची संख्या मोठी आहे. पण कोकणातील मतदार गावी गेले असल्याने उत्तर भारतीय मतदाराना महत्व प्राप्त झाले असल्याने भारतीय जनता पार्टी चे उत्तर भारतीय नेते व अभिनेते या ठिकाणी तळ ठोकून बसले आहेत. तसेच या मतदार संघात विरार शहर येत असल्याने बहुजन विकास आघाडी ची मोठी या ठिकाणी ताकत असून आमदार ही याच पक्षाचा आहे. वसई विधानसभेत मतदार संख्या कमी असली तरी जाणकार मतदार या मतदात संघात आहे.वर्किंग डे मुळे मतदानात होणार घट?या मतदार संघात ही बहुजन विकास आघाडी चा आमदार असला तरी जन आंदोलन, भाजपा, शिवसेना,कॉग्रेस, श्रमजीवी यांचे ही मतदार या संघात आहेत. जनआंदोलन शिवसेनाच्या बाजूने तर श्रमजीवी ने भाजपा ला साथ दिली आहे. या मतदार संघात चाकरमान्यांची संख्या मोठी असल्याने व सोमवार मतदानाचा दिवस असल्याने व या संघातील मतदार मुंबईला नोकरीसाठी जात असतात. या ठिकाणी मतदान टक्का कमी होण्याची शक्यता आहे. कारण मतदानासाठीची सुटी फक्त पालघर जिल्ह्यापुरतीच मर्यादीत आहे.

टॅग्स :Palghar bypoll 2018पालघर पोटनिवडणूक 2018